bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
1 Peter 1
1 Peter 1
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 2 →
1
पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया ह्यांत पांगलेल्या (यहूदी) लोकांतील,
2
देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार, आत्म्याच्या द्वारे होत असलेल्या पवित्रीकरणात आज्ञांकित राहण्यासाठी व त्यांच्यावर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले जे परदेशवासी आहेत, त्यांना येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याच्याकडून: तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळोत.
3
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो! जिवंत आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन मिळण्यासाठी, त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतांतून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला; जे तारण शेवटच्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे राखलेले आहात, त्या तुमच्यासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे.
6
त्याविषयी तुम्ही उल्लास करता, तरी तुम्ही आता थोडा वेळ, भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षांमुळे दु:ख सोसले;
7
ह्यासाठी की, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान अशी जी तुमच्या विश्वासाची परीक्षा ती येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यांस कारणीभूत व्हावी.
8
त्याला पाहिले नसताही त्याच्यावर तुम्ही प्रीती करता; आता तो दिसत नसता त्याच्यावर विश्वास ठेवता; आणि त्या विश्वासाचे पर्यवसान जे आपल्या जिवांचे तारण, ते उपभोगत अनिर्वाच्य गौरवयुक्त आनंदाने उल्लासता.
10
ज्या संदेष्ट्यांनी तुमच्यावर होणार्या कृपेविषयी पूर्वी सांगितले, त्यांनी त्या तारणाविषयी बारकाईने शोध केला;
11
त्यांच्यामध्ये जो ख्रिस्ताचा आत्मा होता त्याने ख्रिस्ताची दु:खे व त्यानंतरच्या गौरवयुक्त गोष्टी पूर्वीच सांगितल्या; त्यांत त्याने कोणता अथवा कसा काळ सुचवला ह्याविषयी ते शोध करत होते.
12
त्यांना असे प्रकट करण्यात आले होते की, स्वर्गातून पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हांला सुवार्ता सांगणार्यांनी त्या गोष्टी तुम्हांला आता सांगितल्या आहेत. त्या गोष्टी कळवण्याची सेवा ते स्वत:साठी नव्हे, तर तुमच्यासाठी करत होते; त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे.
13
म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हांला प्राप्त होणार्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.
14
तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागूवर्तू नका;
15
तर तुम्हांला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा;
16
कारण असा शास्त्रलेख आहे की, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.”
17
जो तोंडदेखला न्याय करत नाही, तर ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो त्याला जर तुम्ही ‘पिता म्हणून हाक मारता,’ तर आपल्या प्रवासाच्या काळात भिऊनच वागा.
18
कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून, ‘सोने व रुपे’ अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे,
19
तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने ‘तुम्ही मुक्त झाला आहात.’
20
ज्याचे पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झाले होते, तोच काळाच्या शेवटी तुमच्यासाठी प्रकट झाला.
21
तुम्ही त्याच्या द्वारे देवावर विश्वास ठेवणारे झाला आहात; त्या देवानेच त्याला मेलेल्यांतून उठवून त्याचा गौरव केला, ह्यामुळे तुमचा विश्वास व आशा देवावर आहे.
22
निर्दंभ बंधुप्रेमासाठी तुम्ही आपले जीव सत्याच्या पालनाने आत्म्याच्या द्वारे शुद्ध करून घेतले आहेत, म्हणून एकमेकांवर मनापासून निष्ठेने प्रीती करा.
23
कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून म्हणजे ‘देवाच्या जिवंत व सर्वकाल टिकणार्या’ शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात.
24
कारण, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे; आणि तिचा सर्व गौरव गवताच्या फुलासारखा आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते;
25
परंतु प्रभूचे ‘वचन सर्वकाळ टिकते.”’ ‘सुवार्तेचे जे वचन तुम्हांला सांगण्यात आले’ ते हेच होय.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5