bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Ecclesiastes 6
Ecclesiastes 6
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 7 →
1
मी भूतलावर एक अनिष्ट पाहिले; ते मनुष्यावर मोठ्या बोजासारखे असते.
2
ते हे: कोणा मनुष्याला देव धन, संपत्ती व प्रतिष्ठा ही एवढी देतो की त्याला पाहिजे ते मनसोक्त मिळते, काही कमी पडत नाही; तरी देव त्याला ते भोगू देत नाही, ते परकाच भोगतो; हेही व्यर्थ व एक मोठी विकृतीच होय.
3
कोणा मनुष्याला शंभर मुले झाली व तो बहुत वर्षे जगला, त्याच्या आयुष्याची वर्षसंख्या मोठी असली, तरी त्याचा जीव सुखप्राप्तीने समाधान पावला नाही, त्याचे उत्तरकार्य झाले नाही, तर अशा मनुष्यापेक्षा मृतपिंड पुरवला, असे मी म्हणतो.
4
कारण तो शून्यावस्थेत येतो व अंधकारात नाहीसा होतो; त्याचे नाव अंधकाराने व्याप्त राहते.
5
त्याप्रमाणेच सूर्य त्याला दिसला नाही की कळला नाही; म्हणून ह्याला त्या दुसर्या मनुष्यापेक्षा अधिक शांती प्राप्त होते.
6
हजारांच्या दुप्पट वर्षे जगूनही त्याने काही सुख भोगले नाही तर त्यात काय अर्थ? सर्व एकाच स्थानी जातात ना?
7
मनुष्याचे सर्व परिश्रम पोटासाठी आहेत, तरी त्याच्या जिवाची तृप्ती म्हणून होत नाही.
8
मूर्खापेक्षा शहाण्याला काय अधिक लाभ होतो? त्याप्रमाणेच जो दीन असून लोकांत कसे वागावे हे जाणतो त्याला तरी काय लाभ?
9
मन इकडेतिकडे धावू देण्यापेक्षा तुझ्या दृष्टीसमोर असलेल्या गोष्टीत सुख मानणे बरे; हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.
10
जे काही झाले आहे त्याला पूर्वीच नाव दिले होते; मनुष्याचे काय होणार हेही पूर्वीच माहीत असते; त्याच्याहून जो समर्थ त्याच्याशी त्याला झगडता येणार नाही.
11
व्यर्थतेची वृद्धी करणार्या अशा बहुत गोष्टी आहेत; त्यांपासून मनुष्याला काय लाभ?
12
मनुष्य आपल्या निरर्थक आयुष्याचे छायारूप दिवस घालवतो, त्यात त्याला काय लाभ होतो ते कोणास ठाऊक? मनुष्याच्या पश्चात भूतलावर काय होईल हे त्याला कोणाच्याने सांगवेल?
← Chapter 5
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 7 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12