bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
2 Chronicles 30
2 Chronicles 30
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 29
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 31 →
1
हिज्कीयाने सर्व इस्राएल व यहूदा ह्यांना आणि एफ्राईम व मनश्शे ह्यांनाही पत्रे लिहून कळवले की, ‘तुम्ही यरुशलेमेत परमेश्वराच्या मंदिरात इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ वल्हांडण सण पाळायला या.’
2
राजा, त्याचे सरदार आणि यरुशलेमेतील सर्व मंडळी ह्यांनी विचार करून असे ठरवले होते की वल्हांडण सण दुसर्या महिन्यात पाळावा.
3
त्यांना तो त्या वेळी पाळता आला नाही. कारण थोड्याच याजकांनी आपणांस पवित्र केले होते व लोकही यरुशलेमेत जमले नव्हते.
4
ही गोष्ट राजाला व सगळ्या जनसमुदायाला पसंत पडली.
5
लोकांनी इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ यरुशलेमेस येऊन वल्हांडण सण पाळावा असा डांगोरा बैर-शेब्यापासून दानापर्यंत सर्व इस्राएलात पिटवावा असा त्यांनी ठराव केला, ह्या प्रकारे एवढ्या मोठ्या समुदायाने हा सण शास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळला नव्हता.
6
मग राजा व त्याचे सरदार ह्यांच्याकडून पत्रे घेऊन जासूद राजाज्ञेप्रमाणे सर्व यहूदा प्रांतात फिरले; ते लोकांना सांगत गेले की, “इस्राएल लोकहो, अब्राहाम, इसहाक व इस्राएल ह्यांचा देव जो परमेश्वर त्याच्याकडे वळा म्हणजे अश्शूरी राजाच्या हातून वाचून तुमचे जे लोक उरले आहेत त्यांच्याकडे तो वळेल.
7
तुम्ही आपल्या वाडवडिलांप्रमाणे व आपल्या भाऊबंदांप्रमाणे होऊ नका; त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा अपराध केल्यामुळे त्याने त्यांची दुर्दशा केली हे तुम्हांला दिसतच आहे.
8
तुम्ही आपल्या पूर्वजांप्रमाणे ताठ मानेचे होऊ नका, तर परमेश्वराला शरण जा आणि जे पवित्रस्थान त्याने कायमचे पवित्र केले आहे, त्याच्याजवळ या व तुमचा देव परमेश्वर ह्याची उपासना करून त्याच्या भडकलेल्या कोपाचे निवारण करा.
9
तुम्ही आता परमेश्वराकडे वळला तर ज्यांनी तुमचे भाऊबंद व तुमची मुले पाडाव करून नेली आहेत ते त्यांच्यावर दया करतील व ती ह्या देशास परत येतील, कारण तुमचा देव परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे, आणि तुम्ही त्याच्याकडे वळला तर तो आपले मुख तुमच्याकडून फिरवणार नाही.”
10
ह्या प्रकारे एफ्राईम व मनश्शे ह्या प्रांतांतील नगरानगरांतून फिरत जासूद जबुलूनापर्यंत गेले, पण लोकांनी त्यांची टर उडवून फटफजिती केली.
11
तरी आशेर, मनश्शे व जबुलून ह्यांतले काही लोक नम्र होऊन यरुशलेमेस आले.
12
आणि यहूदाला देवाचा असा वरदहस्त प्राप्त झाला की राजाने व सरदारांनी परमेश्वराच्या वचनानुसार जी आज्ञा केली ती पाळण्यास ते एकचित्ताने तत्पर झाले.
13
दुसर्या महिन्यात बेखमीर भाकरीचा सण पाळण्यास पुष्कळ लोकांचा मोठा समुदाय यरुशलेमेत जमा झाला.
14
त्यांनी उठून यरुशलेमेतील सर्व वेद्या व धूप जाळण्याच्या सर्व वेद्या काढून किद्रोन नाल्यात फेकून दिल्या.
