bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
/
1 Samuel 22
1 Samuel 22
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
← Chapter 21
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 23 →
1
दावीदाने गथ सोडले आणि पळून जाऊन अदुल्लाम येथील गुहेकडे गेला. जेव्हा त्याच्या भावांनी आणि त्याच्या पित्याच्या घराण्यातील लोकांनी याबद्दल ऐकले तेव्हा ते त्याच्याकडे गेले.
2
जे सर्व निराशेत किंवा कर्जात किंवा असमाधानी होते ते त्याच्याभोवती गोळा झाले आणि दावीद त्यांचा सेनापती झाला. सुमारे चारशे लोक त्याच्याबरोबर होते.
3
तिथून निघून दावीद मोआबातील मिस्पाह येथे गेला आणि मोआबच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर माझ्यासाठी काय करेल, हे मला समजेपर्यंत माझ्या आईवडिलांना तुमच्याजवळ राहू द्याल काय?”
4
तेव्हा त्याने त्यांना मोआबच्या राजाकडे सोडले आणि जोपर्यंत दावीद गडांमध्ये होता तोपर्यंत ते राजाकडे राहिले.
5
परंतु गाद संदेष्टा दावीदाला म्हणाला, “गडांमध्ये राहू नकोस; यहूदीयाच्या प्रदेशामध्ये जा.” तेव्हा दावीद तिथून निघाला आणि हेरेथ नावाच्या जंगलात गेला.
6
आता शौलाने ऐकले की, दावीद आणि त्याच्या माणसांचा शोध लागला आहे. तेव्हा शौल हातात भाला घेऊन, गिबियाह येथील टेकडीवर चिंचेच्या झाडाखाली बसला, त्याचे सर्व अधिकारी त्याच्या सभोवती उभे राहिले.
7
शौल त्यांना म्हणाला, “बिन्यामीन पुरुषांनो, ऐका! इशायाचा पुत्र तुम्हा सर्वांना शेते आणि द्राक्षमळे देणार काय? तो तुम्हाला हजारांचे किंवा शंभरांचे सेनापती करणार काय?
8
याच कारणामुळे तुम्ही सर्वांनी माझ्याविरुद्ध कट केला आहे काय? माझ्या पुत्राने इशायच्या पुत्राबरोबर करार केला तेव्हा कोणीही मला सांगितले नाही. तुमच्यापैकी कोणालाही माझी काळजी नाही किंवा जसे आज केले तसे माझ्याच मुलाने माझ्या सेवकाला माझ्यासाठी दबा धरून बसविले आहे याविषयी कोणी मला सांगितले नाही.”
9
परंतु शौलाच्या अधिकार्यांबरोबर उभा असलेला दवेग एदोमी म्हणाला, “मी नोब येथे इशायच्या पुत्राला अहीतूब याचा पुत्र अहीमेलेख याच्याकडे येताना पाहिले.
10
अहीमेलेखने त्याच्यासाठी याहवेहकडे चौकशी केली; त्याने त्याला काही अन्नसामुग्री व पलिष्टी गल्याथाची तलवार सुद्धा दिली.”
11
तेव्हा राजाने अहीतूबचा पुत्र अहीमेलेख याजक आणि त्याच्या कुटुंबातील सर्व पुरुष, जे नोब येथे याजक होते यांना बोलाविणे पाठविले आणि ते सर्व राजाकडे आले.
12
शौल म्हणाला, “अहीतूबच्या पुत्रा, ऐक.” तो उत्तरला, “होय, माझ्या धन्या.”
13
शौल त्याला म्हणाला, “तू माझ्याविरुद्ध कट का केलास, तू इशायच्या पुत्राला भाकर आणि तलवार देऊन त्याच्यासाठी परमेश्वराकडे चौकशी केली, ज्यामुळे त्याने माझ्याविरुद्ध बंड केले आहे आणि तो आज माझ्यासाठी दबा धरून बसला आहे?”
14
अहीमेलेखाने राजाला उत्तर दिले, “तुमच्या सर्व सेवकांपैकी राजाचा जावई दावीद याच्याइतका विश्वासू असा दुसरा कोण आहे जो तुमच्या अंगरक्षकांचा प्रमुख आणि तुमच्या घराण्यात सर्वाधिक आदरणीय आहे?
15
केवळ त्याच दिवशी मी त्याच्यासाठी परमेश्वराकडे चौकशी केली काय? नक्कीच नाही! राजाने आपल्या सेवकावर किंवा त्याच्या पित्याच्या घराण्यातील कोणावरही आरोप करू नये, कारण आपल्या सेवकाला या सर्व प्रकरणाबद्दल काहीच माहीत नाही.”
16
परंतु राजा म्हणाला, “अहीमेलेख, तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब, तुम्ही खात्रीने मराल.”
17
नंतर राजाने त्याच्या बाजूला असलेल्या अंगरक्षकांना हुकूम दिला: “पुढे येऊन याहवेहच्या याजकांना जिवे मारा, कारण ते सुद्धा दावीदाच्या बाजूने आहेत. दावीद माझ्यापासून पळून चालला होता, हे त्यांना माहीत होते, तरी त्यांनी मला सांगितले नाही.” परंतु याहवेहच्या याजकांवर हात उगारण्यास अंगरक्षकांची इच्छा नव्हती.
18
तेव्हा राजाने दवेगला आज्ञा केली, “तू मागे वळ आणि याजकांना मारून टाक.” तेव्हा एदोमी दोएग फिरला आणि त्यांना मारून टाकले. त्या दिवशी तागाचे एफोद वस्त्र घातलेल्या पंचाऐंशी पुरुषांना त्याने मारून टाकले.
19
त्याने याजकांचे शहर नोब, यातील पुरुष आणि स्त्रिया, लेकरे आणि तान्ही बालके, आणि तेथील गुरे, गाढवे आणि मेंढरे सुद्धा तलवारीने मारून टाकले.
20
परंतु अहीतूबचा पुत्र अहीमेलेख याचा एक पुत्र अबीयाथार निसटून दावीदाकडे पळून गेला.
21
अबीयाथारने दावीदाला सांगितले की, शौलाने याहवेहच्या याजकांना मारून टाकले आहे.
22
तेव्हा दावीद अबीयाथारला म्हणाला, “त्या दिवशी, एदोमी दवेग तिथे होता, मला माहीत होते की, तो नक्कीच शौलाला सांगेल. तुझ्या सर्व घराण्याच्या मृत्यूस मी जबाबदार आहे.
23
माझ्याबरोबर राहा; घाबरू नकोस. जो मनुष्य तुला मारण्याचा प्रयत्न करत आहे, तो मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करत आहे. तू माझ्याबरोबर सुरक्षित राहशील.”
← Chapter 21
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 23 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31