bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Mark 11
Mark 11
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 12 →
1
ते यरुशलेमेजवळ जैतुनांच्या डोंगरापाशी बेथफगे व बेथानीजवळ येऊन पोहचले, तेव्हा त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना असे सांगितले की,
2
“समोरच्या गावात जा; त्यात जाताच तुम्हांला एक शिंगरू बांधलेले आढळेल. त्याच्यावर कोणी कधीच बसले नाही; ते सोडून आणा.
3
आणि ‘तुम्ही असे का करता?’ असे जर कोणी तुम्हांला विचारले तर असे सांगा की, ‘प्रभूला ह्याची गरज आहे आणि तो लगेचच ते इकडे परत पाठवील.”’
4
तेव्हा ते निघाले आणि रस्त्यावर दाराशी बाहेर बांधलेले एक शिंगरू त्यांना आढळले, ते त्यांनी सोडले.
5
तेव्हा तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना म्हणू लागले, “शिंगरू सोडून तुम्ही काय करीत आहात?”
6
येशूने सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्यांना उत्तर दिले; तेव्हा त्यांनी त्यांना जाऊ दिले.
7
नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले, त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो त्याच्यावर बसला.
8
तेव्हा पुष्कळ लोकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली; इतर लोकांनी शेतामळ्यांतून डाहळ्या तोडून आणून त्या वाटेवर पसरल्या.
9
आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले की, “‘होसान्ना, प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद असो;’
10
आमचा बाप दावीद ह्याचे [प्रभूच्या नावाने] येणारे राज्य धन्यवादित असो; ‘उर्ध्वलोकी होसान्ना.”’
11
नंतर येशू यरुशलेमेत आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्वकाही पाहिल्यावर संध्याकाळ झाली, म्हणून तो आपल्या बारा शिष्यांसह बेथानीस निघून गेला.
12
दुसर्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली.
13
तेव्हा पानांनी डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले, आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो तिकडे गेला; परंतु तेथे गेल्यावर पानांवाचून त्याला काही आढळले नाही; कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता.
14
तेव्हा तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे कोणीही तुझे फळ कधीही न खावो.” त्याचे शिष्य हे ऐकत होते.
15
मग ते यरुशलेमेस येऊन पोहचल्यावर येशू मंदिरात गेला व मंदिरात क्रय-विक्रय करणार्यांना बाहेर घालवून देऊ लागला. त्याने सराफांचे चौरंग व कबुतरे विकणार्यांच्या बैठका उलथून टाकल्या;
16
त्याने कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरामधून नेआण करू दिली नाही.
17
मग तो त्यांना शिक्षण देऊ लागला व म्हणाला की, “‘माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील,’ असा शास्त्रलेख आहे ना? परंतु तुम्ही तर ही ‘लुटारूंची गुहा’ करून टाकली आहे.”
18
मुख्य याजकांनी व शास्त्र्यांनी हे ऐकले आणि त्याचा घात कसा करावा ह्याविषयी ते युक्ती योजू लागले; कारण सर्व लोक त्याच्या शिक्षणावरून थक्क झाल्याकारणाने ते त्याला भीत होते.
19
रोज संध्याकाळी ते शहराच्या बाहेर जात असत.
20
मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले.
21
तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पाहा.”
22
येशूने त्यांना उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा.
23
मी तुम्हांला खचीत सांगतो की, जो कोणी ह्या डोंगराला ‘तू उपटून समुद्रात टाकला जा,’ असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता, आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल.
24
म्हणून मी तुम्हांला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हांला मिळेल.
25
आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करण्यास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हांला तुमच्या अपराधांची क्षमा करावी.
26
[परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.]”
27
मग ते पुन्हा यरुशलेमेस आले, आणि तो मंदिरात फिरत असता मुख्य याजक, शास्त्री व वडील त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले,
28
“तुम्ही कोणत्या अधिकाराने ह्या गोष्टी करता आणि त्या करण्याचा हा अधिकार तुम्हांला कोणी दिला?”
29
येशू त्यांना म्हणाला, “मीही तुम्हांला एक प्रश्न विचारतो. मला उत्तर द्या म्हणजे ह्या गोष्टी मी कोणत्या अधिकाराने करीत आहे ते मी तुम्हांला सांगेन.
30
योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून होता किंवा माणसांपासून होता ह्याचे मला उत्तर द्या.”
31
तेव्हा ते आपसांत विचार करू लागले: ‘स्वर्गापासून होता’ असे म्हणावे तर तो म्हणेल की, ‘तर मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेवला नाही?’
32
‘माणसांपासून होता’ असे म्हणावे तर? - त्यांना लोकांची भीती वाटत होती, कारण योहान खरोखरच संदेष्टा होता असे सर्व लोक मानत.
33
तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, “आम्हांला ठाऊक नाही.” येशू त्यांना म्हणाला, “तर मग कोणत्या अधिकाराने मी ह्या गोष्टी करीत आहे ते मीही तुम्हांला सांगत नाही.”
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 12 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16