15
त्यांनी दुसर्या महिन्याच्या चतुर्दशीस वल्हांडणपशू मारले, तेव्हा याजक व लेवी लज्जित झाले व त्यांनी आपणांस पवित्र करून होमबली परमेश्वराच्या मंदिरात आणले.
16
देवाचा माणूस मोशे ह्याच्या नियमशास्त्रानुसार आपल्या क्रमाप्रमाणे ते आपल्या ठिकाणी उभे राहिले; त्यांनी लेव्यांच्या हातून रक्त घेऊन शिंपडले.
17
ज्यांनी आपणांस पवित्र केले नव्हते असे पुष्कळ लोक त्या मंडळीत होते, म्हणून सर्व अशुद्ध लोकांप्रीत्यर्थ वल्हांडणाचे यज्ञपशू अर्पून परमेश्वरासाठी पवित्र करण्याचे काम लेव्यांना सांगितले.
18
बहुत लोकांनी म्हणजे एफ्राईम, मनश्शे, इस्साखार व जबुलून ह्यांतल्या पुष्कळांनी आपणांस शुद्ध केले नव्हते ते वल्हांडणाच्या पशूचे मांस शास्त्रलेखाविरुद्ध खात होते, कारण हिज्कीयाने त्यांच्याप्रीत्यर्थ प्रार्थना केली की,
19
“जे कोणी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या चरणी लागले आहेत ते पवित्रस्थानाच्या विधीप्रमाणे शुद्ध नसले तरी त्या सर्वांच्या पापांची तो दयाळू परमेश्वर क्षमा करो.”
20
हिज्कीयाची ही प्रार्थना ऐकून परमेश्वराने लोकांना क्षमा केली.
21
जे इस्राएल लोक यरुशलेमेत हजर होते त्यांनी सात दिवसपर्यंत बेखमीर भाकरीचा सण मोठ्या आनंदाने पाळला आणि प्रतिदिनी लेवी व याजक परमेश्वराप्रीत्यर्थ महानादाची वाद्ये वाजवून परमेश्वराची स्तुती करीत होते.
22
जे लेवी परमेश्वराच्या सेवेत प्रवीण होते त्या सर्वांना हिज्कीयाने आश्वासन दिले. ह्या प्रकारे शांत्यर्पणे करीत व आपल्या वाडवडिलांचा देव परमेश्वर ह्याचा धन्यवाद करीत त्या पर्वाचे सात दिवस ते उत्सव करीत राहिले.
23
मग सर्व मंडळीने असा विचार केला की आणखी सात दिवस उत्सव करावा आणि ह्याप्रमाणे त्यांनी आणखी सात दिवस आनंदाने पाळले.
24
यहूदाचा राजा हिज्कीया ह्याने अर्पणासाठी मंडळीला एक हजार गोर्हे आणि सात हजार मेंढरे दिली; आणि सरदारांनी मंडळीला एक हजार गोर्हे व दहा हजार मेंढरे दिली; त्या वेळी पुष्कळ याजकांनी आपणांस पवित्र केले.
25
तेव्हा याजक व लेवी ह्यांच्यासह यहूदाची सारी मंडळी आणि इस्राएलातून आलेले लोक व इस्राएलातून आलेले व यहूदात राहणारे परदेशीय ह्या सर्वांनी उत्सव केला.
26
यरुशलेमेत फार आनंद झाला; इस्राएलाचा राजा दावीदपुत्र शलमोन ह्याच्या वेळेपासून असा उत्सव यरुशलेमेत कधी झाला नव्हता.
27
मग लेवीय याजकांनी उभे राहून लोकांना आशीर्वाद दिले; त्यांची वाणी देवाने ऐकली, आणि त्यांची प्रार्थना देवाच्या पवित्र निवासापर्यंत, स्वर्गापर्यंत जाऊन पोहचली.
← Chapter 29
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 31 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36