bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Genesis 47
Genesis 47
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 46
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 49
Chapter 50
Chapter 48 →
1
मग योसेफाने फारोकडे जाऊन त्याला सांगितले, “माझा बाप व माझे भाऊ आपली शेरडेमेंढरे, गुरेढोरे आणि आपले सर्वस्व घेऊन कनान देशातून निघून आले आहेत; हल्ली ते गोशेन प्रांतात आहेत.”
2
त्याने आपल्या भावांपैकी पाच जणांना फारोपुढे नेऊन उभे केले.
3
फारोने योसेफाच्या भावांना विचारले, “तुमचा धंदा काय?” ते फारोला म्हणाले, “आपल्या दासांचा व त्यांच्या वाडवडिलांचा धंदा मेंढरे पाळण्याचा आहे.”
4
ते फारोला आणखी म्हणाले, “आम्ही ह्या देशात काही दिवस राहायला आलो आहोत. कनान देशात भारी दुष्काळ पडल्यामुळे आपल्या दासांच्या शेरडामेंढरांना चारा नाही, तर कृपा करून आपल्या दासांना गोशेन प्रांतात राहू द्यावे.”
5
फारो योसेफाला म्हणाला, “तुझा बाप व तुझे भाऊ तुझ्याकडे आले आहेत;
6
मिसर देश तुझ्यापुढे खुला आहे; ह्या देशातल्या उत्तम भागात आपल्या बापाला व भावांना वस्ती करू दे; त्यांना गोशेन प्रांतात राहू दे; त्यांच्यापैकी जी कोणी हुशार माणसे तुला ठाऊक असतील त्यांना माझ्या गुराख्यांचे नायक कर.”
7
योसेफाने आपला बाप याकोब ह्याला आणून फारोपुढे हजर केले, तेव्हा याकोबाने फारोला आशीर्वाद दिला.
8
फारोने याकोबाला विचारले, “तुझे वय किती वर्षांचे आहे?”
9
याकोब फारोला म्हणाला, “माझी जीवितयात्रा एकशे तीस वर्षांची झाली आहे; माझ्या आयुष्याचे दिवस अल्प असून दु:खाचे गेले, आणि ते माझ्या वाडवडिलांच्या जीवितयात्रेच्या आयुष्यमर्यादेस जाऊन पोचले नाहीत.”
10
याकोब फारोला आशीर्वाद देऊन त्याच्यापुढून निघून गेला.
11
नंतर योसेफाने आपला बाप व भाऊ ह्यांच्या राहण्याची व्यवस्था केली; त्याने फारोच्या आज्ञेनुसार मिसर देशाच्या उत्तम भागात म्हणजे रामसेस प्रांतात त्यांना वतन करून दिले.
12
योसेफाने आपला बाप, आपले भाऊ आणि आपल्या बापाच्या घरची माणसे ह्यांना त्यांच्या मुलाबाळांच्या संख्येप्रमाणे अन्नसामग्री पुरवून त्यांचे संगोपन केले.
13
त्या समयी सर्व देशात अन्न राहिले नाही, कारण दुष्काळ एवढा भारी झाला की त्यामुळे मिसर देश व कनान देश हैराण झाले.
14
मिसर देशातील व कनान देशातील लोकांनी विकत घेतलेल्या धान्याच्या मोबदल्यात जेवढा पैसा मिळाला तेवढा पैसा योसेफाने जमा केला व तो फारोच्या घरी पोचता केला.
15
मिसर देशात व कनान देशात काही पैसा उरला नाही, तेव्हा सर्व मिसरी लोक योसेफाकडे येऊन म्हणाले, “आम्हांला अन्न द्या. आपल्यादेखत आम्ही का उपाशी मरावे? आमचा सर्व पैसा संपला.”
16
योसेफ म्हणाला, “तुमचा पैसा संपला तर तुमची गुरे द्या म्हणजे त्यांच्या मोबदल्यात तुम्हांला अन्न देईन.”
17
तेव्हा त्यांनी आपली गुरे योसेफाकडे आणली, त्यांचे घोडे, शेरडेमेंढरे, गुरेढोरे व गाढवे घेऊन त्यांच्या मोबदल्यात त्यांना तो अन्न पुरवू लागला; त्यांची सगळी गुरे घेऊन त्याने त्यांना अन्न देऊन त्यांचे पोषण केले.
