bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
2 Chronicles 24
2 Chronicles 24
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 25 →
1
योवाश राज्य करू लागला तेव्हा तो सात वर्षांचा होता; त्याने चाळीस वर्षे यरुशलेमेत राज्य केले; त्याच्या आईचे नाव सिब्या; ती बैर-शेबा येथली.
2
यहोयादा याजक ह्याच्या सर्व हयातीत योवाश हा परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते करीत असे.
3
यहोयादाने त्याला दोन बायका करून दिल्या; त्याला पुत्र व कन्या झाल्या.
4
ह्यानंतर परमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असे योवाशाच्या मनात आले;
5
म्हणून त्याने याजक व लेवी ह्यांना एकत्र करून म्हटले, “वर्षानुवर्षे तुमच्या देवाच्या मंदिराची दुरुस्ती व्हावी म्हणून तुम्ही यहूदाच्या सर्व नगरांत जा व सर्व इस्राएलांपासून पैसे जमा करा; हे कार्य त्वरित करा;” असे त्याने सांगितले असताही लेव्यांनी ते त्वरेने केले नाही.
6
राजाने त्यांचा नायक यहोयादा ह्याला बोलावून विचारले, “आज्ञापटाच्या तंबूसाठी परमेश्वराचा सेवक मोशे आणि इस्राएलाची मंडळी ह्यांनी वहिवाट लावून दिल्याप्रमाणे यहूदा आणि यरुशलेम ह्यांतल्या लोकांपासून लेव्यांना कर जमा करण्यास का सांगितले नाही?”
7
त्या दुष्ट अथल्येच्या पुत्रांनी देवाचे मंदिर मोडूनतोडून टाकले होते आणि परमेश्वराच्या मंदिरातील सगळ्या समर्पित वस्तू त्यांनी बआलदैवतांना वाहिल्या होत्या.
8
राजाज्ञेवरून लोकांनी एक पेटी तयार करून परमेश्वराच्या मंदिराच्या बाहेर ठेवली.
9
मग संबंध यहूदा व यरुशलेमेत असे जाहीर करण्यात आले की देवाचा सेवक मोशे ह्याने रानात इस्राएलांवर जो कर बसवला होता तो परमेश्वराप्रीत्यर्थ लोकांनी आणावा.
10
तेव्हा सर्व सरदार व प्रजाजन मोठ्या आनंदाने येऊन पुरेशी रक्कम जमेपर्यंत त्या पेटीत पैसे टाकत गेले.
11
लेव्यांच्या हातून राजाच्या प्रधानाकडे ती पेटी पोचती होई व तिच्यात बराच पैसा आहे असे त्यांच्या नजरेस पडले म्हणजे राजाचा चिटणीस व मुख्य याजकांचा नायक हे येऊन ती पेटी रिकामी करीत, मग ती परत जागच्या जागी नेऊन ठेवत. त्यांनी दिवसेंदिवस असे करून पुष्कळ पैसा जमवला.
12
मग राजाने व यहोयादाने तो पैसा परमेश्वराच्या मंदिराचे काम करण्यास दिला व त्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी रोजाने गवंडी व सुतार लावले आणि परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती करण्यासाठी लोखंडी व पितळी काम करणार्या कारागिरांना कामास लावले.
13
ह्या प्रकारे कारागिरांनी कामास लागून ते पुरे केले; त्यांनी देवाचे मंदिर नीटनेटके करून त्याला मजबुती आणली.
14
ते सर्व काम आटोपल्यावर बाकी राहिलेले पैसे त्यांनी नेऊन राजाला व यहोयादाला दिले; परमेश्वराच्या मंदिरा-प्रीत्यर्थ त्या पैशांची सेवेची व अर्पणाची पात्रे, चमचे आणि सोन्यारुप्याची इतर पात्रे बनवली. यहोयादाच्या आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात होमबली नित्य अर्पण करीत असत.
