bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
/
Exodus 39
Exodus 39
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
← Chapter 38
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 40 →
1
परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे पवित्रस्थानातील सेवेसाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाची सुताची कुशलतेने विणलेली वस्रे केली; अहरोनासाठीही पवित्र वस्रे बनवली.
2
त्यांनी सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे एफोद तयार केले.
3
त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले व ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतामध्ये व कातलेल्या तलम सणाच्या कापडामध्ये भरली.
4
त्यांनी एफोदसाठी खांदपट्ट्या केल्या व त्या एफोदाच्या दोन्ही टोकांना जोडल्या.
5
एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर जी कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखीच असून ती अखंड तुकड्याची केली. ती सोन्याच्या जरीची, निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताची व कातलेल्या तलम सणाच्या कापडाची केली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले.
6
मुद्रेवर छाप कोरतात तशी त्यांनी इस्राएलाच्या मुलांची नावे गोमेद रत्नावर कोरली व ती रत्ने सोन्याच्या कोंदणात बसवली.
7
इस्राएल लोकांची स्मारकरत्ने व्हावी म्हणून ती एफोदाच्या खांदपट्ट्यांवर लावली; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
8
त्यांने कुशल कारागिराकडून एफोदप्रमाणेच सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा ऊरपट बनवून घेलता.
9
तो ऊरपट चौरस होता. त्यांनी तो दुहेरी केला; तो दुहेरी असून तो एक वीत लांब व एक वीत रुंद असा चौरस होता.
10
त्यामध्ये रत्नांच्या चार रांगा बसविल्या; पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणिक;
11
दुसऱ्या रांगेत पाचू इंद्रनीलमणी व हिरा;
12
तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग;
13
आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे, ही सर्व रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसविली.
14
इस्राएलाच्या पुत्रांसाठी एक याप्रमाणे ती बारा रत्ने ऊरपटावर होती. त्यांच्या बारा वंशांच्या संख्येइतकी बारा नावे होती. एकेका रत्नावर एकेका मुलाचे नाव मुद्रा कोरतात त्याप्रमाणे त्यांनी कोरले होते.
15
दोरीसारखा पीळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या त्यांनी ऊरपटावर लावल्या.
16
सोन्याची दोन जाळीदार कोंदणे व सोन्याच्या दोन कड्या बनवून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावल्या.
17
ऊरपटाच्या टोकास लावलेल्या दोन्ही कड्यांत पीळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घातल्या.
18
पीळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी दोन टोके सोन्याच्या कोंदणात खोचून त्या त्यांनी एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर समोरच्या बाजूला लावल्या.
19
सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांवर एफोदाच्या आतील बाजूच्या कडेला एफोदाजवळ लावल्या.
20
सोन्याच्या आणखी दोन कड्या करून एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर खालून त्याच्यासमोर त्याच्या सांध्याजवळ कुशलतेने विणलेल्या पट्टीवर लावल्या.
21
त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांनी निळ्या, फितीने अशा बांधल्या की ऊरपट एफोदाच्या पट्ट्यांवर राहावा व तो ऊरपट एफोदावरून घसरू नये. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व केले.
22
नंतर बसालेलने एफोदाबरोबर घालावयचा निळ्या रंगाच्या सुताचा झगा विणून घेतला.
23
त्यांनी झग्याच्या मध्यभागी एक भोक ठेवले व त्या दरम्यान झगा फाटू नये म्हणून त्या भोकाच्या किनारीला सभोवती कापडाचा गोट शिवला.
24
मग त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेराभोवती कातलेल्या तलम सणाच्या कापडाची व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या कापडाची डाळिंबे काढली.
25
नंतर त्यांनी शुद्ध सोन्याची घुंगरे केली व ती झग्याच्या खालच्या घेराभोवती दोन दोन डाळिंबाच्यामध्ये लावली. म्हणजे झग्याच्या खालच्या घेराभोवती घुंगरु मग डाळिंब, पुन्हा घुंगरू मग डाळिंब याप्रमाणे दोन डाळिंबामध्ये एक घुंगरु अशी ती झाली;
26
सेवा करते वेळी अंगी घालायच्या झगाच्या घेराच्या काठावर सभोवती एक घुंगरू व एक डाळिंब व एक घुंगरू व एक डाळिंब असे लावले; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे तसेच त्यांनी हे केले.
27
अहरोन व त्याच्या मुलांसाठी तलम सणाच्या विणलेल्या कापडाचे अंगरखे केले.
28
आणि त्यांनी तलम सणाचे मंदिल, फेटे व कातलेल्या सणाचे चोळणे केले.
29
मग त्यांनी तलम सणाच्या कापडाचा व निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाचा वेलबुट्टीदार कमरपट्टा बनविला; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
30
मग त्यांनी पवित्र मुकुटासाठी शुद्ध सोन्याची पट्टी केली व तिच्यावर “परमेश्वरासाठी पवित्र” अशी अक्षरे कोरली.
31
ती मंदिलाभोवती समोर बांधता यावी म्हणून तिला निळी फीत लावली. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले.
32
अशा प्रकारे पवित्र निवासमंडपाचे म्हणजे दर्शनमंडपाचे सर्व काम पूर्ण झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.
33
मग त्यांनी तो निवासमंडप मोशेकडे आणला. तंबू व तंबूच्या सर्व वस्तू म्हणजे आकड्या, फळ्या, अडसर, खांब, खांबाच्या उथळ्या;
34
आणि लाल रंगवलेली मंडप झाकण्याची मेंढ्यांची कातडी व तहशांची कातडी व अंतरपट;
35
साक्षपटाचा कोश, तो वाहून नेण्याचे दांडे आणि दयासन
36
मेज, त्यावरील सर्व वस्तू व पवित्र समक्षतेची भाकर;
37
शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष, त्यावरील दिवे व त्याची सर्व उपकरणे व दिव्यासाठी तेल;
38
सोन्याची वेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप आणि तंबूच्या दारासाठी पडदा;
39
पितळेची वेदी व तिची पितळेची जाळी, वेदी वाहून नेण्याचे दांडे व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक:
40
अंगणाचे पडदे व कनाती, खांब व त्याच्या उथळ्या, अंगणाच्या प्रवेशदाराचा पडदा, तणावे, मेखा व पवित्र निवासमंडपाच्या व दर्शनमंडपाच्या सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य;
41
पवित्रस्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्या पुत्रांची वस्रे ही सर्व त्यांनी आणली;
42
परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सगळे काम केले.
43
लोकांनी काम केले ते सर्व मोशेने बारकाईने पाहिले; ते त्यांनी अगदी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.
← Chapter 38
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 40 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40