bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
1 Thessalonians 4
1 Thessalonians 4
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 5 →
1
बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये विनंती व आवाहन करतो की, तुम्ही कसे वागून देवाला प्रसन्न करून घ्यावे हे तुम्ही आमच्याकडून ऐकून घेतले व तुम्ही खरोखर त्याप्रमाणे वागत आहात, त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी;
2
कारण प्रभू येशूच्या अधिकाराने आम्ही तुम्हांला कोणते निर्देश दिले, ते तुम्हांला ठाऊक आहेत.
3
देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही लैंगिक अनैतिकतेपासून स्वतःस अलिप्त ठेवावे.
4
तुमच्यामधील प्रत्येकाने स्वत:च्या शरीरावर ताबा मिळवून पवित्र व सन्माननीय जीवन कसे जगावे, हे जाणून घ्यावे.
5
देवाला न ओळखणाऱ्या यहुदीतरांप्रमाणे कामवासनेने तुम्ही वागू नये.
6
कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूंचा गैरफायदा घेऊ नये, हे आम्ही तुम्हांला अगोदरच सांगितले होते व प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, असे तुम्हांला शपथपूर्वक बजावले होते.
7
देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्र्यासाठी पाचारण केले आहे.
8
म्हणून जो कोणी ह्या शिकवणीचा अव्हेर करतो, तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो.
9
बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हांला लिहावे, ह्याची तुम्हांला गरज नाही, कारण एकमेकांवर कशी प्रीती करावी, हे तुम्हांला देवाने शिकविले आहे.
10
अखिल मासेदोनियातील सर्व बंधुजनांवर तुम्ही प्रीती करीतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हांला आवाहन करतो की, ती उत्तरोत्तर अधिक करावी.
11
आम्ही तुम्हांला पूर्वी सांगितल्याप्रमाणे शांतीने जीवन जगणे, आपापल्या व्यवसायात मग्न असणे व स्वतः मेहनत करणे, हे तुमचे ध्येय असू द्या.
12
अशा प्रकारे जे बाहेरील आहेत त्यांच्या सन्मानास तुम्ही पात्र ठराल व तुमच्या गरजांसाठी तुम्हांला कोणावर अवलंबून राहावे लागणार नाही.
13
बंधुजनहो, निधन पावलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशा नाही अशा इतर लोकांसारखा तुम्ही शोक करू नये.
14
येशू मरण पावला व पुन्हा उठला, असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूवर श्रद्धा ठेवून जे निधन पावले आहेत, त्यांना देव त्याच्याबरोबर आणील.
15
आम्ही तुम्हांला आता जे काही शिकवीत आहोत, ती प्रभूची शिकवण आहे:प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत उरलेले ते आपण निधन पावलेल्यांच्या पुढे जाणार नाही.
16
आज्ञेचा ध्वनी, आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तावर श्रद्धा ठेवून जे मेलेले आहेत, ते प्रथम उठतील.
17
नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे जाण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू.
18
म्हणून ह्या शब्दांनी एकमेकांना प्रोत्साहन द्या.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5