bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
1 John 5
1 John 5
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
1
येशू हा ख्रिस्त आहे, असा विश्वास जो कोणी धरतो, तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी पित्यावर प्रीती करतो, तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो.
2
आपण देवावर प्रीती करतो व त्याच्या आज्ञा पाळतो तेव्हा त्यावरून आपल्याला कळून येते की, आपण देवाच्या मुलांवर प्रीती करतो.
3
देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय आणि त्याच्या आज्ञा फार कठीण नाहीत.
4
जो देवापासून जन्मलेला आहे तो जगावर जय मिळवतो आणि जगावरील जय म्हणजेच आपली श्रद्धा.
5
येशू देवाचा पुत्र आहे असा विश्वास जो ठेवतो, त्याच्यावाचून जगावर जय मिळविणारा कोण आहे?
6
जो पाण्याने व रक्ताने आला तो हाच, म्हणजे येशू ख्रिस्त, केवळ पाण्याने नव्हे, तर पाण्याने व रक्तानेही आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे.
7
साक्ष देणारे तिघे आहेत: आत्मा, पाणी व रक्त.
8
ह्या तिघांची साक्ष एकच आहे.
9
आपण माणसाची साक्ष स्वीकारतो, पण तिच्यापेक्षा देवाची साक्ष मोठी आहे. देवाने आपल्या पुत्राविषयी दिली, तीच ही त्याची साक्ष आहे.
10
जो देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या मध्येच साक्ष आहे. ज्याने देवावर विश्वास ठेवला नाही त्याने त्याला लबाड ठरवले आहे, कारण जी साक्ष देवाने आपल्या पुत्राविषयी दिली आहे, तिच्यावर त्याने विश्वास ठेवला नाही.
11
ती साक्ष हीच आहे की, देवाने आपल्याला शाश्वत जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे.
12
ज्याला तो पुत्र लाभला आहे, त्याला जीवन लाभले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही.
13
देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हांला शाश्वत जीवन लाभले आहे, हे तुम्हांला कळावे म्हणून मी तुम्हांला लिहिले आहे.
14
त्याच्यासमोर येण्यास आपल्याला जो आत्मविश्वास वाटतो तो ह्यावरून की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले, तर तो आपले ऐकतो.
15
आपण जे काही मागतो, ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे, म्हणून जे आपण त्याच्याजवळ मागतो, ते तो आपल्याला देतो, हेही आपल्याला ठाऊक आहे.
16
ज्याचा परिणाम मरण नाही, असे पाप करताना आपल्या बंधूला कोणी पाहिले, तर त्याने त्याच्याकरता देवाजवळ मागावे म्हणजे तो त्याला जीवन देईल, अर्थात ज्याचा परिणाम मरण नाही, असे पाप करणाऱ्याला ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे, असेही पाप आहे आणि ह्याविषयी मागावे असे मी म्हणत नाही.
17
सर्व प्रकारची अनीती पापच आहे, तरीपण ज्याचा परिणाम मरण नाही, असेही पाप आहे.
18
जो कोणी देवापासून जन्मलेला आहे, तो पाप करत नाही, हे आपल्याला ठाऊक आहे. जो देवापासून जन्मलेला आहे, त्याला देवपुत्र ख्रिस्त सुरक्षित ठेवतो आणि सैतान त्याला उपद्रव करू शकत नाही.
19
सगळे जग त्या दुष्टाला वश झालेले असले, तरीही आपण देवापासून आहोत, हे आपल्याला ठाऊक आहे.
20
आपल्याला ठाऊक आहे की, देवाचा पुत्र आला आहे आणि जो सत्य आहे, त्या परमेश्वराला ओळखण्याची समज त्याने आपल्याला दिली आहे. जो सत्य आहे त्याच्यामध्ये, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याबरोबरच्या ऐक्यात आपण जीवन जगत आहोत. हाच खरा देव आहे आणि हेच खरे शाश्वत जीवन आहे.
21
माझ्या मुलांनो, तुम्ही स्वतःला खोट्या दैवतांपासून दूर राखा.
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
All chapters:
1
2
3
4
5