bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
1 Thessalonians 3
1 Thessalonians 3
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 4 →
1
आमच्याने आणखी धीर धरवेना म्हणून अथेनैमध्येच एकटे मागे राहावे, असे आम्ही ठरविले.
2
ख्रिस्ताच्या शुभवर्तमानासाठी देवाचा सेवक, आपला बंधू तीमथ्य ह्याला आम्ही ह्यासाठी पाठविले की, त्याने तुम्हांला स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा.
3
तो असा की, ह्या छळात कोणीही विचलित होऊ नये; कारण हा छळ म्हणजे देवाच्या योजनेचाच एक भाग आहे, हे तुम्ही स्वतः जाणून आहात.
4
आम्ही तुमच्याजवळ होतो, तेव्हा तुम्हांला अगोदर सांगून ठेवले होते की, आपल्याला छळ सहन करावा लागणार आहे आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हांला कळले आहे.
5
ह्यामुळे मलाही आणखी धीर धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्याकरिता तीमथ्यला पाठविले. सैतानाने तुम्हाला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ होतील अशी मला भीती वाटली.
6
आता तीमथ्यने तुमची भेट घेतल्यानंतर आमच्याकडे येऊन, तुमचा विश्वास व प्रीती ह्यांविषयी आणि जशी तुम्हांला भेटायची आम्हांला उत्कंठा आहे, तशी तुम्हांलादेखील आम्हांला भेटायची उत्कंठा आहे आणि तुम्ही आमची नेहमी प्रेमाने आठवण करता, ह्याविषयीचे आनंददायक वृत्त आम्हांला कळविले.
7
ह्यामुळे बंधूंनो, आम्हांला आमच्या सर्व संकटांत व छळात तुमच्या विश्वासावरून प्रोत्साहन मिळाले;
8
कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिरचित्त असला, तर आता आमच्या जिवात जीव आल्यासारखे होईल.
9
तुमच्यामुळे आम्ही आपल्या देवापुढे जो आनंदीआनंद करत आहोत, त्याबद्दल तुमच्यासंबंधाने आम्ही त्याचे आभार मानावेत तितके थोडे आहेत.
10
आम्ही रात्रंदिवस अत्यंत कळकळीने प्रार्थना करतो की, आम्ही तुम्हांला प्रत्यक्ष पाहावे आणि तुमच्या विश्वासातील उणिवा दूर कराव्यात.
11
देव आपला पिता हा स्वतः व आपला प्रभू येशू हा आमचे तुमच्याकडे येणे निर्विघ्न करो.
12
जशी आमची प्रीती तुमच्यावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो.
13
अशा प्रकारे आपला प्रभू येशू त्याच्या सर्व पवित्र लोकांसह येईल त्या वेळेस त्याने तुम्हांला देव आपला पिता ह्याच्यापुढे पवित्रतेत परिपूर्ण होण्यासाठी सशक्त करावे.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4
5