bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
/
1 Kings 3
1 Kings 3
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 4 →
1
मिसराचा राजा फारो याच्या मुलीशी लग्र करून शलमोनाने फारोशी करार केला. शलमोनाने तिला दावीद नगरात आणले. त्याच्या महालाचे आणि परमेश्वराचे मंदिर बांधण्याचे काम तेव्हा चालू होते. यरूशलेमा सभोवती तटबंदी उभारायचे कामही शलमोनाने हाती घेतले होते.
2
परमेश्वराचे मंदिर अजून बांधून पुरे झाले नव्हते त्यामुळे लोक यज्ञात बली अर्पण करायला डोंगरमाथ्यासारख्या उंच ठिकाणी जात.
3
राजा शलमोनही आपले वडिल दावीद यांनी सांगितलेल्या नियमांचे मन:पूर्वक पालन करून परमेश्वरावरील आपले प्रेम प्रकट करीत असे. त्या गोष्टीखेरीज यज्ञ करायला आणि धूप जाळायला तो उंच ठिकाणी जात असे.
4
राजा गिबोन हे एक महत्वाचे उंचावरील ठिकाण असल्यामुळे शलमोन यज्ञासाठी तिकडे गेला. तेथे त्याने एक हजार होमार्पणे वाहिली.
5
शलमोन गिबोन येथे असतानाच परमेश्वराने एका रात्री त्यास स्वप्नात दर्शन दिले तो म्हणाला, माग! “तुला काय हवे ते माग मी ते देईन.”
6
तेव्हा शलमोन म्हणाला, “तुझा सेवक म्हणजेच माझे वडिल दावीद यांच्यावर तुझी कृपा होती. ते तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागले. ते विश्वासूपणाने आणि न्यायाने वागले. त्यानंतर आज त्याच्या मुलालाच गादीवर बसवून तू तुझ्या महान कराराबद्दल मोठाच दयाळूपणा दाखवला आहेस.
7
माझे वडिल दावीदानंतर, परमेश्वर देवा, तू मला राजा केले आहेस. पण मी लहान मुलासारखाच आहे. मला बाहेर जायला व आत यायला समजत नाही.
8
तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे, त्यांचा जमाव मोठा आहे ते असंख्य व अगणित आहेत.
9
म्हणून तुझ्या सेवकास लोकांचा न्याय करण्यास शहाणपणाचे मन दे, त्यामुळे मला बऱ्यावाईटामधील फरक समजेल. त्याखेरीज तुझ्या एवढ्या लोकांचा न्याय करणे कोणास शक्य आहे?”
10
शलमोनाने हा वर मागितला याचा परमेश्वरास फार आनंद झाला
11
म्हणून देव त्यास म्हणाला, “तू स्वत:साठी दीर्घायुष्य किंवा सुखसमृध्दी मागितली नाहीस. तसेच शत्रूंचा नि:पात व्हावा असे म्हणाला नाहीस. तू फक्त न्यायबुध्दी आणि विवेक याची मागणी केलीस.
12
तेव्हा तुझे मागणे मी मान्य करतो. तुला ज्ञानी आणि शहाणपणाचे मन देतो, तुला एवढे शहाणपण लाभेल की तुझ्यासारखा भूतकाळात कधी झाला, नाही आणि पुढे कधी होणार नाही.
13
आणखी तू जे मागीतले नाही तेही मी तुला देत आहे धन आणि वैभव ही तुला देत आहे. तुझ्या आयुष्यभर तुझ्यासारखा कोणी दुसरा राजा असणार नाही.
14
जर तू माझ्या दाखवलेल्या मार्गांने चाललास आणि माझ्या आज्ञा आणि नियम पाळलेस, जसा तुझा पिता दावीद चालला, तर तुलाही मी दीर्घायुषी करीन.”
15
शलमोन जागा झाला. परमेश्वर स्वप्नात येऊन आपल्याशी बोलला हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर शलमोन यरूशलेमेला जाऊन परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभा राहिला. शलमोनाने परमेश्वरासाठी होमार्पण केले. त्यामध्ये त्याने परमेश्वरास शांत्यर्पणे वाहिली. मग आपल्या सर्व सेवकांना मेजवानी दिली.
16
नंतर दोन वेश्या शलमोनाकडे आल्या. राजापुढे त्या दोघी उभ्या राहिल्या.
17
त्यातली एक म्हणाली, “महाराज, ही आणि मी एकाच घरात राहतो. मी बाळाला जन्म दिला तेव्हा ही माझ्या जवळच होती.
18
तीन दिवसानंतर हिने पण बाळाला जन्म दिला. आमच्याखेरीज घरात आणखी कोणी नव्हते. आम्ही दोघीच काय त्या राहत होतो.
19
एका रात्री ती बाळाला घेऊन झोपलेली असताना तिचे बाळ तिच्याखाली चेंगरुन मरण पावले.
20
तेव्हा मी झोपेत असताना त्या रात्रीच तिने माझे बाळ माझ्या कुशीतून घेतले आणि ते स्वत:कडे ठेवून आपले मृत बालक माझ्या अंथरुणावर ठेवले.
21
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी बाळाला पाजायला घेतले तर बाळ मृत असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणून मी बारकाईने न्याहाळले असता हे बाळ माझे नाही असे मला आढळले.”
22
पण तेवढ्यात ती दुसरी स्त्री म्हणाली, “नाही, जिवंत बाळ माझे आहे, मरण पावलेले बाळ तुझे आहे.” पहिली त्यावर म्हणाली, “तू खोटे बोलतेस, मरण पावले ते तुझे बाळ आणि जिवंत आहे ते माझे.” अशाप्रकारे दोघीचांही राजासमोर कडाक्याचा वाद झाला.
23
तेव्हा राजा म्हणाला, “एक म्हणते जिवंत मूल माझे आणि मरण पावलेले बाळ तुझे आहे; दुसरी असे म्हणते नाही, मरण पावलेला तो तुझा मुलगा आणि जिवंत जो माझा मुलगा.”
24
राजाने मग आपल्या सेवकाला एक तलवार घेऊन यायला सांगितले.
25
नंतर राजा म्हणाला, “आता आपण असे करु. त्या जिवंत बाळावर वार करून त्याचे दोन तुकडे करु आणि एकीला अर्धा व दुसरीला अर्धा देऊ.”
26
पण पहिल्या स्त्रीला, खऱ्या आईला, वात्सल्याचा उमाळा आला. ती राजाला म्हणाली, “हे माझ्या स्वामी नको, बाळाला मारु नका ते तिच्याकडेच राहू द्या.” दुसरी स्त्री म्हणाली, “बाळाचे दोन तुकडे करा.” म्हणजे आमच्यापैकी कोणालाही ते मिळणार नाही.
27
तेव्हा हे ऐकून राजा म्हणाला, “बाळाला मारु नका. त्यास पहिल्या स्त्रीच्या हवाली करा. तीच खरी आई आहे.”
28
राजाचा हा न्याय इस्राएल लोकांच्या कानावर गेला. राजाच्या चाणाक्षपणाबद्दल त्यांना भय वाटले. योग्य निर्णय घेण्याचे परमेश्वराचे शहाणपण त्याच्याकडे आहे हे त्यांच्या लक्षात आले.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22