bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
1 Timothy 3
1 Timothy 3
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 4 →
1
कोणी ख्रिस्तमंडळ्यांमध्ये बिशप होऊ पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरतो, हे वचन सत्य आहे.
2
ख्रिस्तमंडळ्यांचा बिशप दोषरहित, एका स्त्रीचा पती, सौम्य, दक्ष, आत्मनियंत्रित, आदरणीय, अतिथिप्रिय व निपुण शिक्षक असा असावा.
3
तो मद्यपी किंवा हिंसक नसावा, तर सौम्य, शांतिप्रिय, द्रव्यलोभ न धरणारा,
4
आपल्या कुटुंबाची चांगली व्यवस्था ठेवणारा व आपल्या मुलांबाळांना आज्ञाधारकपणाचे व भीडमर्यादेचे वळण लावणारा असावा;
5
कारण ज्याला आपल्या कुटुंबाची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो देवाच्या मंडळ्यांचा सांभाळ कसा करील?
6
त्याने गर्वाने फुगून जाऊन सैतानाप्रमाणे त्याला दोषी ठरवले जाऊ नये म्हणून तो श्रद्धेत परिपक्व असावा.
7
शिवाय त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये. त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांचे चांगले मत असावे,
8
तसेच डीकन शीलवान व प्रामाणिक असावेत. दुतोंडे, मद्यपानासक्त व पैशाची हाव धरणारे नसावेत.
9
ते विश्वासाचे रहस्य निर्मळ सदसद्विवेकबुद्धीने राखणारे असावेत.
10
त्यांची अगोदर पारख व्हावी आणि ते निर्दोष सिद्ध झाले तर त्यांनी डीकन म्हणून सेवा करावी.
11
तसेच त्यांच्या पत्नीही गंभीर असाव्यात, निंदक नसाव्यात, शांतचित्त व विश्वासू असाव्यात.
12
ख्रिस्तमंडळीचा डीकन एका स्त्रीचा पती असावा. तो आपल्या मुलांबाळांची व कुटुंबाची चांगली व्यवस्था ठेवणारा असावा.
13
जे डीकन म्हणून चांगल्या प्रकारे सेवा करतात ते आपणासाठी चांगली योग्यता मिळवितात आणि ख्रिस्त येशूवरील श्रद्धेविषयी ते धैर्याने बोलू शकतात.
14
तुझ्याकडे लवकर येण्याची आशा धरून मी हे तुला लिहिले आहे.
15
तरीपण मला उशीर लागल्यास सत्याचा स्तंभ व पाया अशी जी देवाची ख्रिस्तमंडळी आहे तीत म्हणजे देवाच्या जिवंत घराण्यात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.
16
आपल्या धर्माचे रहस्य निर्विवाद मोठे आहे: येशू देहात प्रकट झाला, पवित्र आत्म्याने त्याचे समर्थन केले तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची यहुदीतर लोकांत घोषणा झाली, जगभर त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि तो वर घेतला गेला.
← Chapter 2
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 4 →
All chapters:
1
2
3
4
5
6