bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
1 Corinthians 11
1 Corinthians 11
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 12 →
1
जसा मी ख्रिस्ताचे अनुकरण करणारा आहे, तसे तुम्हीही माझे अनुकरण करणारे व्हा.
2
तुम्ही सर्व गोष्टींत माझी आठवण करता आणि मी तुम्हांला सांगून ठेवलेले विधी जसेच्या तसे दृढ धरून पाळता, त्याबद्दल मी तुमची वाहवा करतो.
3
प्रत्येक पुरुषाचे मस्तक ख्रिस्त आहे; स्त्रीचे मस्तक पुरुष आहे, आणि ख्रिस्ताचे मस्तक देव आहे, हे तुम्हांला समजावे अशी माझी इच्छा आहे.
4
जो पुरुष आपले मस्तक आच्छादून प्रार्थना करतो किंवा संदेश देतो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो;
5
तसेच जी स्त्री उघड्या मस्तकाने प्रार्थना करते किंवा संदेश देते ती आपल्या मस्तकाचा अपमान करते; कारण ती मुंडण केलेल्या स्त्रीसारखीच होते.
6
स्त्री जर आपले मस्तक आच्छादत नाही तर तिने आपले केस कातरून घ्यावेत, परंतु जर केस कातरून घेणे किंवा मुंडण करणे स्त्रीला लाजिरवाणी गोष्ट आहे तर तिने आपले मस्तक आच्छादावे.
7
पुरुष देवाची प्रतिमा व वैभव असल्यामुळे त्याला मस्तक आच्छादन करणे योग्य नाही; स्त्री तर पुरुषांचा गौरव आहे.
8
कारण पुरुष स्त्रीपासून झाला नाही, तर स्त्री पुरुषापासून झाली.
9
पुरुष स्त्रीसाठी निर्माण झाला नाही तर स्त्री पुरुषासाठी निर्माण झाली.
10
ह्या कारणामुळे देवदूतांकरता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे.
11
तरी प्रभूमध्ये पुरुष स्त्रीपासून वेगळा नाही आणि स्त्री पुरुषापासून वेगळी नाही.
12
कारण जशी स्त्री पुरुषापासून तसा पुरुष स्त्रीच्या द्वारे आहे, आणि सर्वकाही देवापासून आहे.
13
तुम्हीच आपसांत ठरवा; मस्तकावर आच्छादन घेतल्यावाचून देवाची प्रार्थना करणे स्त्रीला शोभते काय?
14
लांब केस राखणे ही पुरुषाला लाजिरवाणी गोष्ट आहे असे निसर्गदेखील तुम्हांला सांगत नाही काय?
15
स्त्रीने लांब केस राखणे हे तर तिला भूषणावह आहे; कारण केस तिला आच्छादनाकरता दिले आहेत.
16
तरी जर कोणी वितंडवादी दिसला तर आपल्यात अशी रीत नाही आणि देवाच्या मंडळ्यांतही नाही.
17
आता असा आदेश देत असताना मी तुमची वाहवा करत नाही, कारण तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते.
18
कारण प्रथम हे की, तुम्ही मंडळी ह्या नात्याने एकत्र जमता तेव्हा तुमच्यात फुटी असतात असे मी ऐकतो, व ते काही अंशी खरे मानतो;
19
कारण तुमच्यामध्ये जे पसंतीस1 उतरलेले आहेत ते प्रकट व्हावेत म्हणून तुमच्यामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत.
20
ह्यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभुभोजन करणे शक्य नसते.
21
कारण भोजन करतेवेळी प्रत्येक जण आपल्या घरचे जेवण दुसर्यापूर्वी जेवतो; एक भुकेला राहतो तर एक मस्त होतो.
22
खाणेपिणे करण्यास तुम्हांला आपापली घरे नाहीत की काय? किंवा तुम्ही देवाच्या मंडळीस धिक्कारून ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजवता काय? मी तुम्हांला काय म्हणू? ह्याविषयी मी तुमची वाहवा करू काय? मी तुमची वाहवा करत नाही.
23
कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हांला सांगितले आहे की, ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली;
24
आणि आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, “[घ्या, खा,]हे माझे शरीर तुमच्यासाठी [मोडलेले असे] आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा.”
25
मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणिम्हटले,“हाप्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे; जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा.”
26
कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता.
27
म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचाप्यालापिईलतोप्रभूचेशरीरवरक्तह्यासंबंधानेदोषीठरेल.
28
म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे.
29
कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो.2
30
तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत, आणि बरेच निद्रेत आहेत, ह्याचे कारण हेच.
31
आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता.
32
ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, अशा हेतूने की, जगाच्याबरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये.
33
म्हणून माझ्या बंधूनो, तुम्ही भोजनास एकत्र जमता तेव्हा एकमेकांची वाट पाहा.
34
कोणी भुकेला असला तर त्याने घरी खावे, अशा हेतूने की, तुमचे एकत्र जमणे दंडास कारण होऊ नये. बाकीच्या गोष्टींची व्यवस्था मी आल्यावर लावून देईन.
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 12 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16