bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
/
1 Samuel 26
1 Samuel 26
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
← Chapter 25
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 27 →
1
जिफी लोक गिबियाह येथे शौलाकडे गेले आणि म्हणाले, “जेशीमोनच्या समोर असलेल्या हकीलाहच्या डोंगरावर दावीद लपून राहत नाही काय?”
2
तेव्हा शौल त्याच्या निवडलेल्या तीन हजार इस्राएली सैनिकांना बरोबर घेऊन दावीदाचा शोध घेण्यासाठी जीफच्या वाळवंटाकडे निघाला.
3
शौलाने जेशीमोन समोर हकीलाहच्या डोंगरावर जाण्याच्या रस्त्याच्या बाजूला छावणी घातली आणि दावीद रानातच राहिला. परंतु शौल आपल्यामागे आला आहे हे समजून,
4
दावीदाने आपले दोन सैनिक पाठवून शौल खरोखरच तिथे आला काय याची माहिती काढून घेतली.
5
नंतर दावीद बाहेर पडला आणि ज्या ठिकाणी शौलाने छावणी टाकली होती तिथे गेला. त्याने पाहिले शौल, नेराचा पुत्र अबनेर, सैन्याचा सेनापती झोपले होते. शौल छावणीच्या आतील बाजूस झोपला होता, त्याच्याभोवती सैन्याचा पहारा होता.
6
तेव्हा दावीदाने हिथी अहीमेलेख आणि जेरुइयाहचा पुत्र अबीशाई, योआबाचा भाऊ यांना विचारले, “छावणीच्या आत शौलाकडे माझ्याबरोबर कोण जाईल?” अबीशाई म्हणाला, “मी तुझ्याबरोबर जाईन.”
7
तेव्हा दावीद आणि अबीशाई रात्रीच्या वेळेस सैन्याकडे गेले आणि शौल तिथे छावणीच्या आतमध्ये झोपलेला होता, त्याच्या उशाशी त्याचा भाला जमिनीमध्ये रोवलेला होता. अबनेर आणि सैनिक त्याच्याभोवती झोपलेले होते.
8
अबीशाई दावीदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझ्या शत्रूला आज तुझ्या हाती दिले आहे. तर आता मला भाल्याने त्याच्यावर एकच वार करून त्याला जमिनीत खुपसून टाकू द्या; दुसर्यांदा वार करावा लागणार नाही.”
9
परंतु दावीद अबीशाईला म्हणाला, “त्याचा वध करू नको! याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकून कोण निर्दोष राहू शकेल?”
10
दावीद म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, याहवेह स्वतः त्याला मारतील, किंवा त्याची वेळ येईल आणि त्याचा मृत्यू होईल, किंवा तो युद्धात जाईल आणि त्याचा नाश होईल.
11
परंतु मी याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकावा असे याहवेह माझ्या हातून घडवून न आणो. तर आता त्याच्या उशाशी असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घे, मग आपण जाऊ या.”
12
तेव्हा दावीदाने शौलाच्या उशाशी असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घेतला आणि ते निघून गेले. कोणीही ते पाहिले नाही किंवा कोणाला ते कळले नाही, किंवा कोणी उठले नाही. ते सर्व झोपी गेले होते, कारण याहवेहकडून त्यांना गाढ निद्रा लागली होती.
13
नंतर दावीद पलीकडे गेला आणि डोंगराच्या उंच टोकावर अंतरावर उभा राहिला; त्यांच्यामध्ये बरेच अंतर होते.
14
दावीदाने सैन्याला आणि नेरचा पुत्र अबनेर यांना मोठ्याने विचारले, “अबनेर, तू मला उत्तर देणार नाहीस काय?” अबनेरने उत्तर दिले, “तू कोण आहेस, राजाला कोण हाक मारत आहे?”
15
दावीद अबनेरास म्हणाला, “तू एक पुरुष आहेस, नाही का? आणि इस्राएलमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? तू तुझा धनी, म्हणजेच राजाचे रक्षण का केले नाहीस? कोणीतरी तुझ्या धनी राजाचा वध करण्यास आला होता.
16
तू जे केलेस ते चांगले नाही. जिवंत याहवेहची शपथ, तू आणि तुझी माणसे मेलीच पाहिजेत, कारण तू तुझ्या मालकाचे, याहवेहच्या अभिषिक्ताचे रक्षण केले नाहीस. तुझ्या सभोवती पाहा. राजाचा भाला आणि पाण्याचा चंबू जे त्यांच्या उशाशी होते ते कुठे आहेत?”
17
शौलाने दावीदाचा आवाज ओळखला आणि म्हणाला, “दावीदा माझ्या मुला, हा तुझाच आवाज आहे काय?” दावीदाने उत्तर दिले, “होय, माझ्या धन्या, माझ्या राजा, हा माझाच आवाज आहे.”
18
आणि तो पुढे म्हणाला, “माझा धनी आपल्या सेवकाचा पाठलाग का करीत आहे? मी काय केले आहे आणि कोणत्या बाबतीत दोषी आहे?
19
तर आता माझ्या धन्याने, राजाने आपल्या सेवकाचे म्हणणे ऐकावे. जर याहवेहने तुम्हाला माझ्याविरुद्ध चेताविले आहे, तर आपण अर्पण स्वीकारावे. परंतु जर लोकांनी हे केले आहे, तर ते याहवेहसमोर शापित केले जावोत! कारण मला आज याहवेहच्या वतनाचा वाटा मिळू नये म्हणून त्यांनी मला बाहेर घालवून म्हटले, ‘जा, इतर दैवतांची सेवा कर.’
20
आता याहवेहच्या समक्षतेपासून दूर माझे रक्त भूमीवर पडू नये. जसे कोणी डोंगरामध्ये तीतराची शिकार करावी, तसा इस्राएलचा राजा पिसवा शोधायला बाहेर आला आहे.”
21
तेव्हा शौल म्हणाला, “मी पाप केले आहे. दावीदा, माझ्या पुत्रा, परत ये. कारण आज तू माझ्या जिवास मौल्यवान समजलेस, मी पुन्हा तुला इजा करणार नाही. खरोखरच मी मूर्खासारखा वागलो आणि फार चुकीचे वागलो.”
22
दावीदाने उत्तर दिले, “हा पाहा, राजाचा भाला, तुमच्या तरुण पुरुषांपैकी एकाने इकडे येऊन तो घेऊन जा.
23
याहवेह प्रत्येकाला आपआपल्या नीतिमत्तेची व विश्वासूपणाचे प्रतिफळ देवो. याहवेहने आज तुम्हाला माझ्या हाती दिले होते, परंतु मी याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकणार नाही.
24
जसा आज तुमचा जीव मला मोलाचा वाटला, तसेच याहवेहला माझाही जीव मोलाचा वाटो आणि ते सर्व संकटांपासून मला वाचवो.”
25
तेव्हा शौल दावीदास म्हणाला, “दावीदा, माझ्या मुला, तू आशीर्वादित होशील; तू महान गोष्टी करशील आणि खात्रीने विजयी होशील.” तेव्हा दावीद त्याच्या मार्गाने निघून गेला आणि शौल घरी परतला.
← Chapter 25
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 27 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31