bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Daniel 3
Daniel 3
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 4 →
1
नबुखद्नेस्सर राजाने सुवर्णाची एक मूर्ती केली, तिची उंची साठ हात व रुदी सहा हात होती; तिची स्थापना त्याने बाबेल परगण्यातील दूरा नामक मैदानात केली.
2
ही जी मूर्ती नबुखद्नेस्सर राजाने स्थापली होती तिची प्रतिष्ठापना करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी ह्यांनी एकत्र जमावे म्हणून त्यांना बोलावणे केले.
3
तेव्हा राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार, मंत्री, भांडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी हे नबुखद्नेस्सर राजाने स्थापलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यास एकत्र जमले आणि तिच्यासमोर उभे राहिले.
4
मग एका भाटाने मोठ्याने घोषणा केली की, “अहो लोकांनो, निरनिराळ्या राष्ट्रांतील निरनिराळ्या भाषा बोलणार्या लोकांनो, तुम्हांला आज्ञा होत आहे की,
5
शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी तुमच्या कानी पडताच नबुखद्नेस्सर राजाने जी सुवर्णमूर्ती स्थापली आहे तिच्यापुढे तुम्ही साष्टांग दंडवत घालावेत;
6
जो कोणी तिला साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला तत्क्षणीच धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकतील.”
7
तेव्हा शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा वगैरे वाद्यांचा ध्वनी कानी पडताच निरनिराळ्या राष्ट्रांतील निरनिराळ्या भाषा बोलणार्या सर्व लोकांनी नबुखद्नेस्सर राजाने स्थापलेल्या त्या सुवर्णमूर्तीपुढे साष्टांग दंडवत घातले.
8
ह्यावर कित्येक खास्द्यांनी राजाकडे जाऊन यहूद्यांवर दोषारोप केला.
9
ते नबुखद्नेस्सर राजाला म्हणाले, “महाराज, चिरायू व्हा.
10
महाराज, आपण हुकूम केला की, शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ज्या ज्या मनुष्याच्या कानी पडेल त्याने सुवर्णमूर्तीपुढे साष्टांग दंडवत घालावेत;
11
आणि जो कोणी साष्टांग दंडवत घालणार नाही त्याला धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकावे;
12
पण आपण बाबेल परगण्यावर नेमलेले शद्रख, मेशख, अबेद्नगो ह्या नावांचे कोणी यहूदी आहेत त्यांनी, महाराज, आपली पर्वा केली नाही; ते आपल्या देवांची उपासना करीत नाहीत आणि आपण स्थापलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करीत नाहीत.”
13
हे ऐकून नबुखद्नेस्सराने क्रोधाने संतप्त होऊन शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना घेऊन येण्याची आज्ञा केली. तेव्हा लोकांनी त्यांना राजापुढे आणले.
14
नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, “अहो शद्रख, मेशख, अबेद्नगो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करीत नाही व मी स्थापलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करीत नाही, असे तुम्ही मुद्दाम करता काय?
15
आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे; नाही घातले तर तुम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल; माझ्या हातांतून तुम्हांला सोडवील असा कोणता देव आहे?”
16
शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांनी राजाला उत्तर दिले की, “महाराज, ह्या बाबतीत आपणांला उत्तर देण्याचे आम्हांला प्रयोजन दिसत नाही.
17
ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीतून सोडवण्यास समर्थ आहे; महाराज, तो आम्हांला आपल्या हातातून सोडवील.
18
ते कसेही असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा की आम्ही आपल्या दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही.”
19
हे ऐकून नबुखद्नेस्सर संतापला; शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्यासंबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की, ‘भट्टी नेहमीपेक्षा सातपट तप्त करा.’
20
मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ठ पुरुषांना आज्ञा केली की, ‘शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्या मुसक्या बांधून त्यांना त्या तप्त अग्नीच्या भट्टीत टाका.’
21
तेव्हा त्या पुरुषांना त्यांचे पायमोजे, अंगरखे, झगे वगैरे वस्त्रांसहित बांधून धगधगीत अग्नीच्या भट्टीत टाकले.
22
राजाचा हुकूम अगदी सक्त असल्यामुळे ती भट्टी फारच तप्त केली होती; म्हणून ज्या पुरुषांनी शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना तिच्यावर नेले ते ज्वालांनी भाजून मेले.
23
शद्रख, मेशख व अबेद्नगो हे तीन पुरुष मुसक्या बांधलेले असे त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीत पडले.
24
नंतर नबुखद्नेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला; तो आपल्या मंत्र्यांना म्हणाला, “आपण अग्नीत तिघा जणांना बांधून टाकले ना?” त्यांनी राजाला उत्तर केले, “होय महाराज, खरे आहे.”
25
तो म्हणाला, पाहा! चार इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते; त्यांना काहीएक इजा पोहचली नाही; चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे.
26
मग नबुखद्नेस्सर त्या धगधगीत अग्नीच्या भट्टीच्या दारानजीक येऊन म्हणाला, “अहो शद्रख, मेशख व अबेद्नगो, परात्पर देवाचे सेवकहो, अग्नीतून बाहेर या.” तेव्हा शद्रख, मेशख व अबेद्नगो अग्नीतून बाहेर आले.
27
आणि राजप्रतिनिधी, नायब अधिपती, सरदार व राजमंत्री जे तेथे जमले होते त्यांनी ह्या पुरुषांना पाहिले तेव्हा त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झाला नव्हता, त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता, त्यांच्या पायमोजांना काही झाले नव्हते आणि अग्नीचा गंधही त्यांना लागला नव्हता.
28
तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करायची नाही म्हणून त्यांनी आपले देह अर्पण केले; त्यांना त्यांच्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सोडवले आहे; त्याचा धन्यवाद असो!
29
ह्याकरता मी फर्मावतो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्राचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक, ह्यांपैकी जे कोणी शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील त्यांचे तुकडे-तुकडे करण्यात येतील; त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील; कारण अशा प्रकारे सोडवण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही.”
30
नंतर राजाने शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांना बाबेल परगण्यात मोठ्या हुद्द्यास चढवले.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12