bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
1 John 1
1 John 1
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 2 →
1
जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले आहे, होय, जे आम्ही पाहिले आहे व ज्याला आमच्या हातांनी स्पर्श केला आहे त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही लिहीत आहोत.
2
हे जीवन दृश्यमान झाले, ते आम्ही पाहिले आहे व त्याची आम्ही साक्ष देतो. हे शाश्वत जीवन पित्याजवळ होते व ते आम्हांला प्रकट झाले, ते तुम्हांला जाहीर करतो.
3
जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे, ते तुम्हांला ह्यासाठी कळवितो की, तुम्हीही आमच्यात सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबर आहे.
4
आपला आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही लिहितो.
5
जो संदेश आम्ही त्याच्याकडून ऐकला आहे, तो तुम्हांला जाहीर करतो. तो संदेश हा की, देव प्रकाश आहे आणि त्याच्यामध्ये मुळीच अंधार नाही.
6
त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे, असे जर आपण म्हणतो व अंधारात चालतो, तर आपण खोटे बोलतो; सत्याने वागत नाही.
7
पण जसा तो प्रकाशात आहे, तसे जर आपण प्रकाशात असलो, तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते.
8
आपल्यामध्ये पाप नाही, असे जर आपण म्हणतो, तर आपण स्वतःला फसवितो व आपल्यामध्ये सत्य नाही.
9
मात्र जर आपण आपली पापे कबूल केली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून तो आपल्या पापाची क्षमा करील व सर्व अनीतिमत्त्वापासून आपल्याला शुद्ध करील.
10
आपण पाप केले नाही, असे जर आपण म्हटले, तर आपण देवाला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्यामध्ये नाही.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5