bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Genesis 24
Genesis 24
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 49
Chapter 50
Chapter 25 →
1
अब्राहाम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला; परमेश्वराने अब्राहामाला सर्व बाबतींत आशीर्वादित केले होते.
2
अब्राहामाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वांत जुना सेवक होता, त्याला त्याने म्हटले, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव.
3
मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी ह्यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी लोकांत मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीही नवरी माझ्या मुलासाठी तू पाहणार नाहीस.
4
तर माझ्या देशाला माझ्या आप्तांकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक ह्याच्यासाठी नवरी पाहून आणशील.”
5
त्याचा सेवक त्याला म्हणाला, “यदाकदाचित नवरी माझ्याबरोबर ह्या देशात येण्यास कबूल झाली नाही तर ज्या देशातून तुम्ही आला त्यात तुमच्या मुलास मी परत घेऊन जावे काय?”
6
तेव्हा अब्राहाम त्याला म्हणाला, “खबरदार! माझ्या मुलाला तिकडे न्यायचे नाही.
7
स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन. तो तुझ्यापुढे आपला दूत पाठवील आणि तू तेथूनच माझ्या मुलासाठी नवरी आण.
8
पण ती नवरी तुझ्याबरोबर येण्यास कबूल झाली नाही तर तू ह्या माझ्या शपथेतून मोकळा होशील; मात्र माझ्या मुलाला तिकडे परत नेऊ नकोस.”
9
तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राहाम ह्याच्या मांडीखाली हात ठेवून त्या बाबतीत शपथ वाहिली.
10
मग तो सेवक आपल्या धन्याच्या उंटांपैकी दहा उंट घेऊन निघाला; त्याच्याजवळ त्याच्या धन्याच्या सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू होत्या; तो अराम-नहराईम ह्यातील नाहोराच्या नगरात गेला.
11
संध्याकाळी स्त्रिया पाणी भरायला बाहेर पडतात त्या सुमारास त्याने नगराबाहेरील विहिरीजवळ आपले उंट बसवले,
12
आणि तो म्हणाला, “हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहाम ह्याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर; माझा धनी अब्राहाम ह्याच्यावर दया कर.
13
पाहा, मी ह्या पाण्याच्या विहिरीजवळ उभा आहे, आणि गावातल्या कन्या पाणी भरायला बाहेर येत आहेत.
14
तर असे घडून येऊ दे की ज्या मुलीला मी म्हणेन, मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर, आणि ती मला म्हणेल, तू पी आणि तुझ्या उंटांनाही मी पाजते, तीच तुझा सेवक इसहाक ह्याच्यासाठी तू नेमलेली असो; ह्यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर दया केली आहेस.”
15
त्याचे बोलणे संपले नाही तोच अब्राहामाचा बंधू नाहोर ह्याची बायको मिल्का हिचा पुत्र बथुवेल ह्याला झालेली रिबका खांद्यावर घागर घेऊन पुढे आली.
16
ती मुलगी दिसायला फार सुंदर होती; ती कुमारी होती; तिने पुरुष पाहिला नव्हता. ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली.
17
तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, “तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज.”
18
ती म्हणाली, “प्या, बाबा;” आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरवून घेऊन त्याला पाणी पाजले.
19
त्याला पुरेसे पाणी पाजल्यावर ती म्हणाली, “मी तुमच्या उंटांसाठी पाणी आणून त्यांना पोटभर पाजते.”
20
मग तिने त्वरा करून घागर डोणीत रिचवली व पुन: पाणी आणायला ती विहिरीकडे धावत गेली; असे तिने त्याच्या सर्व उंटांसाठी पाणी काढले.
21
तेव्हा तो मनुष्य अचंबा करून तिच्याकडे पाहत राहिला; परमेश्वराने आपला प्रवास सफळ केला किंवा कसे ह्याचा विचार करत तो स्तब्ध राहिला.
22
उंटांचे पाणी पिणे झाल्यावर त्या मनुष्याने अर्धा शेकेल भार सोन्याची एक नथ व तिच्या हातांत घालण्यासाठी दहा शेकेल भार सोन्याच्या दोन बांगड्या काढल्या,
23
आणि तो म्हणाला, “तू कोणाची मुलगी आहेस हे मला सांग; तुझ्या बापाच्या घरी आम्हांला उतरायला जागा आहे काय?”
24
ती त्याला म्हणाली, “नाहोरापासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची मी कन्या.” ती आणखी त्याला म्हणाली,
25
“आमच्या येथे पेंढा व वैरण हवी तितकी आहे, आणि उतरायला जागाही आहे.”
