bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Jonah 2
Jonah 2
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 3 →
1
माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना केली;
2
तो म्हणाला, “मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा धावा केला, तेव्हा त्याने माझे ऐकले; अधोलोकाच्या उदरातून मी आरोळी केली, तेव्हा तू माझा शब्द ऐकलास.
3
तू मला डोहात, समुद्राच्या पोटात टाकलेस, प्रवाहाने मला व्यापले; तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले.
4
मी म्हणालो, ‘तुझ्या दृष्टिवेगळे मला फेकून दिले आहे; तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन्हा डोळे लावीन.’
5
जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापले, डोहाने चोहोकडून मला घेरले; समुद्रातील शेवाळाने माझे डोके वेष्टले.
6
मी खाली पर्वतांच्या तळी गेलो होतो; पृथ्वीच्या अडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले होते; तरी परमेश्वरा, माझ्या देवा, तू गर्तेतून माझा जीव उद्धरला आहेस.
7
माझा जीव माझ्या ठायी व्याकूळ झाला तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले; माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्याजवळ पोहचली.
8
जे निरर्थक मूर्तींना भजतात, ते आपल्या दयाघनास सोडून देतात;
9
पण मी तुला आभारप्रदर्शनाचे यज्ञ करीन; मी केलेले नवस फेडीन; तारण परमेश्वरापासून होते.”
10
परमेश्वराने माशाला आज्ञा केली, तेव्हा त्याने योनास कोरड्या भूमीवर ओकून टाकले.
← Chapter 1
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 3 →
All chapters:
1
2
3
4