bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
2 Samuel 18
2 Samuel 18
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 19 →
1
दाविदाने दाने आपल्याबरोबरच्या लोकांची मोजदाद केली व त्यांच्यावर सहस्रपती व शतपती नेमले.
2
मग दाविदाने एक तृतीयांश लोक यवाबाच्या ताब्यात दिले; एक तृतीयांश लोक यवाबाचा भाऊ अबीशय जो सरूवेचा पुत्र होता त्याच्या व बाकीचे एक तृतीयांश लोक इत्तय गित्तीच्या ताब्यात दिले; व त्यांना युद्धासाठी पाठवले, आणि राजाने लोकांना सांगितले, “मीही अवश्य तुमच्याबरोबर येतो.”
3
लोकांनी म्हटले, “आपण येऊ नये; कारण आम्ही पळून गेलो तर त्याचे त्यांना काही वाटणार नाही; आमच्यातले अर्धे लोक मेले तरी त्यांना काही वाटायचे नाही; पण आपण तर आमच्यातल्या दहा हजारांच्या ठिकाणी आहात; म्हणून आपण नगरात राहूनच आम्हांला कुमक पाठवावी हे उत्तम.”
4
राजा त्यांना म्हणाला, “तुम्हांला योग्य वाटते तसे मी करतो.” मग राजा वेशीच्या बाजूस उभा राहिला, आणि लोक शंभरशंभर, हजारहजार असे बाहेर निघाले.
5
राजाने यवाब, अबीशय व इत्तय ह्यांना आज्ञा केली की, “त्या तरुणाशी म्हणजे अबशालोमाशी माझ्यासाठी सौम्यतेने वागा.” राजाने अबशालोमाविषयी आपल्या सरदारांना जी आज्ञा दिली ती सर्व लोकांनी ऐकली.
6
ह्या प्रकारे ते लोक इस्राएल लोकांशी सामना करण्यासाठी रणांगणात गेले, आणि एफ्राइमाच्या रानात लढाईला तोंड लागले.
7
तेथे दाविदाच्या सेवकांपुढे इस्राएल लोकांचा मोड झाला; त्या दिवशी एवढा संहार झाला की वीस हजार लोक कामास आले.
8
लढाई देशभर चालली; त्या दिवशी तलवारीपेक्षा रानामुळेच पुष्कळ लोकांचा धुव्वा उडाला.
9
अबशालोमाची दाविदाच्या सेवकांशी अकस्मात गाठ पडली. अबशालोम आपल्या खेचरावर बसून चालला होता; खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या दाट फांद्यांखालून चालले असताना अबशालोमाचे डोके त्या वृक्षाला अडकून तो अधांतरी लटकत राहिला व ते खेचर त्याच्याखालून निघून गेले.
10
हे पाहून एका माणसाने यवाबाला सांगितले की, “अबशालोम एका झाडाला लटकत असलेला मी पाहिला.”
11
यबावाने त्या खबर देणार्या माणसाला म्हटले, “तू त्याला तसे पाहून तेथल्या तेथे मारून जमिनीवर का पाडले नाहीस? मी तुला दहा शेकेल रुपे व कमरबंद दिला असता.”
12
तो माणूस यवाबाला म्हणाला, “हजार रुपये माझ्या हातावर ठेवले तरी मी राजकुमारावर हात टाकणार नाही; कारण तुमच्यातल्या कोणीही त्या तरुण पुरुषाला म्हणजे अबशालोमाला हात लावू नये अशी आज्ञा राजाने तुला, अबीशयाला व इत्तयाला दिली ती आम्हांला माहीत आहे.
13
मी हे केले असते तर मी आपला जीव धोक्यात घातला असता; तूही माझ्याविरुद्ध झाला असतास कारण राजापासून कोणतीच गोष्ट लपून राहत नाही.”
14
यवाब म्हणाला, “तुझ्या नादी लागून वेळ घालवण्यात काही अर्थ नाही.” मग त्याने हाती तीन तीर घेऊन एला वृक्षावर जिवंत लटकत असलेल्या अबशालोमाच्या वक्षस्थळी ते भोसकले.
15
यवाबाच्या दहा शस्त्रवाहक तरुण पुरुषांनी त्याच्याभोवती जमून त्याच्यावर प्रहार करून त्याला ठार केले.
16
मग यवाबाने रणशिंग फुंकले तेव्हा लोक इस्राएलाचा पाठलाग करण्याचे सोडून परतले; कारण यवाबाने लोकांची गय केली.
17
तेव्हा लोकांनी अबशालोमाला खाली काढून वनातल्या मोठ्या खड्ड्यात टाकले व त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास केली; मग सर्व इस्राएल लोक पळून आपापल्या डेर्यांकडे गेले.
