bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
/
Matthew 9
Matthew 9
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 10 →
1
येशू एका होडीत चढले आणि सरोवराच्या पलीकडे आपल्या शहरात आले.
2
काही लोकांनी एका पक्षघाती मनुष्याला, खाटेवर ठेऊन त्यांच्याकडे आणले. जेव्हा येशूने त्यांचा विश्वास पाहिला, त्या मनुष्याला म्हणाले, “मुला, धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”
3
तेव्हा तिथे उपस्थित असलेले काही नियमशास्त्र शिक्षक आपसात म्हणू लागले, “हा मनुष्य दुर्भाषण करतो!”
4
त्यांचे विचार येशूंनी ओळखून त्यांना विचारले, “तुम्ही तुमच्या मनामध्ये दुष्टाईने भरलेले विचार का करता?
5
यातून कोणते म्हणणे सोपे आहे, ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपली बाज उचलून चालू लाग?’
6
तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा.”
7
तेव्हा तो मनुष्य उठला आणि आपल्या घरी गेला.
8
प्रत्यक्ष घडलेला हा चमत्कार पाहून जमावाला भीती वाटली व ज्यांनी मनुष्यास असा अधिकार दिला त्या परमेश्वराची त्या सर्वांनी स्तुती केली.
9
मग येशू तिथून गेले, येशूंनी मत्तय नावाच्या एका मनुष्याला जकात नाक्यावर बसलेला पाहिले. येशूंनी त्याला म्हटले, “माझ्यामागे ये,” आणि मत्तय उठला आणि त्यांना अनुसरला.
10
नंतर संध्याकाळी येशू आणि त्यांचे शिष्य मत्तयाच्या घरी भोजन करत होते. त्यांच्या पंक्तीला अनेक जकातदार आणि पापी लोक बसले होते.
11
ते पाहून परूशी लोकांनी येशूंच्या शिष्यांना विचारले, “तुमचे गुरू जकातदार व पापी लोकांच्या पंक्तीला बसून का जेवतात?”
12
हे ऐकून, येशू त्यांना म्हणाले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते.
13
ते पुढे म्हणाले जा आणि याचा अर्थ काय आहे शिकून घ्या: ‘मला तुमची अर्पणे नकोत.’ पण दया हवी आहे. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनांस बोलविण्यास आलो आहे.”
14
एके दिवशी बाप्तिस्मा करणार्या योहानाचे शिष्य येशूंकडे आले आणि त्यांनी त्यांना प्रश्न केला, “गुरुजी, आम्ही आणि परूशी लोक उपास करतो तसे तुमचे शिष्य का करत नाहीत?”
15
येशूंनी उत्तर दिले, “वराचे पाहुणे वर त्यांच्याबरोबर असताना शोक कसे करू शकतात? परंतु अशी वेळ येत आहे की, वर त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल आणि मग ते उपास करतील.
16
“नवीन कापडाचा तुकडा घेऊन जुन्या कापडाला ठिगळ म्हणून कोणीही लावत नाही. कारण ते ठिगळ वस्त्राला फाडील आणि छिद्र अधिक मोठे होईल.
17
त्याचप्रमाणे कोणीही नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यांमध्ये ओतीत नाही. नाही तर, नवीन द्राक्षारसामुळे बुधले फुटून जातील; द्राक्षारस वाहून जाईल आणि बुधल्याचा नाश होईल. नाही, तसे होऊ नये म्हणून ते नवा द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये ओततात आणि दोन्ही सुरक्षित राहतात.”
18
हे बोलत आहे तोच, सभागृहाचा पुढारी आला आणि त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “माझी कन्या नुकतीच मरण पावली आहे, कृपा करून या व आपला हात तिच्यावर ठेवा म्हणजे ती पुन्हा जिवंत होईल!”
19
येशू उठून त्याच्याबरोबर गेले आणि त्यांचे शिष्यही त्यांच्याबरोबर निघाले.
20
तेव्हा बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी असलेल्या एका स्त्रीने त्यांच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला.
21
कारण तिने आपल्या मनात म्हटले, “मी त्यांच्या वस्त्राला नुसता स्पर्श जरी केला तरी बरी होईन.”
22
येशू मागे वळून तिला म्हणाले, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे” आणि त्याच क्षणी ती स्त्री बरी झाली.
23
येशू त्या सभागृहाच्या अधिकार्याच्या घरी आले, तेव्हा त्यांनी आकांत करणारा मोठा जमाव तिथे पाहिला. लोक बासरी वाजवून शोक करीत होते.
24
ते म्हणाले, “बाहेर जा. मुलगी मरण पावली नाही पण झोपली आहे!” हे ऐकून ते त्यांना हसू लागले.
25
शेवटी सर्व जमाव बाहेर आल्यानंतर येशू त्या मुलीला ठेवले होते तिथे गेले; त्यांनी तिच्या हाताला धरून तिला उठविले आणि ती उठून बसली.
26
याविषयीची बातमी त्या सर्व प्रदेशात पसरली.
27
येशू तिथून पुढे निघाल्यावर, दोन आंधळे माणसे त्यांच्यामागे आले व मोठ्याने म्हणाले, “अहो, दावीदाचे पुत्र, आम्हावर दया करा.”
28
जेव्हा ते घरात गेले त्यावेळी ते आंधळे त्यांच्याकडे आले आणि येशूंनी त्यांना विचारले, “मी हे करण्यास समर्थ आहे असा तुमचा विश्वास आहे काय?” “होय प्रभू,” त्यांनी उत्तर दिले.
29
मग येशूंनी त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि ते त्यांना म्हणाले, “तुमच्या विश्वासानुसार तुम्हासाठी केले जावो.”
30
आणि त्याच क्षणाला त्यांना दिसू लागले. येशूंनी त्यांना सक्त ताकीद दिली, “याविषयी कोणालाही काहीही सांगू नका,”
31
परंतु याउलट त्यांनी येशूंची किर्ती त्या सर्व भागात पसरविली.
32
ते बाहेर जात असताना, एका मुक्या भूतग्रस्त मनुष्याला येशूंकडे आणले.
33
येशूंनी तो दुरात्मा त्याच्यामधून हाकलून लावला, तेव्हा त्या मुक्या मनुष्याला बोलता येऊ लागले. ते पाहून गर्दीतील लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “असा अद्भुत प्रकार इस्राएलात आम्ही कधीच पाहिला नव्हता.”
34
परंतु परूशी लोक म्हणाले, “भुतांचा राजा सैतानाच्या साहाय्याने तो भुते घालवितो.”
35
येशू सर्व नगरांत व गावात सभागृहांमध्ये शिक्षण देत, राज्याच्या शुभवार्तेची घोषणा करीत आणि प्रत्येक आजार व विकार बरे करीत फिरले.
36
त्यांनी समुहाला पाहिले तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते.
37
ते आपल्या शिष्यांना म्हणाले, “पीक अमाप आहे, पण कामकरी थोडे आहेत.
38
हंगामाच्या प्रभूने पिकासाठी शेतावर कामकरी पाठवावे म्हणून त्यांना विनंती करा.”
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 10 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28