18
ते वर्ष संपले तेव्हा पुढील वर्षी ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, “आमचा सर्व पैसा संपला, हे आम्ही स्वामींपासून लपवत नाही; आमच्या गुराढोरांचे कळप स्वामींचे झाले आहेत; आता स्वामींसमोर सादर करण्यास आमची शरीरे व आमच्या जमिनी ह्यांखेरीज आमच्याजवळ काहीएक राहिले नाही;
19
आपल्यादेखत आम्ही का मरावे आणि आमचा व आमच्या जमिनीचा नाश का व्हावा? आम्हांला व आमच्या जमिनी विकत घेऊन आम्हांला अन्न द्या, आम्ही व आमच्या जमिनी ह्यांच्यावर फारोची मालकी होवो; आम्हांला बियाणे द्या म्हणजे आम्ही जगू, मरणार नाही आणि आमच्या जमिनी उजाड पडायच्या नाहीत.
20
ह्या प्रकारे योसेफाने मिसरातील सारी जमीन फारोच्या नावे विकत घेतली. दुष्काळ कडक पडल्यामुळे प्रत्येक मिसर्याने आपली शेते विकली. सर्व भूमी फारोची झाली.
21
त्याने देशाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंतच्या सर्व लोकांना दास1 केले.
22
मात्र याजकांची जमीन त्याने घेतली नाही, कारण याजकांना फारोकडून नेमणूक होती आणि फारोने त्यांना दिलेल्या नेमणुकीत ते निर्वाह करत, म्हणून त्यांनी आपली जमीन विकली नाही.
23
मग योसेफ लोकांना म्हणाला, “आज मी तुमच्या जमिनीसह तुम्हांला फारोच्या नावे विकत घेतले आहे; हे बियाणे घ्या व जमिनी पेरा.
24
तुम्ही हंगामाच्या वेळी उत्पन्नाचा पाचवा हिस्सा फारोला द्यावा; बाकीचे चार हिस्से तुमच्या मालकीचे होतील; ते शेताच्या बियाणांसाठी आणि तुम्हांला, तुमच्या घरच्यांना आणि तुमच्या मुलाबाळांना खाण्यासाठी ठेवा.”
25
ते म्हणाले, “आपण आमचे प्राण वाचवले, स्वामींची आमच्यावर कृपादृष्टी राहो, आम्ही फारोचे दास होऊन राहू.”
26
फारोला उत्पन्नाचा पाचवा हिस्सा द्यावा हा कायदा योसेफाने मिसर देशाच्या जमिनीस लावून दिला तो आजवर चालत आहे; मात्र याजकांच्या जमिनी फारोच्या झाल्या नाहीत.
27
इस्राएल लोक मिसर देशातल्या गोशेन प्रांतात वस्ती करून राहिले; तेथे त्यांनी वतने केली; ते फलद्रूप होऊन बहुगुणित झाले.
28
याकोब मिसर देशात सतरा वर्षे जगला; ह्याप्रमाणे याकोबाचे सगळे वय एकशे सत्तेचाळीस वर्षांचे झाले.
29
इस्राएलाचा अंतकाळ समीप आला तेव्हा त्याने आपला मुलगा योसेफ ह्याला बोलावून आणून म्हटले, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी असेल तर माझ्याशी तू ममतेने व सत्यतेने वागून मला मिसर देशात पुरणार नाहीस अशी शपथ माझ्या मांडीखाली हात ठेवून वाहा;
30
मी आपल्या वाडवडिलांबरोबर निद्रा घेण्यास गेलो म्हणजे मला मिसर देशाबाहेर घेऊन जा आणि माझ्या वाडवडिलांच्या कबरस्तानात ठेव.” तो म्हणाला, “आपल्या सांगण्याप्रमाणे मी करीन.
31
तो म्हणाला, “माझ्याशी शपथ वाहा”; तेव्हा त्याने शपथ वाहिली; आणि इस्राएलाने पलंगाच्या उशावर आपले शरीर लववून नमन केले.
← Chapter 46
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 49
Chapter 50
Chapter 48 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50