bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
1 Corinthians 5
1 Corinthians 5
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 6 →
1
मला अशी खबर मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रीयांमध्येदेखील आढळत नाही; म्हणजे तुमच्यातील कोणीएकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे.
2
तरीही तुम्ही फुगला आहात! आणि हे कर्म करणारा आपणांतून घालवून देण्याइतका शोक तुम्ही केला नाही.
3
मी शरीराने गैरहजर असलो तरी आत्म्याने हजर आहे आणि हजर असल्यासारखा मी तर निर्णय करून चुकलो आहे.
4
तो असा की, ज्याने अशा प्रकारे हे कर्म केले त्या माणसाला तुम्ही व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने युक्त असा माझा आत्मा ह्यांनी एकत्र मिळून आपला प्रभू येशू ह्याच्या नावाने देहस्वभावाच्या नाशाकरता सैतानाच्या स्वाधीन करावे, अशा हेतूने की, आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तारलाजावा.
6
तुमचे हे आढ्यता बाळगणे बरे नव्हे. थोडे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय?
7
तर जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की, तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे, कारण आपला वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे आपल्यासाठी अर्पण झाले.
8
म्हणून आपण सण पाळावा तो जुन्या खमिराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा ह्यांच्या खमिराने नव्हे, तर सात्त्विकपणा व खरेपणा ह्या बेखमीर भाकरींनी तो पाळावा.
9
तुम्ही जारकर्म्यांची संगत धरू नये, असे मी आपल्या पत्रात तुम्हांला लिहिले होते;
10
तथापि ह्या जगाचे जारकर्मी, लोभी, वित्त हरण करणारे1 व मूर्तिपूजक ह्यांची संगत मुळीच धरू नये असे माझे म्हणणे नाही; कारण तसे कराल तर तुम्हांला जगातून निघून जावे लागेल.
11
म्हणून मी तुम्हांला जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की, बंधू म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी, किंवा वित्त हरण करणारा1 असला तर तशाची संगत धरू नये; त्याच्या पंक्तीसही बसू नये.
12
कारण जे बाहेर आहेत त्यांचा न्याय करणे माझ्याकडे कोठे आहे? जे आत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करत नाही काय?
13
जे बाहेर आहेत त्यांचा न्याय देव करीत नाही काय? “त्या दुष्टाला आपल्यामधून घालवून द्या.”
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 6 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16