bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
2 Samuel 22
2 Samuel 22
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 21
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 23 →
1
परमेश्वराने दाविदाला त्याच्या सर्व शत्रूंपासून व शौलाच्या हातांतून सोडवले त्या समयी त्याने परमेश्वराला हे कवन गाईले.
2
तो म्हणाला, “परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड मला सोडवणारा, माझाच होय.
3
माझा देव जो माझा दुर्ग, त्याचा आश्रय मी करतो; तो माझे कवच, माझे तारणशृंग, माझा उंच बुरूज, माझे शरणस्थान आहे; माझ्या उद्धारकर्त्या, घातापासून तू मला वाचवतोस.
4
स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो.
5
मृत्युतरंगांनी मला वेष्टिले अधर्माच्या पुरांनी मला घाबरे केले.
6
अधोलोकाच्या बंधनांनी मला घेरले, मृत्युपाश माझ्यावर आले.
7
मी आपल्या संकटात परमेश्वराचा धावा केला, माझ्या देवाला मी हाक मारली; त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, माझी हाक त्याच्या कानी गेली.
8
तेव्हा पृथ्वी हालली व कापली, आकाशाचे पाये डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता.
9
त्याच्या नाकपुड्यांतून धूर निघत होता, त्याच्या मुखातून अग्नी निघून ग्रासत चालला होता. त्यामुळे निखारे धगधगत होते.
10
तो आकाश लववून खाली उतरला; त्याच्या पायांखाली निबिड अंधकार होता.
11
तो करूबारुढ होऊन उडाला, वायूच्या पंखांवर तो दृष्टीस पडला.
12
त्याने आपल्याभोवती जलसंचय, आणि अंतराळातील अति घन मेघ ह्यांच्या अंधकाराचे मंडप आपल्यासभोवार केले.
13
त्याच्यापुढील तेजातून निखारे धगधगत होते.
14
परमेश्वराने आकाशातून गर्जना केली, परात्पराची वाणी झाली.
15
त्याने बाण सोडून त्यांची दाणादाण केली; विजा पाडून त्यांची त्रेधा उडवली.
16
तेव्हा परमेश्वराच्या धमकीने, त्याच्या नाकपुड्यांतील श्वासाच्या सोसाट्याने सागराचे तळ दिसू लागले, पृथ्वीचे पाये उघडे पडले.
17
त्याने वरून हात लांब करून मला धरले, आणि मोठ्या जलसंचयांतून मला बाहेर काढले.
18
माझा बलाढ्य वैरी व माझे द्वेष्टे ह्यांच्यापासून मला त्याने सोडवले, कारण ते माझ्याहून अति बलिष्ठ होते.
19
माझ्या विपत्काळी ते माझ्यावर चालून आले; तेव्हा परमेश्वर माझा आधार झाला.
20
त्याने मला प्रशस्त स्थळी बाहेर आणले, त्याने मला सोडवले, कारण माझ्यामध्ये त्याला संतोष होता.
21
परमेश्वराने माझ्या नीतिमत्तेप्रमाणे मला फळ दिले, माझ्या हाताच्या निर्मलतेप्रमाणे त्याने मला प्रतिफळ दिले.
22
कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो, मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही.
23
तर त्याचे सर्व निर्णय माझ्या दृष्टीपुढे असत, मी त्याच्या नियमांचा त्याग केला नाही,
24
मी त्याच्याशी निर्दोषतेने वागत असे, आणि मी अधर्मापासून स्वत:ला अलिप्त राखले.
25
ह्यास्तव परमेश्वराने माझ्या नीतिमत्तेप्रमाणे, त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या निर्मलतेप्रमाणे, मला प्रतिफळ दिले.
26
दयाळू जनांशी तू दयेने वागतोस, सात्त्विकाशी सात्त्विकतेने वागतोस;
27
शुद्ध जनांशी तू शुद्ध भावनेने वागतोस कुटिलांशी तू कुटिलतेने वागतोस.