26
तेव्हा त्या मनुष्याने नमून परमेश्वराचे स्तवन केले.
27
तो म्हणाला, “माझा धनी अब्राहाम ह्याचा देव परमेश्वर धन्यावादित आहे; त्याने माझ्या धन्यावर दया करण्याचे व त्याच्याशी सत्यतेने वर्तण्याचे सोडले नाही; परमेश्वराने मला नीट वाट दाखवून माझ्या धन्याच्या भाऊबंदांच्या घरी पोचवले आहे.”
28
तेव्हा त्या मुलीने धावत जाऊन आपल्या आईच्या घरच्यांना ही हकिकत कळवली.
29
रिबकेला एक भाऊ होता, त्याचे नाव लाबान होते; तो विहिरीजवळ त्या मनुष्याकडे धावत गेला.
30
त्याने नथ व आपल्या बहिणीच्या हातांतल्या बांगड्या पाहिल्या आणि, ‘मला तो मनुष्य असे असे म्हणाला,’ हे रिबकेच्या तोंडचे शब्द ऐकले, तेव्हा तो त्या मनुष्याकडे आला आणि पाहतो तर उंटांपाशी विहिरीजवळ तो उभा आहे.
31
तेव्हा त्याने म्हटले, “अहो, या; परमेश्वराचा आशीर्वाद आपणावर आहे. आपण बाहेर का उभे आहात? मी आपणा-साठी घर व आपल्या उंटांसाठी जागा तयार केली आहे.”
32
मग तो मनुष्य घरी आला; आणि लाबानाने उंटांच्या कंठाळी सोडून त्यांना पेंढावैरण दिली, आणि त्याला व त्याच्या बरोबरच्या माणसांना पाय धुण्यास पाणी दिले.
33
त्याच्यापुढे अन्न वाढले तेव्हा तो म्हणाला, “मी आपले येण्याचे प्रयोजन सांगण्याच्या आधी जेवणार नाही.” तेव्हा त्याने म्हटले, “सांगा.”
34
तो म्हणाला, “मी अब्राहामाचा सेवक आहे.
35
परमेश्वराने माझ्या धन्याचे फार कल्याण केले आहे; तो थोर झाला आहे; त्याने त्याला गुरे, मेंढरे, सोने, रुपे, दासदासी, उंट व गाढवे दिली आहेत.
36
माझ्या धन्याची बायको सारा हिला वृद्धापकाळी त्याच्यापासून मुलगा झाला, त्याला त्याने आपले सर्वस्व दिले आहे.
37
आणि माझ्या धन्याने मला शपथ घ्यायला लावून सांगितले आहे की, ज्या कनान्यांच्या देशात मी राहत आहे त्यांच्या मुलींतली नवरी माझ्या मुलासाठी पाहू नकोस;
38
तर माझ्या बापाच्या घरी माझ्या आप्तांकडे जा आणि तेथून माझ्या मुलासाठी नवरी पाहून आण.
39
तेव्हा मी आपल्या धन्यास म्हटले, नवरी माझ्याबरोबर कदाचित येणार नाही.
40
तेव्हा तो मला म्हणाला, ज्या परमेश्वरासमोर मी चालतो, तो आपला दूत तुझ्याबरोबर पाठवील व तुझा प्रवास सफळ करील, आणि तू माझ्या आप्तांतून, माझ्या पित्याच्या घराण्यातून माझ्या मुलासाठी नवरी आण;
41
तू माझ्या आप्तांकडे गेलास म्हणजे माझ्या शपथेतून मोकळा होशील; मुलगी देण्यास ते कबूल झाले नाहीत तर तू माझ्या शपथेतून मोकळा होशील.
42
मी आज विहिरीजवळ आलो तेव्हा म्हणालो, माझा धनी अब्राहाम ह्याच्या देवा, परमेश्वरा, मी जो प्रवास केला आहे तो सफळ करणार असलास तर,
43
पाहा, मी ह्या पाण्याच्या विहिरीजवळ उभा आहे; तर असे घडून येवो की, पाणी भरायला जी मुलगी येईल तिला मी म्हणेन, तुझ्या घागरीतील थोडे पाणी मला पाज;
44
आणि ती मला म्हणेल, “तू पी व मी तुझ्या उंटांसाठीही पाणी काढते,” तीच स्त्री परमेश्वराने माझ्या धन्याच्या मुलासाठी नेमलेली आहे असे ठरो.
45
माझ्या मनातल्या मनात हे बोलणे संपले नाही तोच रिबका खांद्यावर घागर घेऊन तेथे आली आणि तिने विहिरीत उतरून पाणी भरले; मग मी तिला म्हणालो, मला थोडे पाणी पिऊ दे.
