bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Mark 13
Mark 13
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 14 →
1
मग तो मंदिरातून निघून जात असता एक शिष्य त्याला म्हणाला, “गुरूजी, पाहा, कसे हे चिरे व कशा ह्या इमारती!”
2
येशू त्याला म्हणाला, “ह्या मोठ्या इमारती तू पाहतोस ना? जमीनदोस्त केला जाणार नाही असा चिर्यावर चिरा येथे राहणार नाही.”
3
नंतर तो मंदिरासमोर जैतुनांच्या डोंगरावर बसला असता पेत्र, याकोब, योहान व अंद्रिया ह्यांनी त्याला एकान्तात विचारले,
4
“ह्या गोष्टी कधी घडतील? आणि ह्या सर्व गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास आल्या म्हणजे काय चिन्ह होईल हे आम्हांला सांगा.”
5
येशू त्यांना म्हणू लागला, “तुम्हांला कोणी फसवू नये म्हणून सावध राहा.
6
पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन ‘मीच तो [ख्रिस्त] आहे’ असे म्हणून पुष्कळांची फसगत करतील.
7
आणखी तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या अफवा ऐकाल तेव्हा घाबरू नका; ह्या गोष्टी होणे आवश्यक आहे; परंतु तेवढ्यानेच शेवट होणार नाही.
8
कारण, ‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल’. आणि जागोजागी भूमिकंप [व दंगे] होतील व दुष्काळ पडतील; हा तर वेदनांचा प्रारंभ होय.
9
तुम्ही आपणांला सांभाळा; कारण ते तुम्हांला न्यायसभांच्या स्वाधीन करतील, सभास्थानांमध्ये तुम्हांला मार देतील आणि सुभेदार व राजे ह्यांच्यापुढे तुम्ही साक्ष द्यावी म्हणून तुम्हांला माझ्याकरता त्यांच्यासमोर उभे राहावे लागेल.
10
प्रथम सर्व राष्ट्रांत सुवार्तेची घोषणा झाली पाहिजे.
11
ते तुम्हांला धरून नेऊन चौकशीकरता स्वाधीन करतील तेव्हा आपण कसे काय बोलावे ह्याविषयी अगोदर चिंता करू नका; तर त्या घटकेस जे काही तुम्हांला सुचवून दिले जाईल ते बोला; कारण बोलणारे तुम्ही आहात असे नाही तर पवित्र आत्मा हाच बोलणारा आहे.
12
तेव्हा भाऊ आपल्या भावाला व बाप आपल्या मुलाला ठार मारवण्याकरता धरून देईल आणि ‘मुले आपल्या आईबापांवर उठतील’ व त्यांचा प्राणघात करवतील;
13
आणि माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत टिकाव धरून राहील तोच तारला जाईल.
14
[दानीएल संदेष्ट्याने सांगितलेला] ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ जेथे नसावा तेथे तो उभा असलेला तुम्ही पाहाल (वाचकाने हे समजून घ्यावे), तेव्हा जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरांकडे पळून जावे.
15
जो धाब्यावर असेल त्याने खाली उतरून अथवा आपल्या घरातून काही घेण्याकरता आत जाऊ नये;
16
आणि जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता परत येऊ नये.
17
त्या दिवसांत ज्या स्त्रिया गरोदर किंवा अंगावर पाजणार्या असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार!
18
तरी हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा.
19
कारण देवाने निर्माण केलेल्या ‘सृष्टीच्या प्रारंभापासून आजपर्यंत झालेल्या नाहीत’ व पुढेही होणार नाहीत ‘इतक्या हालअपेष्टांचे’ ते दिवस होतील.
20
आणि ते दिवस प्रभूने कमी केले नसते तर कोणाही माणसाचा निभाव लागला नसता; परंतु ज्यांना त्याने निवडले आहे त्या निवडलेल्यांसाठी त्याने ते दिवस कमी केले आहेत.
21
त्या वेळेस जर कोणी तुम्हांला म्हणेल की, ‘पाहा ख्रिस्त अमुक ठिकाणी आहे,’ ‘पाहा, तमुक ठिकाणी आहे,’ तर ते खरे मानू नका.
22
कारण खोटे ख्रिस्त व ‘खोटे संदेष्टे’ उपस्थित होतील, आणि साधेल तर निवडलेल्यांनादेखील फसवावे म्हणून ‘चिन्हे व अद्भुते दाखवतील.’
23
तुम्ही तर सावध राहा; मी अगोदरच तुम्हांला सर्वकाही सांगून ठेवले आहे.
24
परंतु ही संकटे येऊन गेल्यावर त्या दिवसांत ‘सूर्य अंधकारमय होईल, आणि चंद्र प्रकाश देणार नाही;’
25
आकाशातून ‘तारे गळून पडतील व आकाशातील बळे’ डळमळतील.
26
तेव्हा ‘मनुष्याचा पुत्र’ मोठ्या पराक्रमाने व वैभवाने ‘मेघांरूढ होऊन येत असलेला’ दृष्टीस पडेल.
27
त्या वेळेस तो देवदूतांना पाठवून ‘चार दिशांकडून, अर्थात पृथ्वीच्या’ सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत ‘आपल्या निवडलेल्या लोकांना’ एकत्र करील.
28
आता अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या; त्याची डाहळी कोमल झाली आणि तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळच आला आहे हे तुम्हांला कळते.
29
त्याप्रमाणेच ह्या गोष्टी घडत असलेल्या तुम्हांला दिसतील तेव्हा तो जवळ, अगदी दाराशी येऊन ठेपला आहे असे समजा.
30
मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो की, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.
31
आकाश व पृथ्वी ही नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत.
32
आणखी त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी कोणाला ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही, पुत्रालाही नाही, केवळ पित्याला ठाऊक आहे.
33
सावध असा, जागृत राहा व प्रार्थना करा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हांला ठाऊक नाही.
34
प्रवासाला जात असलेल्या कोणाएका माणसाने आपले घर सोडतेवेळी आपल्या नोकरांना अधिकार देऊन ज्याचे त्याला काम नेमून द्यावे व द्वारपाळास जागृत राहण्याची आज्ञा करावी तसे हे आहे.
35
म्हणून जागृत राहा; कारण घरधनी केव्हा येईल, संध्याकाळी, मध्यरात्रीस, कोंबडा आरवण्याच्या वेळी किंवा सकाळी हे तुम्हांला माहीत नाही;
36
नाहीतर अकस्मात येऊन तो तुम्हांला झोपा काढत असलेले पाहील.
37
जे मी तुम्हांला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.”
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 14 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16