bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
2 Chronicles 1
2 Chronicles 1
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 2 →
1
दाविदाचा पुत्र शलमोन हा आपल्या गादीवर कायम झाला; त्याचा देव परमेश्वर त्याच्याबरोबर होता; त्याने त्याला अति थोर पदास चढवले.
2
शलमोनाने सर्व इस्राएलाला म्हणजे सहस्रपती, शतपती, न्यायाधीश आणि सर्व इस्राएलाच्या पितृकुळांचे सर्व नायक ह्यांना सांगितल्यावरून
3
शलमोनासह सर्व मंडळी गिबोन येथील उच्च स्थानी गेली; परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने रानात बनवलेला देवाचा दर्शनमंडप तेथेच होता.
4
दाविदाने देवाच्या कोशासाठी जे स्थळ तयार केले होते तेथे किर्याथ-यारीमाहून तो आणला होता; त्याने यरुशलेमेत त्यासाठी डेरा उभारला होता.
5
बसालेल बिन ऊरी बिन हूर ह्याने केलेली पितळेची वेदी परमेश्वराच्या निवासमंडपापुढे असे; शलमोन मंडळीसह तिकडे गेला.
6
दर्शनमंडपाजवळ परमेश्वरासमोर जी पितळेची वेदी होती तिच्याजवळ शलमोनाने जाऊन तिच्यावर एक हजार होमबली अर्पण केले.
7
त्या रात्री देवाने शलमोनाला दर्शन देऊन म्हटले की, “तुला काय वर हवा तो माग.”
8
शलमोन देवाला म्हणाला, “माझा पिता दावीद ह्याच्यावर तुझी फार कृपा असे व तू मला त्याच्या जागी राजा केले आहेस.
9
आता हे परमेश्वरा देवा, तू माझा बाप दावीद ह्याला दिलेले वचन पूर्ण कर; मातीच्या रजःकणांप्रमाणे संख्येने विपुल अशा प्रजेवर तू मला राजा केले आहेस.
10
ह्या प्रजेसमोर वागण्यास मला आता चातुर्य व ज्ञान दे; तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचे शासन कोणाला करता येईल?”
11
देव शलमोनाला म्हणाला, “ज्या अर्थी असा तुझा मानस आहे म्हणजे तू धनसंपत्ती व ऐश्वर्य हे मागितले नाहीस, आपल्या वैर्यांचे प्राणहरण करण्याचे अथवा दीर्घायुषी होण्याचे मागितले नाहीस, तर ज्या लोकांवर मी तुला राजा नेमले आहे त्या माझ्या लोकांचे शासन करण्यासाठी चातुर्य व ज्ञान एवढेच तू स्वत:साठी मागितलेस,
12
त्या अर्थी चातुर्य व ज्ञान हे तर तुला देतोच; ह्यांखेरीज आणखी तुझ्यापूर्वी कोणाही राजाला प्राप्त झाली नव्हती व तुझ्यानंतर कोणालाही कधी प्राप्त व्हायची नाही एवढी धनसंपत्ती व ऐश्वर्य मी तुला देईन.”
13
मग शलमोन गिबोन येथल्या उच्च स्थानाच्या दर्शनमंडपासमोरून यरुशलेमेस आला व तेथे इस्राएलावर राज्य करू लागला.
14
शलमोनाने रथ व राऊत ह्यांचा संग्रह केला; त्याच्या-जवळ चौदाशे रथ व बारा हजार राऊत झाले; त्यांतले काही रथ ठेवायच्या नगरात व काही यरुशलेमेत आपल्याजवळ त्याने ठेवले.
15
राजाने यरुशलेमेत चांदी व सोने धोंड्यांप्रमाणे आणि गंधसरू तळवटीतल्या उंबराच्या झाडांप्रमाणे विपुल केले.
16
शलमोनाचे घोडे मिसर देशातून येत; राजाचे व्यापारी घोड्यांच्या एकेका तांड्यांची किंमत ठरवून तांडेच्या तांडे घेत.
17
एकेका रथास सहाशे शेकेल चांदी व एकेका घोड्यास दीडशे शेकेल चांदी देऊन ते मिसर देशाहून आणीत; तसेच ते व्यापारी हित्ती व अरामी राजांसाठीही आणीत.
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 2 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36