bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Job 31
Job 31
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 30
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 32 →
1
“मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?
2
वरून देवाकडून काय वाट्यास येणार? ऊर्ध्वलोकाहून कोणते वतन सर्वसमर्थ भोगायला लावणार?
3
दुष्टाला विपत्ती व दुष्कर्म्याला अनर्थ प्राप्त होत नाही काय?
4
माझे सर्व मार्ग तो पाहत नाही काय? माझी सर्व पावले तो गणत नाही काय?
5
मी असत्याची सोबत केली असली, माझ्या पायांनी कपटाकडे धाव घेतली असली,
6
तर त्याने मला न्यायाच्या ताजव्यात तोलावे; देवाला माझी सात्त्विकता कळून येऊ द्या.
7
माझे पाऊल आडमार्गावर पडले असले, माझ्या मनाने माझ्या डोळ्यांमागून धाव घेतली असली, माझ्या हातांना काही डाग लागला असला,
8
तर मी पेरले ते दुसरा खावो; लोक माझ्या शेतातले पीक उपटून टाकोत;
9
माझे मन कोणा स्त्रीला पाहून मोहित झाले असले, मी आपल्या शेजार्याच्या दाराशी टपून बसलो असलो,
10
तर माझी स्त्री दुसर्याचे दळणकांडण करो; परके तिला ओणवी करोत.
11
कारण हे दुष्कर्म आहे; हा न्यायाधीशांनी शिक्षा करण्याजोगा गुन्हा आहे.
12
कारण हा कामाग्नी भस्म करून नाशाप्रत नेतो; त्याच्या पायी माझी सर्व मालमत्ता समूळ नष्ट झाली असती.
13
माझा दास व दासी माझ्याशी वाद करीत असता, मी त्यांचा हक्क तुच्छ लेखला असता,
14
तर देव माझा न्याय करायला उठल्यास मी काय केले असते? त्याने झाडा घेतला असता तर मी काय जाब दिला असता?
15
ज्याने मला गर्भाशयात निर्माण केले त्याने त्यालाही नाही का केले? आम्हा दोघांनाही गर्भाशयात एकानेच नाही का घडवले?
16
मी कंगालांचा आशाभंग केला असला, विधवेचे डोळे शिणवले असले,
17
मी आपला भाकरतुकडा एकट्यानेच खाल्ला असला, त्यातला काही पोरक्याला दिला नसला,
18
(माझ्या बाळपणापासून बापाकडे जसा मुलगा तसा तो माझ्याजवळ लहानाचा मोठा झाला आहे, लहानपणापासून मी विधवेचा सांभाळ करीत आलो आहे.)
19
अथवा कोणी वस्त्रावाचून मरत आहे, कोणा दरिद्र्यास पांघरूण नाही हे पाहून,
20
त्यांना मी आपल्या मेंढरांच्या लोकरीची वस्त्रे दिली नसली, त्यांच्या अवयवांना ऊब येईलसे करून त्यांचा आशीर्वाद घेतला नसला,
21
वेशीवर कोणी आपल्या पक्षाचा आहे हे पाहून मी पोरक्यावर आपला हात उचलला असला;
22
तर माझी खवाटे पाठीतून निखळून पडोत, माझे हात खांद्यांच्या सांध्यातून मोडून पडोत.
23
देवापासून येणार्या विपत्तीचा मला धाक असे; त्याच्या प्रभावापुढे माझे काही चालत नसे.
24
जर मी सुवर्णावर भरवसा ठेवला असता, तुझ्यावर माझी भिस्त आहे असे सुवर्णास म्हटले असते,
25
जर माझे धन बहुत आहे, माझ्या हातांनी फार कमाई केली आहे, ह्याचा मी आनंद केला असता,
26
जर सूर्याला प्रकाशताना पाहून, चंद्राला थाटाने भ्रमण करताना पाहून,
27
माझे मन गुप्तपणे मोहित झाले असते, आणि आपल्या हाताचे चुंबन घेऊन मी त्यांना नमन केले असते,
28
तर हाही न्यायाधीशांपुढे नेण्याजोगा गुन्हा झाला असता; अशाने ऊर्ध्वलोकाच्या देवाशी मी दगा केला असे झाले असते.
29
माझ्या द्वेष्ट्याचा नाश झालेला पाहून मला आनंद वाटला असता, त्याच्यावर अरिष्ट आले हे पाहून मला उल्हास वाटला असता,
30
(त्याचा प्राणनाश व्हावा असा शाप मागून मी आपल्या जिव्हेस पाप करू दिले नाही,)
31
‘ह्याच्या घरी मांसान्नाने तृप्ती झाली नाही असा एक तरी आढळेल,’ असे माझ्या डेर्यातल्या लोकांनी म्हटले नसेल,
32
(कोणा परक्याला माझ्या दाराबाहेर बिर्हाड करून राहण्याची पाळी आली नाही; वाटसरूला माझे दार खुले असे.)
33
जनसमूहाला भिऊन, कुलीन घराणी मला नावे ठेवतील ह्याचा धाक वाटून मी गपचूप राहिलो व घराबाहेर पडलो नाही, माणसांसारखे1 मी आपल्या अपराधावर झाकण घातले असते, माझे पाप मनातल्या मनात लपवले असते तर,
35
माझे कोणी ऐकणारा असता तर किती बरे होते! (हेच माझे दस्तखत; सर्वसमर्थाने मला जाब द्यावा;) माझ्या प्रतिवाद्याचा लेखी आरोप दाखल झाला असता तर बरे झाले असते.
36
तो मी आपल्या खांद्यावर वागवला असता; शिरोभूषणाप्रमाणे तो डोक्याला वेष्टला असता.
37
मी पावलापावलाचा हिशोब त्याला दिला असता; त्याच्याजवळ मी सरदारासारखा गेलो असतो.
38
माझ्या शेताने माझ्याविरुद्ध गार्हाणे केले असेल, त्याच्या सर्व तासांनी मिळून आक्रोश केला असेल,
39
मोबदला दिल्यावाचून त्यातले पीक मी खाल्ले असेल, त्याच्या मालकाच्या प्राणोत्क्रमणास कारण झालो असेन,
40
तर त्यात गव्हाच्या ऐवजी काटेधोतरे, जवाच्या ऐवजी कुसळे उगवोत.” येथे ईयोबाचे भाषण समाप्त झाले.
← Chapter 30
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 32 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42