46
तिने लागलीच आपल्या खांद्यावरून घागर उतरवून म्हटले, तू पी व तुझ्या उंटांनाही मी पाजते. तेव्हा मी पाणी प्यालो व तिने उंटांनाही पाणी पाजले.
47
मग मी तिला विचारले, तू कोणाची मुलगी? ती म्हणाली, नाहोरापासून मिल्केस झालेल्या बथुवेलाची मी मुलगी; तेव्हा मी तिच्या नाकात नथ व हातांत बांगड्या घातल्या.
48
मी नमून परमेश्वराचे स्तवन केले आणि माझ्या धन्याच्या भावाची मुलगी त्याच्या मुलासाठी न्यावी म्हणून माझा धनी अब्राहाम ह्याचा देव परमेश्वर ह्याने मला नीट वाट दाखवली म्हणून मी त्याचे स्तवन केले.
49
तर आता माझ्या धन्याशी स्नेहाने व सत्याने वागणार असलात तर तसे सांगा, नसल्यास तसे सांगा; म्हणजे मी उजवीडावी वाट धरीन.”
50
ह्यावर लाबान व बथुवेल ह्यांनी उत्तर केले. “ही परमेश्वराची योजना आहे; तुम्हांला आमच्याने बरेवाईट काही बोलवत नाही.
51
पाहा, रिबका तुमच्यापुढे आहे; तिला घेऊन जा; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ती तुमच्या धन्याच्या मुलाची बायको होऊ द्या.”
52
अब्राहामाच्या सेवकाने त्यांचे हे शब्द ऐकले तेव्हा त्याने भूमीपर्यंत लवून परमेश्वरास नमन केले.
53
मग त्या सेवकाने सोन्यारुप्याचे दागिने व वस्त्रे काढून रिबकेला दिली आणि तिचा भाऊ व तिची आई ह्यांना बहुमोल वस्तू दिल्या.
54
मग त्याने व त्याच्याबरोबरच्या मनुष्यांनी खाणेपिणे करून ती रात्र तेथे घालवली; सकाळी उठल्यावर तो म्हणाला, “माझ्या धन्याकडे जायला मला निरोप द्या.
55
हे ऐकून तिची आई व भाऊ म्हणाले, “मुलीला आमच्याजवळ थोडे दिवस, निदान दहा दिवस तरी राहू द्या; मग ती येईल,”
56
पण तो त्यांना म्हणाला, “परमेश्वराने माझा प्रवास सफळ केला आहे, तर मला ठेवून घेऊ नका; मला निरोप द्या, मला आपल्या धन्याकडे जाऊ द्या.”
57
तेव्हा ते म्हणाले, “आम्ही मुलीला बोलावून ती काय म्हणते ते विचारू.”
58
त्यांनी रिबकेस बोलावून विचारले, “तू ह्या मनुष्याबरोबर जातेस काय?” ती म्हणाली, “जाते.”
59
मग त्यांनी त्यांची बहीण रिबका, तिची दाई, अब्राहामाचा सेवक व त्याची माणसे ह्यांची रवानगी केली.
60
त्यांनी रिबकेला आशीर्वाद देऊन म्हटले, “बाई ग, तू सहस्रावधींची, लक्षावधींची जननी हो व तुझी संतती आपल्या वैर्यांच्या नगरांची सत्ता पावो.”
61
मग रिबका व तिच्या सख्या उठल्या आणि उंटांवर बसून त्या मनुष्याच्या मागे गेल्या; ह्याप्रमाणे तो रिबकेस घेऊन गेला.
62
इकडे इसहाक लहाय-रोई विहिरीकडून आला होता; तो नेगेबात राहत असे.
63
इसहाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला असता त्याने नजर वर करून पाहिले तर त्याला उंट येताना दिसले.
64
रिबकेने दृष्टी वर करून इसहाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरून उतरली.
65
तिने त्या सेवकाला विचारले, “हा रानात आपल्याला सामोरा येत आहे तो कोण?” सेवक म्हणाला, “हा माझा धनी.” तेव्हा तिने बुरखा घेऊन आपले अंग झाकले.
66
मग आपण काय काय केले ते सर्व त्या सेवकाने इसहाकाला सांगितले.
67
मग इसहाकाने तिला आपली आई सारा हिच्या डेर्यात आणले, त्याने रिबकेचा स्वीकार केला. ती त्याची पत्नी झाली. आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते; आपल्या आईच्या पश्चात इसहाक सांत्वन पावला.
← Chapter 23
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 49
Chapter 50
Chapter 25 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50