bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
/
Deuteronomy 27
Deuteronomy 27
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
← Chapter 26
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 28 →
1
नंतर मोशे व इस्राएलांच्या वडीलजनांनी लोकांना आज्ञापिले: “ज्या आज्ञा आज मी तुम्हाला सांगत आहे त्या तुम्ही पाळाव्या.
2
जेव्हा तुम्ही यार्देन नदी पार करून याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात जाल, तेव्हा काही मोठे धोंडे घेऊन त्यावर चुन्याचा लेप लावून स्थापित करावे.
3
त्यावर या नियमशास्त्राचे सर्व शब्द लिहून काढावे जेव्हा तुम्ही यार्देन नदी पार करून याहवेह तुमचे परमेश्वर देत असलेल्या वचनदत्त देशात जाल म्हणजे दुधामधाचे प्रवाह वाहणार्या अशा देशात जाल, जसे याहवेह तुमच्या पूर्वजांच्या परमेश्वराने तुम्हाला वचन दिले होते.
4
आणि जेव्हा तुम्ही यार्देन नदी पार करून याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या वचनदत्त देशात जाल, तेव्हा हे धोंडे एबाल डोंगरावर स्थापित करावे, जसे मी आज तुम्हाला आज्ञा करीत आहे आणि त्यावर चुन्याचा लेप लावावा.
5
याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी तुम्ही तिथे एक वेदी बांधावी, धोंड्यांची वेदी बांधावी. त्यावर कोणतेही लोखंडी अवजार वापरू नये.
6
याहवेह तुमच्या परमेश्वरासाठी तुम्ही तिथे न घडविलेल्या धोंड्यांची एक वेदी बांधावी आणि मग त्या वेदीवर याहवेह तुमच्या परमेश्वराला होमार्पणे अर्पावी.
7
तसेच शांत्यर्पणही त्याच वेदीवर करून याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर मोठ्या आनंदाने भोजन करावे.
8
या धोंड्यावर नियमशास्त्राचा प्रत्येक शब्द स्पष्टपणे लिहून काढावा.”
9
नंतर मोशे व लेवीय याजकांनी सर्व इस्राएली लोकांना म्हटले, “अहो इस्राएली लोकांनो, शांत व्हा व ऐका! आता तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे लोक झाला आहात.
10
याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करा आणि त्यांच्या ज्या आज्ञा आणि विधी आज मी तुम्हाला देत आहे, ते सर्व तुम्ही पाळावे.”
11
त्याच दिवशी मोशेने लोकांना आज्ञापिले:
12
तुम्ही यार्देन नदी पार करून जाल, तेव्हा शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार, योसेफ व बिन्यामीनच्या गोत्रांनी लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम पर्वतावर उभे राहावे.
13
आणि रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफताली यांच्या गोत्रांनी शापवचने उच्चारण्यासाठी एबाल डोंगरावर उभे राहावे.
14
तेव्हा लेव्यांनी सर्व इस्राएली लोकांना पुढीलप्रमाणे मोठ्याने म्हणावे:
15
“जो याहवेहला घृणास्पद अशी मूर्ती कुशल कारागिरांच्या हातांनी घडवितो आणि ती गुप्तपणे ठेवतो तो शापित आहे.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
16
“जो कोणी आपल्या पित्याचा अथवा मातेचा अनादर करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
17
“जो कोणी आपल्या शेजार्याच्या सीमेची धोंड बदलतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
18
“जो कोणी आंधळ्याची वाट चुकवितो तो शापित होय!” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
19
“जो कोणी परदेशी, अनाथ आणि विधवा यांचा न्याय विपरीत करतो तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
20
“जो कोणी आपल्या पित्याच्या पत्नीबरोबर समागम करतो, तो शापित होय, कारण त्याने त्याच्या पित्याचे अंथरूण अपमानित केले आहे.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
21
“जो कोणी एखाद्या पशूबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
22
“जो कोणी आपल्या बहिणीबरोबर, त्याच्या पित्याच्या कन्येबरोबर किंवा आपल्या मातेच्या कन्येबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
23
“जो कोणी आपल्या सासूबरोबर समागम करतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
24
“जो कोणी आपल्या शेजार्याला गुप्तपणे ठार मारतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
25
“जो कोणी एखाद्या निरपराधी मनुष्याला जिवे मारण्यासाठी लाच घेतो, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
26
“जो कोणी या नियमशास्त्राचे शब्द अमान्य करून ते आचरणात आणत नाही, तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.
← Chapter 26
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 28 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
Recommended Reading
Commentary
Deuteronomy Commentaries
→
Devotional
Deuteronomy Devotional Guide
→
Get This Bible
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती) Study Bible
→