bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
2 Corinthians 6
2 Corinthians 6
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 7 →
1
आम्ही त्याच्यासह कार्य करता करता विनंती करतो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये;
2
(कारण तो म्हणतो: “अनुकूल समयी मी तुझे ऐकले, व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले.” पाहा, आताच ‘समय अनुकूल आहे;’ पाहा, आताच ‘तारणाचा दिवस’ आहे.)
3
आम्ही करत असलेल्या सेवेत काही दोष दिसून येऊ नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्यास कारण होत नाही;
4
तर सर्व गोष्टींत देवाचे सेवक म्हणून आम्ही आपली लायकी पटवून देतो; फार धीराने, संकटांत, विपत्तींत, पेचप्रसगांत,
5
फटके खाण्यात, बंदिवासांत, दंग्याधोप्यांत, काबाडकष्टांत, जागरणांत, उपवासांत;
6
तसेच शुद्धतेने, ज्ञानाने, सहनशीलतेने, ममतेने; पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रीतीने,
7
सत्याच्या वचनाने, देवाच्या सामर्थ्याने; आणि उजव्या व डाव्या हातातील नीतिमत्त्वाच्या शस्त्रास्त्रांनी,
8
गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो; फसवणारे मानलेले तरी आम्ही खरे;
9
अप्रसिद्ध मानलेले तरी सुप्रसिद्ध; ‘मरणोन्मुख’ असे मानलेले तरी पाहा, ‘आम्ही जिवंत आहोत;’ ‘शिक्षा भोगणारे’ असे मानलेले ‘तरी जिवे मारलेले नाही;’
10
दु:खी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे; दरिद्री मानलेले तरी पुष्कळांना सधन करणारे; कफल्लक असे मानलेले तरी सर्ववस्तुसंपन्न, अशी आम्ही आपली लायकी पटवून देतो.
11
अहो करिंथकरांनो, तुमच्याबरोबर बोलण्यास आमचे तोंड मोकळे झाले आहे, आमचे ‘अंत:करण विशाल झाले आहे.’
12
संकुचित अंत:करणाविषयी म्हणाल तर, तुमचीच अंत:करणे संकुचित आहेत; आमची नाहीत.
13
तेव्हा तुम्हांला आपली मुले समजून मी असे सांगतो की, तुम्हीही आमची परतफेड करण्यासाठी आपली अंत:करणे तशीच विशाल करा.
14
तुम्ही विश्वास न ठेवणार्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीती व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार?
15
ख्रिस्ताची बलियाराशी1 एकवाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?
16
देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ कसा बसणार? आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत; देवाने असे म्हटले आहे की, “‘मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन. मी त्यांचा देव होईन, व ते माझे लोक होतील.’
17
म्हणून ‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभू म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका; म्हणजे मी तुम्हांला स्वीकारीन;’
18
आणि मी तुम्हांला ‘पिता असा होईन,’ तुम्ही ‘मला पुत्र’ व कन्या असे व्हाल, ‘असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.”
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 7 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13