bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Jonah 3
Jonah 3
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 4 →
1
परमेश्वराचे वचन दुसर्यांदा योनाला प्राप्त झाले की,
2
“ऊठ; त्या मोठ्या निनवे शहरास जा व मी तुला सांगेन तो संदेश त्याला आरोळी करून सांग.”
3
तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास तीन दिवस लागत.
4
योना त्यातून एक दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की, “चाळीस दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल.”
5
तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर विश्वास ठेवला, त्यांनी उपास नेमला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठांपर्यंत सर्व गोणताट नेसले.
6
निनवेच्या राजाला हे वर्तमान समजले तेव्हा तो आपल्या आसनावरून उठला व आपल्या अंगातला झगा काढून गोणताट नेसून राखेत बसला.
7
त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेभर प्रसिद्ध केला की, “कोणा माणसाने, पशूने, गुराढोरांनी व शेरडामेंढरांनी काही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये.
8
तर मनुष्याने व पशूने गोणताट नेसावे, देवाचा मोठ्याने धावा करावा आणि प्रत्येकाने आपल्या कुमार्गापासून आपल्या हातच्या जुलूमापासून मागे फिरावे.
9
देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही.”
10
देवाने त्यांचे वर्तन पाहिले म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले; तेव्हा ‘त्यांच्यावर अरिष्ट आणीन’ असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4