bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
/
Acts 24
Acts 24
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 25 →
1
पाच दिवसानंतर महायाजक हनन्याह काही वडीलजनांसह तिर्तुल्लस नावाच्या वकीलास बरोबर घेऊन कैसरीयाला गेले आणि त्यांनी पौलाविरुद्ध केलेले त्यांचे आरोप राज्यपालापुढे सादर केले.
2
पौलाला आत बोलाविण्यात आले, तेव्हा तिर्तुल्लसाने त्याचे आरोपपत्र फेलिक्ससमोर सादर केले: “आपल्या कारकिर्दीत आम्हास: दीर्घकाल शांती लाभलेली आहे आणि तुमच्या दूरदृष्टीमुळे आमच्या देशात समाज सुधारणा झाल्या आहेत.
3
यामुळे आम्ही सर्वठिकाणी आणि प्रत्येक प्रकारे कृतज्ञतेने व मनापासून स्वागत करतो आणि श्रेष्ठ फेलिक्स आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत.
4
आपणास कंटाळा येणार नाही अशा रीतीने, मी माझे म्हणणे आपणापुढे मांडणार आहे, तेव्हा कृपा करून आपण माझे भाषण ऐकून घ्यावे, अशी आपणास विनंती आहे.
5
“हा मनुष्य त्रासदायक असल्याचे आम्हास आढळून आले आहे तो अवघ्या जगातील सर्व यहूदीयांना बंड करण्यास चिथावीत असतो. नासरेथकर पंथाचा हा पुढारी आहे
6
हा मंदिर अपवित्र करण्याचा प्रयत्न करीत होता; म्हणून आम्ही त्याला अटक केली. आम्ही आमच्या नियमानुसार त्याचा न्याय करणार होतो
7
परंतु यरुशलेम येथील पलटणीचे सेनापती लुसिया आले आणि त्यांनी जबरदस्ती करून त्याला आमच्या हातातून काढून घेतले
8
व आज्ञा केली की त्याच्यावर आरोप करणार्यांनी तुमच्यासमोर यावे. आता या माणसाची आपण स्वतः तपासणी करून या आरोपात तथ्य आहे की नाही, हे समजून घ्यावे.”
9
त्याचे बोलणे संपताच सर्व यहूद्यांनी एकसुरात अनुमोदन दिले की सांगण्यात आलेली प्रत्येक गोष्ट सत्य आहे.
10
राज्यपालाने त्याला बोलण्यास खुणावले, पौलाने उत्तर दिले: “महाराज, आपण अनेक वर्षे या देशात न्यायाधीश म्हणून आहात; त्यामुळेच मी आनंदाने माझे बचावाचे भाषण आपणापुढे करीत आहे.
11
मंदिरामध्ये उपासना करण्यासाठी मी यरुशलेममध्ये आलो याला बारा दिवसांहून अधिक कालावधी लोटला नाही, हे आपण सहज पडताळून पाहू शकाल.
12
आणि मंदिरात, सभागृहामध्ये किंवा शहरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा लोकात अशांती माजविताना मजवर आरोप करणार्यांना मी आढळलो नाही.
13
त्यांनी जे आरोप मजवर केले आहेत ते तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकत नाहीत.
14
तरी एक गोष्ट कबूल करतो की मी आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराची उपासना करतो व त्या मार्गाचा अनुयायी आहे ज्याला हे लोक पंथ असे म्हणतात. त्याबरोबरच जे नियमशास्त्राला धरून आहे त्या प्रत्येक गोष्टीवर व संदेष्ट्यांच्या लिखाणात जे लिहिले आहे, त्या प्रत्येक वचनावर माझा विश्वास आहे,
15
परमेश्वरामध्ये या लोकांची जी आशा आहे तीच माझीसुद्धा आहे, ती ही की नीतिमान व अनीतिमान या दोघांचेही पुनरुत्थान होईल.
16
यामुळेच मी परमेश्वरासमोर आणि मनुष्यासमोर माझी विवेकबुद्धी सतत स्वच्छ ठेवण्यासाठी खूप कष्ट घेतो.
17
“अनेक वर्षे बाहेर राहिल्यानंतर, मी गरीब लोकांना साहाय्य करण्यासाठी देणग्या व अर्पण वाहण्यासाठी यरुशलेमला परतलो.
18
यांनी मला मंदिराच्या अंगणात शुद्धीकरणाचा विधी पूर्ण करताना पाहिले. तिथे माझ्याभोवती जमाव नव्हता आणि मी कोणत्याही गोंधळात सहभागी झालो नव्हतो.
19
परंतु आशिया प्रांतातील काही यहूदीयांची माझ्याविरुद्ध काही तक्रार असेल तर त्यांनी येथे हजर राहणे आवश्यक होते.
20
येथे प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या या लोकांना विचारा की त्यांच्या न्यायसभेपुढे मी उभा होतो तेव्हा त्यांना मजमध्ये कोणता अपराध आढळून आला,
21
ही केवळ एक गोष्ट सोडून मी त्यांच्यासमोर उच्च आवाजाने ओरडलो: ‘मृतांचे पुनरुत्थान यामुळे मी आज आपणापुढे चौकशीसाठी उभा आहे.’ ”
22
फेलिक्सला या मार्गाबद्दल चांगली माहिती होती, त्याने सुनावणी तात्पुरती थांबविली. “जेव्हा सेनापती लुसिया येईल, तेव्हा आपण या प्रकरणाचा निकाल लावू,” असे त्याने म्हटले.
23
त्याने शताधिपतीला हुकूम केला की, पौलावर पहारा ठेवावे परंतु त्याला थोडीफार स्वतंत्रता दिली जावी आणि त्याच्या मित्रांना त्याची सेवा करण्याची अधिकृत परवानगी द्यावी.
24
मग काही दिवसानंतर आपली यहूदी पत्नी द्रुसिल्लासह फेलिक्स आला. पौलाला बोलविल्यानंतर तो येशू ख्रिस्तावरील विश्वासासंबंधी जे बोलला ते त्यांनी ऐकले.
25
तो जेव्हा नीतिमत्व, इंद्रियदमन आणि भावी न्याय या गोष्टीसंबंधाने बोलत होता, तेव्हा फेलिक्स भयभीत झाला आणि म्हणाला, “आतासाठी हे पुरे आहे! तू जाऊ शकतोस. मला पुढे अधिक सवड लाभली, तर मी तुला पुन्हा बोलावेन.”
26
त्याचवेळेस त्याने अशीही आशा बाळगली होती की पौल त्याला लाच देईल आणि म्हणून तो त्याला वारंवार बोलावून घेत होता व त्याच्याबरोबर बोलणे करीत होता.
27
दोन वर्षे निघून गेल्यानंतर, पुढे पुर्क्य फेस्त हा राज्यपाल म्हणून फेलिक्सच्या जागेवर आला. परंतु फेलिक्सला यहूदीयावर कृपादृष्टी दाखवायची होती म्हणून तो पौलाला कैदेतच ठेऊन निघून गेला.
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 25 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28