bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
/
1 Kings 19
1 Kings 19
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
← Chapter 18
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 20 →
1
एलीयाहने जे काही केले आणि त्याने बआलाच्या सर्व संदेष्ट्यांना तलवारीने कसे मारून टाकले ते अहाबाने ईजबेलला सांगितले.
2
तेव्हा ईजबेलने एलीयाहकडे असे म्हणत एक दूत पाठवला, “उद्या या वेळेपर्यंत मी त्यांच्यातील एकाप्रमाणे तुझ्या जिवाचे केले नाही तर देव माझे त्याहूनही अधिक वाईट करो.”
3
एलीयाह घाबरून आपला जीव घेऊन पळून गेला. जेव्हा तो यहूदीया प्रांतातील बेअर-शेबा नगरात आला, त्याने आपल्या सेवकाला तिथे सोडले,
4
तो स्वतः एक दिवसाचा प्रवास करीत रानात गेला, तो रतामाच्या झुडूपाखाली आला आणि मरून जावे म्हणून तिथे बसून प्रार्थना केली. “हे याहवेह आता पुरे आहे, माझा प्राण घ्या, मी माझ्या पूर्वजांपेक्षा चांगला आहे असे नाही.”
5
नंतर तो त्या रतामाच्या झुडूपाखाली पडून झोपी गेला. अचानक परमेश्वराच्या दूताने येऊन त्याला स्पर्श करीत म्हटले, “ऊठ आणि खा.”
6
त्याने सभोवती पाहिले, आणि त्याच्या उशाशी निखार्यावर भाजलेल्या काही भाकरी आणि पाण्याचे एक भांडे ठेवलेले होते. तो भाकर खाऊन पाणी प्याला आणि पुन्हा झोपी गेला.
7
याहवेहचा दूत परत दुसर्यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हणाला, “ऊठ आणि खा, कारण तुला फार लांबचा प्रवास करावयाचा आहे.”
8
तेव्हा त्याने उठून अन्नपाणी घेतले. त्या अन्नाच्या शक्तीवर चाळीस दिवस व चाळीस रात्री प्रवास करीत होरेब, तो परमेश्वराच्या डोंगराकडे पोहोचला.
9
तिथे तो गुहेत जाऊन रात्रभर तिथेच राहिला. आणि याहवेहचे वचन त्याच्याकडे आले: “एलीयाह, तू येथे काय करीत आहेस?”
10
एलीयाह म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह परमेश्वरासाठी मी फार ईर्ष्यावान आहे. इस्राएली लोकांनी आपला करार नाकारला आहे, आपल्या वेद्या फोडल्या आहेत आणि आपल्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकले आहे. मी एकटाच उरलो आहे आणि आता ते मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”
11
याहवेहने त्याला म्हटले, “बाहेर जा आणि याहवेहच्या उपस्थितीत डोंगरावर उभा राहा, कारण याहवेह तिथून जाणार आहेत.” तेव्हा मोठ्या व शक्तिशाली वार्याने डोंगर याहवेहसमोर दुभागले आणि खडक फोडले, परंतु याहवेह त्या वार्यात नव्हते. त्या वार्यानंतर भूमिकंप झाला, परंतु याहवेह त्या भूमिकंपात देखील नव्हते.
12
भूमिकंपानंतर अग्नी आला, परंतु त्या अग्नीतही याहवेह नव्हते. आणि त्या अग्नीनंतर एक शांत वाणी झाली.
13
जेव्हा एलीयाहने ही वाणी ऐकली, त्याने आपल्या झग्याने आपला चेहरा झाकून घेतला आणि बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी जाऊन उभा राहिला. मग ती वाणी त्याला म्हणाली, “एलीयाह, तू येथे काय करीत आहेस?”
14
एलीयाह म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह परमेश्वरासाठी मी फार ईर्ष्यावान आहे. इस्राएली लोकांनी आपला करार नाकारला आहे, आपल्या वेद्या फोडल्या आहेत आणि आपल्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकले आहे. मी एकटाच उरलो आहे आणि आता ते मलाही मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”
15
याहवेहने त्याला म्हटले, “तू आलास त्या मार्गाने परत दिमिष्काच्या वाळवंटाकडे जा. आणि तिथे जाशील तेव्हा हजाएलचा अरामचा राजा म्हणून अभिषेक कर.
16
आणि निमशीचा पुत्र येहूचा सुद्धा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक कर व आबेल-महोलाह येथील शाफाटचा पुत्र अलीशाचा तुझा वारस म्हणून संदेष्टा होण्यास अभिषेक कर.
17
हजाएलच्या तलवारीपासून जो कोणी निसटेल त्याला येहू मारून टाकेल आणि जे येहूच्या तलवारीपासून निसटतील त्यांना अलीशा जिवे मारेल.
18
तथापि बआलच्या पुढे गुडघे टेकले नाहीत किंवा आपल्या मुखाने त्याचे चुंबन घेतले नाही, असे सात हजार लोक मी इस्राएलात राखून ठेवले आहेत.”
19
म्हणून एलीयाह तिथून निघाला आणि त्याला शाफाटचा पुत्र अलीशा दिसला. नांगराला बारा बैल जुंपून तो नांगरणी करीत होता आणि तो स्वतः बाराव्या बैलाच्या जोडीवर होता. एलीयाह त्याच्याकडे गेला व आपला झगा त्याच्यावर टाकला.
20
तेव्हा अलीशाने आपले बैल सोडले आणि एलीयाहच्या मागे धावून गेला. तो म्हणाला, “मला माझ्या आईपित्याचे चुंबन घेऊ दे, मग मी आपल्याबरोबर येईन.” एलीयाहने उत्तर दिले, “परत जा, मी तुला काय केले?”
21
तेव्हा अलीशा त्याच्यापासून निघून परतला. त्याने आपल्या बैलाची एक जोडी घेतली आणि ती कापली. त्याने नांगरणीची साधने पेटवून त्यावर मांस शिजविले आणि लोकांना दिले आणि त्यांनी ते खाल्ले. मग तो एलीयाहचा अनुयायी होण्यास निघाला आणि त्याचा सेवक झाला.
← Chapter 18
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 20 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22