bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
2 Samuel 15
2 Samuel 15
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 14
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 16 →
1
ह्यानंतर असे झाले की अबशालोमाने आपल्यासाठी रथ, घोडे व आपल्यापुढे दौडण्यासाठी पन्नास माणसे ठेवली.
2
अबशालोम नित्य पहाटेस उठून वेशीकडे जाणार्या रस्त्यात उभा राही आणि कोणी फिर्यादी दाद मागण्यासाठी राजाकडे आला म्हणजे त्याला बोलावून “तू कोणत्या नगराचा आहेस,” असे विचारी; तेव्हा तो म्हणे, “तुझा दास इस्राएलाच्या अमुक अमुक वंशातला आहे.”
3
तेव्हा अबशालोम त्याला म्हणे, “पाहा, तुझे प्रकरण चांगले व वाजवी आहे; पण तुझे ऐकून घेण्यासाठी राजाच्या वतीने कोणी मनुष्य नेमलेला नाही.”
4
अबशालोम त्याला आणखी म्हणे, “मला ह्या देशात न्यायाधीश केले असते तर किती बरे झाले असते? एखाद्याने आपला कज्जा किंवा प्रकरण माझ्याकडे आणले असते तर मी त्याला न्याय दिला असता.”
5
एखादा त्याला मुजरा करायला जवळ येई तेव्हा तो आपला हात पुढे करून त्याला धरून त्याचे चुंबन घेई.
6
इस्राएलातले जे जे लोक राजाकडे न्याय मागण्यासाठी येत त्या सर्वांशी तो असाच वागे; ह्या प्रकारे अबशालोमाने इस्राएल लोकांची मने हरण केली.
7
चार वर्षे संपल्यावर अबशालोम राजाला म्हणाला, “मला परवानगी असावी, म्हणजे परमेश्वराला मी जो नवस केला आहे तो हेब्रोन येथे जाऊन फेडीन.
8
मी अरामातील गशूर येथे राहत होतो तेव्हा आपल्या दासाने असा नवस केला होता की, परमेश्वराने मला यरुशलेमेत माघारी नेले तर मी परमेश्वराप्रीत्यर्थ अर्पणे करीन.”
9
राजा त्याला म्हणाला, “खुशाल जा.” मग तो उठून हेब्रोनास गेला.
10
अबशालोमाने इस्राएलाच्या सर्व वंशांकडे हेर पाठवून जाहीर केले की, “रणशिंगाचा शब्द तुम्ही ऐकाल तेव्हा असा घोष करा की, अबशालोम हेब्रोनास राजा झाला आहे.”
11
अबशालोमाच्या सांगण्यावरून त्याच्याबरोबर दोनशे पुरुष गेले. ते भोळ्या भावाने गेले; त्यांना काहीएक ठाऊक नव्हते.
12
यज्ञ करीत असताना अबशालोमाने दाविदाचा मंत्री गिलोनी अहीथोफेल ह्याला त्याचे नगर गिलो येथून बोलावून आणले. बंड वाढत गेले व अबशालोमाकडे लोक एकसारखे जमत गेले.
13
तेव्हा एका जासुदाने येऊन दाविदाला सांगितले, “इस्राएल लोकांची मने अबशालोमाकडे वळली आहेत.”
14
हे ऐकून दावीद यरुशलेमेतल्या आपल्या सर्व सेवकांना म्हणाला, “चला, आपण पळून जाऊ; न गेलो तर अबशालोमाच्या हातांतून कोणी सुटायचा नाही, निघून जाण्याची त्वरा करा, नाहीतर तो अचानक आपल्याला पकडून आपल्यावर अरिष्ट आणील व शहरावर तलवार चालवील.”
15
राजाचे सेवक त्याला म्हणाले, “पाहा, स्वामीराज, राजाच्या मनास येईल त्याप्रमाणे करायला आपले दास तयार आहेत.”
16
मग राजा निघून गेला व त्याच्यामागून त्याच्या घरची माणसे गेली. त्याच्या ज्या दहा स्त्रिया उपपत्नी होत्या त्यांना घर सांभाळायला ठेवून तो गेला.
17
राजा निघाला तेव्हा सर्व लोक त्याच्यामागून गेले व ते बेथ-मरहाक येथे थांबले.
18
त्याचे सर्व करेथी, पलेथी व त्याच्याबरोबर गथहून आलेले सहाशे गथकर हे त्याच्याबरोबर चालले.
19
राजा इत्तय गित्ती ह्याला म्हणाला, “तू आमच्याबरोबर का येतोस? तू आपला परत जाऊन राजाजवळ राहा; तू तर परका व हद्दपार केलेला आहेस; तू आपल्या स्थानी परत जा.
