bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Ecclesiastes 11
Ecclesiastes 11
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 12 →
1
आपले अन्न जलाशयावर सोड; ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती येईल.
2
तू सातआठ जणांस वाटा दे; कारण पृथ्वीवर काय अनिष्ट प्रसंग येईल ते तुला ठाऊक नाही.
3
मेघ जलपूर्ण झाले म्हणजे ते स्वतःला पृथ्वीवर रिचवतात; झाड दक्षिणेकडे पडो की उत्तरेकडे पडो, ते पडेल त्याच ठिकाणी राहणार.
4
जो वारा पाहत राहतो, तो पेरणी करणार नाही; जो मेघांचा रंग पाहत बसतो, तो कापणी करणार नाही.
5
वार्याची1 गती कशी असते, गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात हाडे कशी बनतात हे तुला कळत नाही; तसेच सर्वकाही घडवणार्या देवाची कृती तुला कळत नाही.
6
सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीही आपला हात आवरू नकोस; कारण त्यांतून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील, हे तुला ठाऊक नसते.
7
प्रकाश खरोखर मनोहर असतो; सूर्यदर्शन नेत्रांना रम्य असते.
8
मनुष्य कितीही वर्षे जगला तरी ती त्याने आनंदाने घालवावीत; अंधकाराचे दिवस बहुत असणार हे तो मनात वागवो; जे प्राप्त होणार ते सर्व व्यर्थच आहे!
9
हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो; तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल; पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे.
10
ह्यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख; कारण तारुण्य व भरज्वानी ही व्यर्थ आहेत.
← Chapter 10
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 12 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12