18
आपले नाव चालवण्यास कोणी पुत्र नाही हे लक्षात घेऊन अबशालोमाने आपल्या हयातीत एक मनोरा उभारला होता, तो राजाच्या खोर्यात आहे. त्या मनोर्याला त्याने आपले नाव दिले; आजपर्यंत त्याला अबशालोमाचा स्मारकस्तंभ म्हणत आले आहेत.
19
सादोकाचा पुत्र अहीमास म्हणाला की, “परमेश्वराने आपल्या शत्रूंचे पारिपत्य केले आहे, तर आता धावत जाऊन ही खबर राजाला देऊ द्या.”
20
यवाब त्याला म्हणाला, “आज ही खबर घेऊन जाऊ नकोस; दुसर्या एखाद्या दिवशी ती घेऊन जा; पण आज ती नेऊ नकोस; कारण राजाचा पुत्र मृत्यू पावला आहे.”
21
नंतर यवाब एका कूशी माणसाला म्हणाला, “तू जे काही पाहिले ते जाऊन राजाला सांग.” तेव्हा तो कूशी यवाबाला नमन करून धावत गेला.
22
सादोकाचा पुत्र अहीमास पुन्हा यवाबाला म्हणाला, “काहीही होवो पण मलाही कूशीच्या मागोमाग दौड करू दे.” यवाब म्हणाला, “माझ्या मुला, इनाम मिळण्याजोगी खबर काही तुझ्याजवळ नाही, तर का दौड करतोस?”
23
तो म्हणाला, “काहीही होवो, मला धावत जाऊ दे.” त्याने त्याला म्हटले, “धाव.” तेव्हा अहीमास दौड करून मैदानाच्या वाटेने कूशीच्या पुढे निघून गेला.
24
दावीद वेशीच्या दोन्ही दरवाजांच्या दरम्यान बसला होता, आणि पहारेकरी वेशीवर चढून तटावर गेला होता; त्याने दूर नजर करून पाहिले तर एक मनुष्य एकटाच दौडत येत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले.
25
पहारेकर्याने पुकारून राजाला ते सांगितले तेव्हा राजा म्हणाला, “तो एकटाच येत असला तर तो काहीतरी खबर घेऊन येत आहे.” इतक्यात तो मनुष्य धावत धावत जवळ येऊन पोहचला.
26
पहारेकर्याने दुसरा एक मनुष्य धावत येताना पाहिला; तेव्हा त्याने वेसकर्याला हाक मारून सांगितले, “पाहा, आणखी एक मनुष्य एकटाच दौडत येत आहे.” राजा म्हणाला, “तोही काही खबर आणत असावा.”
27
पहारेकरी म्हणाला, “पहिल्याची दौड सादोकाचा पुत्र अहीमास ह्याच्या दौडीसारखी आहे असे मला वाटते.” राजा म्हणाला, “तो भला मनुष्य आहे, त्याने काही चांगली खबर आणली असावी.”
28
मग अहीमासाने येऊन “महाराजांचे क्षेम असो,” असे म्हटले, आणि जमिनीपर्यंत लवून राजाला मुजरा केला व म्हटले, “आपला देव परमेश्वर धन्य आहे, त्याने माझ्या स्वामीराजांवर हात उचलणार्या माणसांना आपल्या काबूत दिले आहे.”
29
राजाने विचारले, “तरुण अबशालोम खुशाल आहे ना?” अहीमास म्हणाला, “यवाबाने एका सेवकाला व आपला दास जो मी त्याला पाठवले तेव्हा माझ्या दृष्टीला मोठी गर्दी पडली, पण काय झाले ते मला कळले नाही.”
30
राजा त्याला म्हणाला, “बाजूला सरून येथे उभा राहा.” तेव्हा तो बाजूस होऊन तेथे उभा राहिला.
31
इतक्यात कूशीही येऊन म्हणाला, “स्वामीराजांसाठी मी खबर आणली आहे; परमेश्वराने आज न्याय करून आपल्यावर उठलेल्या सर्वांच्या हातून आपला बचाव केला आहे.”
32
राजाने कूशीला विचारले, “तो तरुण अबशालोम सुखरूप आहे ना?” कूशी म्हणाला, “माझ्या स्वामीराजांचे शत्रू व जे कोणी आपली हानी करायला उठतील त्यांचे त्या तरुणासारखे होवो!”
33
तेव्हा राजा फार गहिवरला आणि वेशीवरल्या कोठडीत जाऊन रडला; जाता जाता त्याने हे उद्गार काढले; “माझ्या पुत्रा अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा अबशालोमा: तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. अरेरे! अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!!”
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 19 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24