bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
2 Corinthians 9
2 Corinthians 9
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 10 →
1
तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हांला लिहावे ह्याचे अगत्य नाही;
2
कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे; तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुमच्याविषयी अभिमानाने म्हणत आहे की, एक वर्षापूर्वीच अखया प्रांताची तयारी झाली; आणि ह्या तुमच्या आस्थेने त्यांच्यातील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे.
3
तरी ह्या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी ह्या बांधवांना पाठवत आहे, ते अशासाठी की, मी सांगितले होते तसे तुम्ही तयार असावे;
4
नाहीतर कदाचित कोणी मासेदोनियाकर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयार नाही असे त्यांना दिसून आले, तर त्या भरवशाबाबत आमची — तुमची म्हणत नाही — फजिती होईल.
5
म्हणून तुम्ही पूर्वी जी देणगी देऊ केली होती ती जमा करून तयार ठेवावी; मात्र ती कृपणतेने न देता उदार अंत:करणाने द्यावी; म्हणून तुमच्याकडे आगाऊ जाण्याची बंधुवर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटले.
6
हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि तो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील.
7
प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दु:खी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ प्रिय असतो.
8
सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे.
9
“तो चहूकडे वाटप करीत असतो; दरिद्र्यांस दानधर्म करीत असतो; त्याचे नीतिमत्त्व युगानुयुग राहते,” असे शास्त्रात लिहिले आहे.
10
जो ‘पेरणार्याला बी’ पुरवतो व ‘खाण्याकरता अन्न’ पुरवतो तो तुम्हांला बी पुरवील व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्त्वाचे फळ वाढवील.
11
म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल; त्या औदार्यावरून आमच्या द्वारे देवाचे आभारप्रदर्शन होते.
12
ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरवल्या जातात; इतकेच केवळ नव्हे, तर तिच्या द्वारे देवाचे अधिकाधिक आभारप्रदर्शन झाल्याने ती सेवाही समृद्ध होते.
13
ह्या सेवेच्या कसोटीमध्ये, तुम्ही ख्रिस्तसुवार्तेच्या पत्कराबाबत आज्ञाधारकपणा दाखवल्यामुळे आणि त्यांच्यासाठी व सर्वांसाठी दान देण्याचे तुमचे औदार्य ह्यांमुळे देवाचा गौरव होतो;
14
आणि तुमच्यावर देवाची अपार कृपा असल्यामुळे ते तुमच्याकरता प्रार्थना करतात, व तुमच्याविषयी उत्कंठा बाळगतात.
15
देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती होवो.
← Chapter 8
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 10 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13