20
तू कालचा आलेला माणूस; मी वाट फुटेल तिकडे जाणार, तर आज तुला आमच्याबरोबर इकडेतिकडे दौडवत का फिरवावे? तर तू आपला परत जा, आणि आपल्या भाऊबंदांनाही परत ने; दया व सत्य ही तुझ्यासमागमे राहोत.”
21
इत्तयाने राजाला उत्तर केले, “परमेश्वराच्या जीविताची आणि माझ्या स्वामीराजांच्या जीविताची शपथ; प्राण जावो की राहो, जिकडे माझे स्वामीराज जातील तिकडे आपला सेवकही असणार.”
22
दावीद इत्तयास म्हणाला, “जा, पार निघून जा.” तेव्हा इत्तय गित्ती ह्याची सर्व माणसे व सर्व मुलेबाळे ही पार निघून गेली.
23
सर्व देशाने मोठा आकांत केला आणि सर्व लोक पार गेले; राजा किद्रोन ओहळापलीकडे गेला; सर्व लोकही पार उतरून गेले; ते रानाच्या वाटेने गेले.
24
तेव्हा पाहा, सादोक व त्याच्याबरोबर सर्व लेवी देवाच्या कराराचा कोश घेऊन आले; त्यांनी देवाचा कोश खाली ठेवला आणि सर्व लोक नगरातून बाहेर पार निघून जात तोपर्यंत अब्याथार वर राहिला.
25
राजा सादोकास म्हणाला, “देवाचा कोश नगरात परत घेऊन जा; परमेश्वराची कृपादृष्टी माझ्यावर झाली तर तो मला परत आणील आणि हा कोश व आपले मंदिर मला पुन्हा दाखवील;
26
पण मी तुझ्यावर आता प्रसन्न नाही असे तो म्हणाल्यास, पाहा, मी येथे हजर आहे, त्याच्या मर्जीस वाटेल तसे त्याने माझे करावे.”
27
राजा सादोक याजकाला म्हणाला, “तू द्रष्टा आहेस ना? तू नगरात सुखरूप परत जा, आणि तुमच्याबरोबर तुमच्या दोन्ही पुत्रांनी म्हणजे तुझा पुत्र अहीमास आणि अब्याथाराचा पुत्र योनाथान ह्यांनीही जावे.
28
पाहा, तुमच्याकडून मला काही संदेश येईपर्यंत मी रानामध्ये नदीच्या उतारानजीक थांबतो.”
29
तेव्हा सादोक व अब्याथार ह्यांनी देवाचा कोश परत यरुशलेमेला नेला व ते जाऊन तेथे राहिले.
30
दावीद जैतून पर्वताचा चढाव चढून गेला; तो रडत रडत वर चढून गेला; आपले मस्तक झाकून तो अनवाणी चालला; त्याच्याबरोबरची सर्व माणसे आपली मस्तके झाकून रडत रडत वर चढून गेली.
31
कोणी दाविदाला सांगितले की, “अहिथोफेल हाही बंडखोरांना सामील होऊन अबशालोमाबरोबर आहे.” हे ऐकून दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा, अहीथोफेलाची मसलत फोल कर.”
32
डोंगराच्या माथ्यावर ज्या ठिकाणी देवाची आराधना करीत असत तेथे दावीद जाऊन पोहचला, तेव्हा हूशय अर्की त्याला भेटायला आला; त्याचा अंगरखा फाटलेला होता व त्याच्या डोक्यात धूळ घातलेली होती.
33
दावीद त्याला म्हणाला, “तू माझ्याबरोबर आलास तर मला तू भार मात्र होशील.
34
तर तू नगरात परत जाऊन अबशालोमाला म्हण, ‘महाराज, मी आपला दास होतो; पूर्वी जशी मी आपल्या पित्याची नोकरी केली तशी मी आता आपली नोकरी करतो;’ असे केल्याने तू माझ्यासाठी अहीथोफेलाची मसलत निष्फळ करशील.
35
तेथे तुझ्याबरोबर सादोक व अब्याथार याजक हे असणार नाहीत काय? जी काही बातमी तुला राजमंदिरातून मिळेल ती तू सादोक व अब्याथार याजकांना कळव.
36
पाहा, त्यांच्याबरोबर त्यांचे दोन पुत्र म्हणजे सादोकाचा पुत्र अहीमास व अब्याथाराचा पुत्र योनाथान हेही आहेत; जे काही तुमच्या कानी पडेल ते त्यांच्या हस्ते मला सांगून पाठव.”
37
तेव्हा दाविदाचा मित्र हूशय नगरात गेला; अबशालोमही यरुशलेमेत दाखल झाला.
← Chapter 14
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 16 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24