bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
/
2 Corinthians 4
2 Corinthians 4
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 5 →
1
आमच्यावर झालेल्या दयेनुसार हे सेवाकार्य आमच्याकडे सोपवण्यात आले आहे, म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही.
2
आम्ही लाजिरवाण्या गुप्त गोष्टी वर्ज्य केल्या आहेत. आम्ही फसवेगिरी करत नाही; देवाच्या वचनाचा विपर्यास होऊ न देता सत्य जाहीर करून प्रत्येक माणसाच्या सदसद्विवेकबुद्धीला देवासमक्ष आवाहन करतो;
3
कारण आमचे शुभवर्तमान आच्छादिलेले असल्यास ज्यांचा नाश होत आहे, त्यांच्यासाठी ते आच्छादिलेले आहे.
4
त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची तंतोतंत प्रतिमा असलेल्या ख्रिस्ताच्या वैभवशाली शुभवर्तमानाचा प्रकाश त्यांच्यावर पडू नये.
5
कारण आम्ही स्वतःची घोषणा करत नाही. तर ख्रिस्त येशू हा प्रभू आहे अशी आणि येशूसाठी आम्ही तुमचे सेवक आहोत, अशी घोषणा आम्ही करतो.
6
अंधारातून उजेड प्रकाशित होईल, असे देव म्हणाला त्यामुळे येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या वैभवशाली ज्ञानाचा प्रकाश आमच्या अंतःकरणात पाडला आहे.
7
तरीही आमचा आध्यात्मिक खजिना मातीच्या भांड्यात आहे, सामर्थ्याचा कळस देवामध्ये आहे, आमच्याकडे नाही, हे दाखविले जावे.
8
आमच्यावर सर्व बाजूंनी संकटे आली, तरी आम्ही चिरडले गेलो नाही. आम्ही गोंधळलो, तरी निराश झालो नाही.
9
आमचा छळ झाला, तरी आम्हांला टाकून देण्यात आले नाही. आमच्यावर प्रहार झाले, तरी आमचा विध्वंस झाला नाही.
10
आम्ही येशूचा वध सर्वदा लक्षात ठेवतो ज्यामुळे येशूचे जीवनही आमच्या शरीरात प्रकट होते.
11
येशूचे जीवनही आमच्या मर्त्य देहात प्रकट व्हावे ह्यासाठी आमचे आयुष्य आम्ही येशूसाठी सदाचे मरणाच्या हाती सोपवलेले आहे.
12
याचा अर्थ असा की, आमच्यामध्ये मरण, पण तुमच्यामध्ये जीवन कार्य करीत आहे.
13
‘मी विश्वास धरला म्हणून बोललो,’ असा धर्मशास्त्रलेख आहे. त्याच श्रद्धामय वृत्तीने आम्हीदेखील विश्वास धरतो म्हणून बोलतो.
14
आम्हांला हे ठाऊक आहे की, ज्याने प्रभू येशूला मरणातून उठविले तो येशूबरोबर आम्हांलाही उठवून, तुमच्याबरोबर त्याच्या समक्षतेत नेईल.
15
हे सर्व काही तुमच्याकरिता आहे आणि देवाची कृपा जशी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, तशी ते देवाच्या गौरवासाठी अधिक आभारप्रदर्शनात्मक प्रार्थना करतील.
16
म्हणूनच आम्ही धैर्य सोडत नाही. जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसागणिक नवा होत आहे
17
आणि आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी कितीतरी मोठ्या प्रमाणात शाश्वत गौरव आणील.
18
आम्ही दृश्य गोष्टींकडे नव्हे तर अदृश्य गोष्टींकडे लक्ष लावतो. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत, पण अदृश्य गोष्टी शाश्वत आहेत.
← Chapter 3
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 5 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13