bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Genesis 18
Genesis 18
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 49
Chapter 50
Chapter 19 →
1
तो दिवसा भर उन्हाच्या वेळी डेर्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने मम्रेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले;
2
त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्यासमोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेर्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले;
3
तो म्हणाला, “हे प्रभू, माझ्यावर तुझी कृपादृष्टी असेल तर ये; तुझ्या दासापासून पुढे जाऊ नकोस;
4
थोडे पाणी आणू द्या; तुम्ही आपले पाय धुऊन ह्या झाडाखाली विसावा घ्या.
5
मी थोडी भाकर आणतो, तिचा आपल्या जिवास आधार करा, मग पुढे जा; ह्यासाठी तुमचे ह्या आपल्या दासाकडे येणे झाले असावे.” ते म्हणाले, “तू म्हणतोस ते कर.”
6
तेव्हा अब्राहाम त्वरेने डेर्यात सारेकडे जाऊन म्हणाला, “तीन मापे सपीठ लवकर घे व ते मळून त्याच्या भाकरी कर.”
7
अब्राहाम गुरांकडे धावत गेला व त्याने एक चांगले कोवळे वासरू निवडून चाकराकडे दिले; त्याने ते त्वरेने रांधले.
8
नंतर अब्राहामाने दही, दूध व ते रांधलेले वासरू आणून त्याच्यापुढे ठेवले आणि ते जेवत असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला.
9
मग ते त्याला म्हणाले, “तुझी बायको सारा कोठे आहे?” तो म्हणाला, “ती डेर्यात आहे.”
10
मग तो म्हणाला, “पुढल्या वसंत ऋतूत (जीवनाच्या वेळेस) मी तुझ्याकडे खात्रीने परत येईन; तेव्हा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल.” त्याच्यामागे डेर्याच्या दारी सारा हे ऐकत होती.
11
अब्राहाम व सारा हे वृद्ध, वयातीत होते आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते.
12
तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, “मी जख्ख म्हातारी झाले आहे. माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय?”
13
परमेश्वर अब्राहामाला म्हणाला, “सारा का हसली? मी आता अशी वृद्ध झाले असता मला खरोखर मुलगा होणार काय, असे ती का म्हणाली?
14
परमेश्वराला काही असाध्य आहे काय? नेमलेल्या समयी वसंत ऋतूत मी तुझ्याकडे परत येईन तेव्हा सारेला मुलगा होईल.”
15
तेव्हा सारा नाकारून म्हणाली, “मी हसले नाही;” कारण ती घाबरली होती; पण तो म्हणाला, “नाही, तू हसलीसच.”
16
नंतर ते पुरुष तेथून उठून सदोम नगराकडे जाण्यास निघाले आणि अब्राहाम त्यांना वाटेस लावण्यास गेला.
17
परमेश्वर म्हणाला, “मी जे करणार आहे ते अब्राहामापासून लपवून ठेवू काय?
18
कारण त्याचे मोठे व समर्थ राष्ट्र खात्रीने होणार, आणि त्याच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार.
19
मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की त्याने आपल्या लेकरांना व आपल्या पश्चात आपल्या घराण्याला आज्ञा द्यावी आणि त्यांनी न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा आणि हे अशासाठी की परमेश्वर अब्राहामाविषयी जे बोलला ते त्याने त्याला प्राप्त करून द्यावे.”
20
मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा ह्यांच्याविषयीची ओरड फारच झाली आहे व खरोखर त्यांचे पाप फार भारी आहे,
21
म्हणून त्यांच्याविषयीची जी ओरड माझ्या कानी आली आहे तशीच त्यांची करणी आहे की काय हे पाहायला मी खाली जातो; तसे नसेल तर मला कळून येईल.”
22
तेथून ते पुरुष वळून सदोमाकडे चालते झाले; पण अब्राहाम तसाच परमेश्वरासमोर उभा राहिला.
23
अब्राहाम जवळ जाऊन म्हणाला, “तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही संहार खरेच करणार काय?
24
त्या नगरात कदाचित पन्नास नीतिमान असतील तर त्यांचा तू खरेच संहार करणार काय? त्याच्यातल्या पन्नास नीतिमानांसाठी त्या नगराची तू गय करणार नाहीस काय?
25
ह्या प्रकारची कृती तुझ्यापासून दूर राहो. ज्यामुळे नीतिमानाची आणि दुष्टाची सारखीच गत होईल असा दुर्जनाबरोबर नीतिमानाचा वध करणे तुझ्यापासून दूर राहो; सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?”
26
परमेश्वर म्हणाला, “मला सदोम नगरात पन्नास नीतिमान आढळले तर त्यांच्यासाठी मी त्या सगळ्या स्थलाची गय करीन.”
27
अब्राहाम म्हणाला, “पाहा, मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करत आहे;
28
कदाचित पन्नासात पाच कमी नीतिमान असतील तर पाच कमी म्हणून तू सर्व नगराचा नाश करशील काय?” तेव्हा तो म्हणाला, “मला तेथे पंचेचाळीस आढळले तर मी त्याचा नाश करणार नाही.”
29
त्याने पुन्हा म्हटले, “तेथे कदाचित चाळीसच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या चाळिसांकरता मी तसे करणार नाही.”
30
मग तो म्हणाला, “मी बोलतो ह्याचा प्रभूला राग न यावा; तेथे कदाचित तीसच आढळले तर?” तो म्हणाला, “मला तीसच आढळले तर मी तसे करणार नाही.”
31
मग तो म्हणाला, “पाहा, मी प्रभूशी बोलण्याचे धाडस करत आहे; तेथे कदाचित वीसच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या विसांकरता मी त्याचा नाश करणार नाही.”
32
तो म्हणाला, “प्रभूला राग न यावा; मी आणखी एकदाच बोलतो. तेथे कदाचित दहाच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या दहांकरता त्याचा नाश करणार नाही.”
33
मग अब्राहामाशी बोलणे संपवल्यावर परमेश्वर निघून गेला, आणि अब्राहाम आपल्या ठिकाणी परत आला.
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 49
Chapter 50
Chapter 19 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50