bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
2 Corinthians 13
2 Corinthians 13
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
1
ही माझी तुमच्याकडे येण्याची तिसरी खेप. असा धर्मशास्त्रलेख आहे, ‘दोघा अथवा तिघा साक्षीदारांच्या मुखाने प्रत्येक आरोप निश्चित करणे आवश्यक असते.’
2
ज्यांनी पूर्वी पाप केले त्यांना व दुसऱ्या सर्वांना मी पूर्वी सांगितले होते व दुसऱ्यांदा तुमच्याजवळ असताना सांगितले तेच आता दूर असतानाही अगोदर सांगून ठेवतो की, मी पुन्हा आलो तर दयामाया दाखवणार नाही.
3
ख्रिस्त माझ्याद्वारे बोलतो आहे, ह्याचे प्रमाण तुम्हांला मिळेल. तो तुमच्यासंबंधाने शक्तिहीन नाही, तर तुमच्यामध्ये शक्तिशाली आहे;
4
कारण त्यास जरी दुर्बलतेत वधस्तंभावर चढविण्यात आले, तरी तो देवाच्या सामर्थ्याने जिवंत झाला आहे. तसे आम्हीही त्याच्याप्रमाणे दुर्बल आहोत, परंतु तुमच्याबरोबरच्या आमच्या संबंधांत आम्ही त्याच्या जीवनात देवाच्या सामर्थ्याने संपन्न आहोत.
5
तुम्ही विश्वास ठेवता किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा आणि तुमचे तुम्हीच ठरवा. येशू ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, असे तुम्ही स्वतःसंबंधाने समजता ना? नाही तर तुम्ही कसोटीस उतरणार नाही.
6
कसोटीस न उतरलेले असे आम्ही नाही, हे तुम्ही ओळखाल असा माझा भरवसा आहे.
7
आम्ही देवाजवळ अशी प्रार्थना करतो की, तुम्ही काही वाईट करू नये. आम्ही कसोटीस उतरलेले आहोत, हे सिद्ध करण्यासाठी नव्हे, तर आम्ही कसोटीस न उतरलेले असे दिसलो तरीही तुम्ही चांगले करावे म्हणून.
8
सत्याविरुद्ध आम्हांला काही करता येत नाही, तर सत्यासाठी करता येते.
9
जेव्हा आम्ही दुर्बळ असतो आणि तुम्ही सबळ असता, तेव्हा आम्हांला आनंद वाटतो व तुम्ही परिपूर्ण व्हावे ह्यासाठीही आम्ही प्रार्थना करतो.
10
ह्यामुळे मी दूर असताना हे लिहितो, ते अशासाठी की, जो अधिकार जमीनदोस्त करण्यासाठी नव्हे तर उभारणी करण्यासाठी प्रभूने मला दिला आहे, त्या अधिकाराप्रमाणे तुमच्याकडे आल्यावर मला कठोरपणाने वागावयास लागू नये.
11
बंधुजनहो, आता इतकेच म्हणतो, तुमचे कल्याण होवो, तुम्हांला पूर्णता लाभो, माझ्या आवाहनांकडे लक्ष द्या. तुम्ही एकचित्त व्हा. शांतीने राहा म्हणजे प्रेमस्वरूप व शांतिदाता देव तुमच्यासोबत राहील.
12
बंधुभावाने पवित्र चुंबन घेऊन एकमेकांना शुभेच्छा द्या.
13
सर्व पवित्र जन तुम्हांला शुभेच्छा देत आहेत.
14
प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हां सर्वांबरोबर राहो.
← Chapter 12
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13