bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
2 Corinthians 8
2 Corinthians 8
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 9 →
1
बंधूंनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हांला कळवतो;
2
ती अशी की, संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य, ह्यांमध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली.
3
कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्तीपलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो.
4
त्यांनी आमच्याजवळ आग्रहपूर्वक मागितले की, पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हांला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी;
5
आम्हांला आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणांस आम्हांलाही दिले.
6
ह्यावरून आम्ही तीताजवळ विनंती केली की, जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाणे तुमच्यामध्ये कृपेच्या ह्या कार्याचा शेवटही करावा.
7
तर विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था, व आमच्यावरील तुमची प्रीती ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहात, तसे कृपेच्या ह्या कार्यातही असावे.
8
हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसर्यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो.
9
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हांला माहीत आहे; तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.
10
ह्याविषयी मी आपले मत सांगतो; कारण हे तुम्हांला हितकारक आहे; तुम्ही मागेच एक वर्षापूर्वी प्रथमतः असे करण्यास आरंभ केला, इतकेच नव्हे, तर अशी इच्छा करण्यासही केला.
11
तर हे कार्य आता पूर्ण करा; ह्यासाठी की, जशी इच्छा करण्याची उत्सुकता तुम्हांला होती तशी तुमच्या ऐपतीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी.
12
कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या-त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते; नसेल तसे नाही.
13
दुसर्यांचा भार हलका करण्याकरता तुमच्यावर भार घालावा असे नाही.
14
तर हे समानतेने व्हावे, म्हणजे प्रस्तुत काळी तुमच्या वैपुल्यातून त्यांची गरज भागावी, आणि पुढे त्यांच्या वैपुल्यातून तुमची गरज भागावी, अशी ही समानता व्हावी.
15
“ज्याने फार गोळा केले होते त्याचे अधिक भरले नाही; तसेच ज्याने थोडे गोळा केले होते त्याचे काही कमी भरले नाही,” असे शास्त्रात लिहिले आहे.
16
तीताच्या मनात तुमच्याविषयी तशीच कळकळ उत्पन्न करणार्या देवाची स्तुती असो.
17
कारण त्याने आमची सूचना तर मान्य केलीच; पण तो स्वतःच फार उत्सुक असल्यामुळे आपण होऊन तुमच्याकडे निघून गेला.
18
त्याच्याबरोबर आम्ही एका बंधूला पाठवले आहे; सुवार्तेसंबंधी मंडळ्यांतून त्याची सर्वत्र प्रशंसा झाली आहे;1
19
इतकेच केवळ नाही तर प्रभूचा गौरव व्हावा व आमची उत्सुकता दृष्टोत्पत्तीस यावी म्हणून आम्ही करत असलेल्या ह्या कृपेच्या कार्यात आम्हांला प्रवासात सोबत करण्यासाठी मंडळ्यांनी त्याला नेमले.
20
आमच्याकडून चालवलेल्या ह्या औदार्याच्या कार्यात कोणालाही आम्हांला दोष लावता येऊ नये म्हणून तजवीज करण्यात आली आहे;
21
कारण आम्ही ‘प्रभूच्या दृष्टीने जे मान्य’, इतकेच नव्हे तर ‘मनुष्यांच्याही’ दृष्टीने जे मान्य, ते करण्याची खबरदारी घेतो.
22
त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या दुसर्या एका बंधूला पाठवले आहे.2 त्याच्या उत्सुकतेची पारख आम्ही पुष्कळ गोष्टींत अनेक वेळा केली आहे; आणि आता तुमच्यावर त्याचा फार भरवसा असल्यामुळे तो अधिक उत्सुक आहे.
23
तीताविषयी कोणी विचारील तर तो माझा साथी व तुमच्याकरता माझा सहकारी साथी आहे; आमच्या बांधवांविषयी म्हणाल तर ते मंडळ्यांचे जासूद, ख्रिस्ताचे भूषण असे आहेत.
24
म्हणून त्यांना तुम्ही आपल्या प्रीतीचे आणि तुमच्या-विषयीच्या आमच्या अभिमानाचे प्रमाण मंडळ्यांसमक्ष दाखवा.
← Chapter 7
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 9 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13