15
पुढे यहोयादा वृद्ध व पूर्ण वयाचा होऊन मृत्यू पावला; तो मृत्यू पावला तेव्हा त्याचे वय एकशे तीस वर्षांचे होते.
16
त्याला दावीदपुरात राजांमध्ये मूठमाती देण्यात आली. कारण त्याने इस्राएलात देव व त्याचे मंदिर ह्यांच्यासंबंधाने चांगले काम केले होते.
17
यहोयादा मरण पावल्यानंतर यहूदाच्या सरदारांनी राजाकडे जाऊन त्याला मुजरा केला व राजाने त्यांचे म्हणणे ऐकले.
18
मग ते आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याच्या मंदिराचा त्याग करून अशेरा मूर्ती व इतर मूर्ती ह्यांची उपासना करू लागले. ह्या त्यांच्या अपराधामुळे परमेश्वराचा क्रोध यहूदावर व यरुशलेमेवर भडकला.
19
तरी त्यांना आपल्याकडे परत आणावे म्हणून परमेश्वराने त्यांच्याकडे संदेष्टे पाठवले; त्यांनी त्यांचा निषेध केला, पण ते काही ऐकेनात.
20
मग परमेश्वराचा आत्मा यहोयादा याजकाचा पुत्र जखर्या ह्याच्या ठायी आला; त्याने उंच जागी उभे राहून लोकांना म्हटले, “देव म्हणतो, ‘तुम्ही परमेश्वराची आज्ञा का उल्लंघता? अशाने तुम्हांला यश येणार नाही; तुम्ही परमेश्वरास सोडले म्हणून त्यानेही तुम्हांला सोडले आहे.”’
21
मग त्यांनी त्याच्याविरुद्ध कट करून राजाज्ञेने परमेश्वराच्या मंदिराच्या अंगणात त्याला दगडमार केला.
22
ह्याप्रमाणे त्याचा बाप यहोयादा ह्याने केलेले उपकार योवाश राजा स्मरला नाही, पण त्याने त्याच्या पुत्राचा वध केला. त्याच्या मृत्युसमयी तो म्हणाला, “परमेश्वरा, हे अवलोकन करून ह्याचे उसने फेड.”
23
नवे वर्ष लागताच अराम्यांच्या सेनेने त्यांच्यावर स्वारी केली; यहूदा व यरुशलेम ह्यांच्यावर चालून येऊन त्यांनी लोकांपैकी जे सरदार होते त्यांचा नायनाट केला व त्यांचे सर्व धन लुटून दिमिष्काच्या राजाकडे पाठवून दिले.
24
अराम्यांच्या सैन्यात फार थोडे लोक होते तरी परमेश्वराने त्यांच्या हाती फार मोठे सैन्य लागू दिले, कारण त्यांनी आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याचा त्याग केला होता. ह्या प्रकारे त्यांनी योवाशाला शासन केले.
25
ते त्याला मोठाल्या जखमांनी घायाळ करून निघून गेले, तेव्हा त्याच्या सेवकांनी यहोयादा याजकाच्या पुत्राच्या खुनाकरता त्याच्याशी फितुरी करून तो बिछान्यावर पडला असता त्याच्यावर प्रहार करून त्याला ठार केले. त्यांनी त्याला दावीदपुरात मूठमाती दिली, राजांच्या कबरस्तानात दिली नाही.
26
ज्यांनी त्याच्याशी फितुरी केली ते हे: शिमथ अम्मोनीण हिचा पुत्र जाबाद1 व मवाबीण शिम्रिथ2 हिचा पुत्र यहोजाबाद.
27
योवाशाचे पुत्र, त्याला सांगितलेली मोठी शिक्षा व देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार ह्यांविषयी सर्वकाही राजांच्या बखरीच्या पुस्तकात लिहिले आहे. त्याच्या जागी त्याचा पुत्र अमस्या हा राजा झाला.
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 25 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36