bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
1 Timothy 6
1 Timothy 6
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
1
जे दास म्हणून जोखडाखाली आहेत, त्या सर्वांनी आपापले धनी सर्व प्रकारच्या सन्मानास पात्र आहेत, असे मानावे, ह्यासाठी की, देवाच्या नावाची व त्याच्या धर्मसत्याची कोणीही निंदा करणार नाही.
2
ज्या दासांचे धनी विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना ते बंधूसमान आहेत म्हणून त्यांचा अवमान करू नये, तर त्यांचे अधिक आदराने दास्य करावे; कारण ज्यांना सेवेचा लाभ होतो, ते त्यांना प्रिय असलेले विश्वास ठेवणारे आहेत. ह्या गोष्टी शिकव आणि ह्यांविषयी बोध कर.
3
जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची सुवचने व धार्मिक शिक्षण मान्य करत नाही,
4
तर तो गर्वाने फुगलेला आहे. त्याला काही कळत नाही, तो वादविवाद व शब्दयुद्ध ह्यांमुळे विकृत झालेला आहे. ह्यामुळे हेवा, कलह, अपशब्द, दुसऱ्यांविषयीचे दुष्ट संशय हे सारे उत्पन्न होते.
5
मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या व भक्ती हे कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या माणसांची एकसारखी भांडणे होतात. अशा लोकांपासून तू दूर रहा.
6
समाधानी धार्मिक जीवन हा एक महान लाभ असतो.
7
आपण जगात काही आणले नाही आणि निश्चितच आपल्याला त्यातून काही नेता येत नाही!
8
तर मग आपल्याला जे अन्नवस्त्र मिळते तेवढ्यात तृप्त असावे.
9
परंतु जे धनवान होऊ पाहतात, ते मोहपाशात सापडून मूर्खपणाच्या बाधक वासनांत अडकून स्वतःचा नाश व विध्वंस ओढवून घेतात;
10
कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे मूळ आहे, त्याच्या मागे लागून कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी पुष्कळ दुःखांनी त्यांची हृदये विदीर्ण करून घेतली आहेत.
11
हे देवभक्ता, तू ह्या लोभापासून लांब राहा आणि यथोचित संबंध, देवभीरू वृत्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता ह्या गोष्टींचा पाठपुरावा कर.
12
श्रद्धेचे सुयुद्ध लढत रहा. स्वतःसाठी शाश्वत जीवन मिळव. त्यासाठीच तुला पाचारण करण्यात आले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तुझी श्रद्धा जाहीरपणे स्वीकारली आहेस.
13
सर्व प्राणिमात्रांना जीवन देणारा जो देव त्याच्यासमोर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलातसमक्ष स्वतःविषयी साक्ष दिली, त्याच्यासमोर मी तुला निक्षून सांगतो,
14
आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू हे आदेश निष्कलंकपणे व निर्दोषपणे पाळ.
15
जो धन्य व एकमेव अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही
16
आणि कोणी पाहू शकत नाही, तो प्रभू येशूचे प्रकट होणे यथाकाळी सिद्धीस नेईल, त्याला सन्मान व शाश्वत सामर्थ्य असो. आमेन.
17
प्रस्तुत युगातल्या धनवानांना निक्षून सांग की, त्यांनी गर्विष्ठ होऊ नये, चंचल धनावर भिस्त ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर भिस्त ठेवावी.
18
चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे.
19
अशा प्रकारे ते असा काही साठा जमवितील की, तो त्यांच्या भवितव्यासाठी भरभक्कम पाया ठरेल व त्यामुळे ते खरे शाश्वत जीवन मिळवू शकतील.
20
हे तीमथ्य, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. अमंगळ व निरर्थक वटवट व ज्याला चुकीने ‘ज्ञान’ असे म्हटले जाते त्याविषयीची मतभिन्नता टाळ;
21
कारण ते ज्ञान स्वीकारून कित्येक जण विश्वासापासून बहकले आहेत. तुम्हांला कृपा मिळो. आमेन.
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
All chapters:
1
2
3
4
5
6