bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
1 Corinthians 1
1 Corinthians 1
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 2 →
1
करिंथ येथील देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकांना, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू, ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणार्या सर्वांना,
2
देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून:
3
देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो.
4
ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे मी तुमच्याविषयी देवाची उपकारस्तुती सर्वदा करतो;
5
तो अनुग्रह हा की, जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुमच्यामध्ये दृढमूल झाली तसतसे तुम्ही त्याच्या ठायी प्रत्येक बाबतीत, सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात संपन्न झालात;
7
असे की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही ते कोणत्याही कृपादानात उणे पडला नाहीत.
8
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हांला दृढ राखील.
9
ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे.
10
बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.
11
कारण माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला ख्लोवेच्या माणसांकडून कळले आहे.
12
माझे म्हणणे असे आहे की, तुमच्यापैकी प्रत्येक जण “मी पौलाचा,” “मी अपुल्लोसाचा,” “मी केफाचा” आणि “मी ख्रिस्ताचा” आहे, असे म्हणतो.
13
ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुमच्यासाठी वधस्तंभावर खिळले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय?
14
क्रिस्प व गायस ह्यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणाचाही बाप्तिस्मा मी केला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो.
15
न जाणो, तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावाने झाला असे कोणी म्हणायचा!
16
(आणखी मी स्तेफनाच्या घरच्यांचाही बाप्तिस्मा केला; त्यांच्याखेरीज मी दुसर्या कोणाचा बाप्तिस्मा केला की नाही हे माझ्या लक्षात नाही.)
17
कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यास नव्हे तर सुवार्ता सांगण्यास पाठवले; पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्चातुर्याने सांगण्यास पाठवले नाही.
18
कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचे सामर्थ्य असा आहे.
19
“कारण मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन, व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करीन,” असा शास्त्रलेख आहे.
20
‘ज्ञानी कोठे राहिला? शास्त्री कोठे राहिला?’ ह्या युगाचा वाद घालणारा ‘कोठे राहिला?’ देवाने जगाचे ‘ज्ञान मूर्खपणाचे ठरवले’ की नाही?
21
कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही,1 तेव्हा गाजवलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणार्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले.
22
कारण यहूदी चिन्हे मागतात व हेल्लेणी ज्ञानाचा शोध करतात,
23
आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो; हा यहूद्यांना अडखळण व हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा,
24
परंतु पाचारण झालेल्या यहूदी व हेल्लेणी अशा दोघांनाही ख्रिस्त हा देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे.
25
कारण देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे; आणि देवाची दुर्बळता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे.
26
तर बंधुजनहो, तुम्हांला झालेले पाचारणच घ्या; तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत;
27
तरी ज्ञान्यांस लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले;
28
आणि जगातील जे हीनदीन, जे धिक्कारलेले व जे शून्यवत अशांना देवाने ह्याकरता निवडले की, जे आहे ते त्याने रद्द करावे,
29
म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये.
30
त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्त्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे;
31
ह्यासाठी की, “जो अभिमान बाळगतो, त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे व्हावे.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16