28
दीन जनांस तू तारतोस, उन्मत्त जनांवर दृष्टी ठेवून त्यांचा अध:पात करतोस.
29
हे परमेश्वरा, तू माझा दीप आहेस; परमेश्वर माझ्या अंधकाराचा प्रकाश करतो.
30
तुझ्या साहाय्याने मी फौजेवर चाल करून जातो, माझ्या देवाच्या साहाय्याने मी तट उडून जातो.
31
देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग अव्यंग आहे; परमेश्वराचे वचन कसास लागलेले आहे; त्याचा आश्रय करणार्या सर्वांची तो ढाल आहे.
32
परमेश्वराशिवाय देव कोण आहे? आमच्या देवाशिवाय दुर्ग कोण आहे?
33
देव माझा अढळ दुर्ग आहे, सात्त्विक जनांस तो आपल्या मार्गाने नेतो.
34
तो माझे पाय हरिणीच्या पायांसारखे करतो, आणि मला माझ्या उच्च स्थानांवर स्थापतो.
35
तो माझ्या हातांना युद्धकला शिकवतो, म्हणून माझे भुज पितळी धनुष्य वाकवतात.
36
तू मला आपले तारणरूप कवच दिले आहे. तुझ्या लीनतेमुळे मला थोरवी प्राप्त झाली आहे.
37
तू माझ्या पावलांसाठी प्रशस्त जागा केली आहेस. माझे पाय घसरले नाहीत.
38
मी आपल्या वैर्यांच्या पाठीस लागून त्यांचा संहार केला, आणि त्यांचा नायनाट केल्याशिवाय परत फिरलो नाही.
39
मी त्यांचा धुव्वा उडवला, मी त्यांना इतका मार दिला की त्यांना उठता येईना, त्यांना मी पायांखाली तुडवले.
40
लढाईकरता तू मला सामर्थ्याचा कमरबंद बांधलास, माझ्यावर उठलेल्यास तू माझ्याखाली चीत केलेस.
41
तू माझ्या वैर्यांना पाठ दाखवायला लावलेस. मी आपल्या द्वेष्ट्यांचा अगदी संहार केला.
42
त्यांनी इकडेतिकडे पाहिले तरी त्यांना सोडवायला कोणी नव्हता; त्यांनी परमेश्वराचा धावा केला, तरी त्याने त्यांचे ऐकले नाही.
43
तेव्हा भूमीवरच्या धुळीसारखे मी त्यांचे चूर्ण केले, रस्त्यावरील चिखलाप्रमाणे मी त्यांना तुडवून दाबून टाकले.
44
माझ्या प्रजेच्या बखेड्यांपासून तू मला मुक्त केलेस; मी राष्ट्रांचा अधिपती व्हावे म्हणून तू माझे रक्षण केलेस; जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले.
45
परदेशीय लोकांनी माझे आर्जव केले; माझी कीर्ती त्यांच्या कानी पडताच ते मला वश झाले.
46
परदेशीय लोक गलित झाले; ते आपल्या कोटातून कापत कापत बाहेर आले
47
परमेश्वर जिवंत आहे; त्या माझ्या दुर्गाचा धन्यवाद होवो; माझा तारणदुर्ग जो देव त्याचा महिमा वाढो;
48
त्याच देवाने मला सूड उगवू दिला, अन्य राष्ट्रांना माझ्या सत्तेखाली आणले.
49
तोच मला माझ्या वैर्यांपासून सोडवतो, माझ्याविरुद्ध उठणार्यांवर तू माझे वर्चस्व करतोस, बलात्कारी माणसांपासून मला सोडवतोस.
50
ह्यास्तव हे परमेश्वरा, मी राष्ट्रांमध्ये तुझी स्तुती करीन, तुझ्या नामाची स्तोत्रे गाईन.
51
तो आपल्या राजाचा मोठा उद्धार करतो, आपल्या अभिषिक्ताला, दाविदाला व त्याच्या संततीला, सर्वकाळ वात्सल्य दाखवतो.”
← Chapter 21
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 23 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24