bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
/
Proverbs 28
Proverbs 28
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
← Chapter 27
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 29 →
1
कोणीही पाठलाग करीत नाही, तरी दुष्ट माणसे पळत असतात; पण नीतिमान सिंहासारखे निर्भय असतात.
2
जेव्हा एखादे राष्ट्र बंडखोर असते, तेव्हा तिथे अनेक शासक असतात, परंतु विवेकशील आणि ज्ञानी शासक सुव्यवस्था कायम ठेवतो.
3
गरीब लोकांवर जुलूम करणारा पुरुष, संपूर्ण पीक वाहून नेणार्या घनघोर वृष्टिसारखा आहे.
4
नियमशास्त्राचा तिरस्कार करणारे दुर्जनांची स्तुती करतात, परंतु ते पालन करणारे, त्यांचा विरोध करतात.
5
योग्य ते काय आहे हे दुष्टकर्म करणाऱ्यांना समजत नाही, परंतु जे याहवेहचा शोध घेतात, त्यांना ते पूर्णपणे समजते.
6
विकृत मार्गावर चालणाऱ्या श्रीमंत माणसापेक्षा प्रामाणिकपणाने चालणारा गरीब मनुष्य बरा.
7
सुज्ञ पुत्र शिक्षणाकडे लक्ष लावतो, परंतु खादाडांची संगत करणारा पुत्र त्याच्या वडिलांचा अब्रू घालवितो.
8
जो गरिबांकडून व्याज किंवा फायदा घेऊन संपत्ती वाढवितो, ती दुसर्याकरिता साठवितो, जो गरिबांवर दया दाखवेल.
9
जर कोणी माझ्या नियमशास्त्राकडे कानाडोळा केला, तर त्यांच्या प्रार्थनासुद्धा तिरस्करणीय वाटतात.
10
जे कोणी नीतिमानाला वाईट मार्गाकडे घेऊन जातात, ते स्वतःच्याच जाळ्यात सापडतील, परंतु निर्दोष माणसांना उत्तम वारसा मिळेल.
11
श्रीमंत माणसे त्यांच्या दृष्टीने स्वतःला शहाणे समजतात; परंतु जो गरीब आणि विवेकी आहे तो पाहतो की श्रीमंत कसे भ्रमात पडलेले आहेत.
12
नीतिमान यशस्वी झाला तर हर्षोल्हास केला जातो; पण दुष्ट प्रबल झाले असता लोक स्वतःस लपवून ठेवतात.
13
जो कोणी त्याचे पाप झाकून ठेवतो, तो समृद्ध होत नाही, परंतु जो अपराध कबूल करून ते करण्याचे सोडून देतो त्याला कृपा प्राप्त होते.
14
परमेश्वराबद्दल नेहमी भय बाळगणारा मनुष्य धन्य, परंतु मन कठोर करणारा संकटात सापडतो.
15
असहाय लोकांवर राज्य करणारा दुष्ट राजा गर्जणार्या सिंहासारखा किंवा आक्रमक अस्वलासारखा असतो.
16
जुलमी शासनकर्ता खंडणी वसूल करतो, परंतु जो कुमार्गाने मिळविलेल्या लाभाची घृणा करतो, तो पुष्कळ वर्षे राज्य करेल.
17
मनावर खुनाच्या दोषाचे ओझे असलेला यातनाग्रस्त मनुष्य कबरेमध्ये आसरा शोधेल; त्याला कोणीही थांबवू नये.
18
जो निर्दोषपणाने जीवन जगतो तो सुरक्षित राहतो, परंतु ज्याचे मार्ग विकृत आहेत तो खड्ड्यात पडेल.
19
जे आपल्या जमिनीची मशागत करतात, त्यांना विपुल अन्न प्राप्त होईल, परंतु जे काल्पनिक गोष्टींच्या मागे धावतात त्यांच्यावर दारिद्र्य येईल.
20
प्रामाणिक मनुष्याला भरपूर आशीर्वाद मिळेल, पण झटपट श्रीमंत होण्याची इच्छा धरणारा दंडापासून अलिप्त राहणार नाही.
21
पक्षपात करणे हे चांगले नाही— तरीही भाकरीच्या एका तुकड्यासाठी मनुष्य चुकीची गोष्ट करतो.
22
कंजूष माणसे श्रीमंत होण्यासाठी उतावळे असतात आणि त्यांना माहीत नसते की दारिद्र्य त्यांची वाट पाहत आहे.
23
खोटी स्तुती करणारी जीभ असलेल्या मनुष्यापेक्षा, एखाद्याची कान उघाडणी करणारा, शेवटी कृपा प्राप्त करेल.
24
जो आपल्या आईवडिलांना लुबाडतो आणि म्हणतो, “ते चुकीचे नाही,” तो नाश करणार्याचा भागीदार आहे.
25
लोभी मनुष्य भांडणे लावतो, परंतु जे याहवेहवर भरवसा ठेवतात त्यांची भरभराट होईल.
26
स्वतःवरच भरवसा ठेवणारा मनुष्य मूर्ख आहे. पण शहाणपणाने वागणारे सुरक्षित राहतील.
27
जे गरिबांना दान देतात, त्यांना कशाचीही कमतरता पडणार नाही, परंतु त्यांच्या गरजांकडे डोळेझाक करणार्यांवर पुष्कळ शाप येतील.
28
जेव्हा दुर्जन सामर्थ्यवान होतात, तेव्हा लोक लपून बसतात; परंतु दुष्टांचा नायनाट झाला कि नीतिमान वृद्धी पावतात.
← Chapter 27
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 29 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31