bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
1 Peter 5
1 Peter 5
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
1
तुमच्यातील वडिलांना, जो मी सोबतीचा वडील,1 ख्रिस्ताच्या दु:खांचा साक्षी व प्रकट होणार्या गौरवाचा वाटेकरी तो मी असा बोध करतो:
2
तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करा; करावे लागते म्हणून नव्हे, तर (देवाच्या इच्छेप्रमाणे) संतोषाने त्याची देखरेख करा; द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा;
3
तुमच्या हाती सोपवलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हा;
4
मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हांला गौरवाचा न कोमेजणारा हार2 प्राप्त होईल.
5
तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी3 नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”
6
म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हांला उंच करावे.
7
त्याच्यावर तुम्ही ‘आपली’ सर्व ‘चिंता टाका’ कारण तो तुमची काळजी घेतो.
8
सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो.
9
त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा; कारण तुम्हांला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दु:खे भोगावी लागत आहेत.
10
आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ व सबळ करील.
11
त्याला गौरव व पराक्रम युगानुयुग आहे. आमेन.
12
माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान ह्याच्या हाती मी हे थोडक्यात लिहवून पाठवून ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की, ही देवाची खरी कृपा आहे, हिच्यात तुम्ही दृढ राहा.
13
बाबेलातील तुमच्यासारखी निवडलेली मंडळी तुम्हांला सलाम सांगते; आणि माझा मुलगा मार्क हाही सलाम सांगतो.
14
प्रीतीच्या चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांना शांती असो.
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
All chapters:
1
2
3
4
5