bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Ecclesiastes 10
Ecclesiastes 10
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 11 →
1
गंध्याच्या तेलास, मरून पडलेल्या माश्यांमुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते, तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा ह्यांवर बसतो.
2
शहाण्याचे मन उजवीकडे पण मूर्खाचे मन डावीकडे असते.
3
मूर्ख आपल्या बुद्धीशी फारकत करून वाटेने चालला असता ज्याला-त्याला म्हणतो, तू मूर्ख आहेस.
4
तुझ्यावर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नकोस, कारण शांतीने मोठमोठी पापकर्मे टळतात.
5
भूतलावर मी एक अनिष्ट पाहिले, ते अधिपतीच्या चुकीने होते असे मला दिसले;
6
ते हे की मूर्खत्व अति प्रतिष्ठित स्थानी स्थापित होते, आणि श्रीमंतांना नीच स्थानी बसावे लागते.
7
चाकर घोड्यावर बसताना व सरदार चाकराप्रमाणे जमिनीवर पायी चालताना मी पाहिले.
8
जो खड्डा खणतो तोच त्यात पडतो; जो कुंपण तोडतो त्याला सर्प डसतो.
9
धोंडे फोडणार्याला त्यांपासून इजा होते; लाकडे तोडणारा त्यांमुळे धोक्यात येतो.
10
लोखंडी हत्यार बोथटले व त्याला धार लावली नाही तर अधिक जोर लावावा लागतो. कार्यसिद्धीस ज्ञान उपयोगाचे आहे.
11
सर्पावर मंत्रप्रयोग होण्यापूर्वी तो डसला तर पुढे मांत्रिकांचा काही उपयोग नाही.
12
शहाण्याच्या तोंडचे शब्द अनुग्रहपर असतात; पण मूर्खाचे तोंड त्यालाच ग्रासते.
13
त्याच्या तोंडच्या शब्दांच्या आरंभी मूर्खपणा व त्याच्या भाषणाच्या अंती अपायकारक वेडेपणा असतो.
14
मूर्ख फार वाचाळपणा करतो, परंतु पुढे काय होणार हे मनुष्याला ठाऊक नसते; त्याच्यामागे काय होणार हे त्याला कोणाच्याने सांगवेल?
15
मूर्ख श्रम करून करून थकतो पण त्याला शहराची वाटदेखील उमगत नसते.
16
हे देशा, तुझा राजा अल्पवयी असला व तुझे सरदार प्रातःकाळी उठून खातपीत बसले तर तुझी दुर्दशा केवढी!
17
हे देशा, तुझा राजा कुलीन घराण्यातला असला व तुझे सरदार नशेसाठी नव्हे तर बलप्राप्तीसाठी योग्य वेळी भोजन करीत असले तर तू धन्य!
18
आळसाने घराचे छप्पर खाली येते; हाताच्या सुस्तीने घर गळते.
19
ख्यालीखुशालीसाठी मेजवानी करतात; द्राक्षारस जिवास उल्लास देतो; पैशाने सर्वकाही साध्य होते.
20
तू आपल्या मनातही राजाला शाप देऊ नकोस; आपल्या निजायच्या खोलीतसुद्धा श्रीमंताना शिव्याशाप देऊ नकोस; कारण अंतराळातले पाखरू तुझे शब्द घेऊन उडून जाईल; पक्षी तुझी गोष्ट प्रकट करील.
← Chapter 9
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 11 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12