bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Daniel 12
Daniel 12
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
1
“त्या समयी तुझ्या लोकांचा कैवार घेणारा मोठा अधिपती जो मीखाएल तो उठेल; कोणतेही राष्ट्र निर्माण झाल्यापासून कधीही आले नाही असे संकट त्या समयी येईल; तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे वहीत लिहिलेली आढळतील ते सर्व त्या वेळी मुक्त होतील.
2
भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल; कित्येक सर्वकाळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्वकाळचा धिक्कार मिळवण्यास उठतील.
3
जे सुज्ञ असतील ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील; पुष्कळ लोकांना नीतिमत्तेकडे वळवणारे लोक युगानुयुग तार्यांप्रमाणे चमकतील.
4
हे दानिएला, तू अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करून ठेव; पुष्कळ लोक इकडून तिकडे फिरतील व ज्ञानवृद्धी होईल.
5
मग मी दानिएलाने पाहिले तेव्हा दुसरे दोन पुरुष, एक नदीच्या ह्या तीरास व दुसरा त्या तीरास असे उभे होते.
6
तेव्हा तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष त्या नदीच्या पाण्यावर होता, त्याला त्यांतल्या एकाने विचारले, “ह्या अद्भुत गोष्टींची समाप्ती होण्यास किती अवधी आहे?”
7
तागाची वस्त्रे ल्यालेला जो पुरुष नदीच्या पाण्यावर होता त्याने आपला उजवा व डावा हात आकाशाकडे वर करून, जो सदाजीवी त्याची शपथ वाहून म्हटल्याचे मी ऐकले, “एक समय, दोन समय व अर्धा समय एवढा अवधी आहे; पवित्र प्रजेच्या बलाचा चुराडा करण्याचे संपेल तेव्हा ह्या सर्व गोष्टी पूर्ण होतील.”
8
मी हे ऐकले, पण समजलो नाही; तेव्हा मी म्हणालो, “हे माझ्या स्वामी, ह्या गोष्टींचा परिणाम काय?”
9
तो म्हणाला, “हे दानिएला, तू आपला स्वस्थ राहा; कारण अंतसमयापर्यंत ही वचने गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत.
10
पुष्कळ लोक आपणांस शुद्ध व शुभ्र करतील; ते स्वच्छ होतील; पण दुर्जन दुर्वर्तन करतील; दुर्जनांपैकी कोणाला समज मिळणार नाही; पण जे सुज्ञ आहेत त्यांना तो प्राप्त होईल.
11
नित्याचे बलिहवन बंद होईल व विध्वंसमूलक अमंगलाची स्थापना होईल, तेव्हापासून एक हजार दोनशे नव्वद दिवस लोटतील.
12
जो धीर धरून तेराशे पस्तीस दिवसांची अखेर पाहील तो धन्य.
13
तथापि अंतापर्यंत तू जाऊन स्वस्थ राहा; म्हणजे तुला आराम मिळेल आणि तू युगाच्या समाप्तीस आपले वतन प्राप्त करून घेण्यास उठशील.
← Chapter 11
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12