bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
/
Song of Solomon 1
Song of Solomon 1
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 2 →
1
हे गीतरत्न, शलोमोनाची रचना.
2
तो आपल्या मुखाच्या चुंबनांनी माझे चुंबन घेवो— कारण तुझे प्रेम हे द्राक्षारसापेक्षा आनंददायक आहे.
3
तुझ्या अत्तरांचा सुगंध सुखदायक आहे; तुझे नाव ओतलेल्या अत्तरासारखे आहे. तरुण कुमारी तुझ्यावर प्रेम करतात यात आश्चर्य नाही!
4
चल घाई करू या! मला तुझ्याबरोबर दूर घेऊन जा! राजाने मला आपल्या अंतःपुरात न्यावे. आम्ही तुझ्यामध्ये उल्हास आणि हर्षित होऊ; आम्ही द्राक्षारसापेक्षा तुझी अधिक प्रशंसा करू. त्यांनी तुझ्यावर प्रीती करणे किती यथार्थ आहे!
5
अहो यरुशलेमच्या कन्यांनो, मी सावळी असूनही सुंदर आहे, केदारच्या काळ्या तंबूसारखी, शलोमोनच्या डेर्याच्या पडद्यासारखी.
6
मी सावळी आहे म्हणून माझ्याकडे टक लावून पाहू नका, कारण मी सूर्यामुळे काळवंडले आहे. माझ्या आईची मुले माझ्यावर रागावली आणि त्यांनी मला द्राक्षमळ्याची राखण करावयास लावले; पण मी स्वतःच्या द्राक्षमळ्याकडे दुर्लक्षित केले.
7
मी तुझ्यावर प्रेम करते, तर तूच मला सांग, तुझा कळप तू कुठे चरावयास नेतो आणि मध्यानाच्या वेळी तू तुझ्या मेंढ्यांना कुठे विसाव्याला लावतोस. पडद्यात असलेल्या स्त्रीप्रमाणे तुझ्या सोबत्यांच्या कळपाच्या बाजूला मी का असावे?
8
अगे स्त्रियांमधील परमसुंदरी, जर तुला ठाऊक नाही, तर कळपांच्या ठशांचे अनुसरण करत ये आणि मेंढपाळाच्या तंबूशेजारी तू आपली करडे चार.
9
माझ्या प्रिये, फारोहच्या रथामधील घोडीशी, मी तुझी तुलना करतो.
10
तुझे गाल कर्णभूषणासह, तुझा गळा दागिन्यांच्या साखळीसह किती सुंदर आहे.
11
आपण तुझ्यासाठी सोन्याचे, रुपेजडित असे कर्णभूषण घडवून घेऊ.
12
राजा त्याच्या मेजाजवळ असता, माझ्या अत्तराचा सुगंध दरवळत होता.
13
माझा प्रियकर माझ्यासाठी माझ्या स्तनांमध्ये ठेवलेल्या गंधरसाच्या पुडीप्रमाणे आहे.
14
माझा प्रिय माझ्यासाठी जणू एन-गेदीच्या द्राक्षमळ्यात असलेल्या मेंदीच्या फुलांचा गुच्छच आहे.
15
माझ्या प्रिये, तू किती सुंदर आहेस! अहा, किती सुंदर! तुझे नयन कबुतरे आहेत.
16
माझ्या वल्लभा, तू किती सुंदर दिसतोस! अहा, किती मोहक! आणि आपले अंथरूण ताजेतवाने आहे.
17
आमच्या घराच्या तुळया केदारच्या; व छपर देवदारूच्या लाकडाचे आहे.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8