bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Jeremiah 18
Jeremiah 18
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 49
Chapter 50
Chapter 51
Chapter 52
Chapter 19 →
1
परमेश्वरापासून जे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे:
2
“ऊठ, कुंभाराच्या घरी जा, तेथे मी तुला आपली वचने ऐकवीन.”
3
मी कुंभाराच्या घरी गेलो तेव्हा तो चाकावर काम करीत होता.
4
कुंभार मातीचे पात्र घडत होता; ते त्याच्या हातात असतानाच बिघडून गेले, मग त्याला पाहिजे तसे त्याने दुसरे पात्र घडले.
5
तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले:
6
“हे इस्राएलाच्या घराण्या, ह्या कुंभाराप्रमाणे मला तुमचे पाहिजे ते करता येत नाही काय, असे परमेश्वर म्हणतो. हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, कुंभाराच्या हातात माती असते तसे तुम्ही माझ्या हातात आहात.
7
एखादे राष्ट्र अथवा राज्य समूळ उपटून नष्ट करीन असे मी एकदा बोललो;
8
तरीपण ज्या राष्ट्राविरुद्ध हे मी बोललो, ते आपली दुष्टता सोडील तर त्यावर जे अरिष्ट आणण्याचा माझा विचार होता त्याविषयी मला अनुताप होईल.
9
एखाद्या राष्ट्राची अथवा राज्याची लागवड करून ते मी स्थापीन असे मी एकदा बोललो,
10
तरीपण माझ्या दृष्टीने जे वाईट ते करून त्याने माझे वचन पाळले नाही, तर त्याचे मी हित करीन म्हणून बोललो त्याविषयी मला अनुताप होईल.
11
तर आता यहूदाचे लोक व यरुशलेमनिवासी ह्यांना जाऊन सांग: ‘परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुमच्यावर अनर्थ योजत आहे, तुमच्याविरुद्ध मनसुबा योजत आहे; तुम्ही सगळे आपापल्या कुमार्गापासून वळा, आपल्या चालीरीती सुधारा.’
12
तरी ते म्हणतात, ‘काय उपयोग? आम्ही आपल्या मनसुब्यांप्रमाणे चालणार; आम्ही सर्व आपापल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे करणार.’
13
ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, राष्ट्रांमध्ये चौकशी करून पाहा, अशा गोष्टी कोणी कधी ऐकल्या आहेत काय? इस्राएलाच्या कुमारीने अति घोर कर्म केले आहे.
14
लबानोन पर्वताच्या शिखरावरील बर्फ कधी नाहीसे होते काय? दुरून खाली वाहत येणारे थंड पाणी आटते काय?
15
तरीपण माझे लोक मला विसरले आहेत, ते व्यर्थतेपुढे धूप जाळतात; त्यांनी त्यांच्या मार्गांत, त्यांच्या प्राचीन मार्गांत त्यांना ठोकर खायला लावले; भर घालून तयार न केलेल्या आडवाटांनी त्यांना जाण्यास लावले.
16
अशा प्रकारे ते आपला देश दहशत व निरंतरचा उपहास ह्यांना पात्र करतात; त्याच्याजवळून येणारा-जाणारा प्रत्येक जण विस्मित होऊन आपले डोके हलवील.
17
पूर्वेकडील वार्याप्रमाणे मी त्यांना शत्रूपुढे विखरीन; त्यांच्या संकटसमयी मी त्यांच्याकडे पाठ करीन, तोंड करणार नाही.”
18
तेव्हा ते म्हणाले, “चला, आपण यिर्मयाविरुद्ध मनसुबा करू. कारण याजकाचे नियमशास्त्रज्ञान, मंत्र्यांची मसलत, संदेष्ट्यांचे वचन ही नाहीशी होणार नाहीत. चला आपण त्याच्यावर आरोप ठेवू, त्याच्या कोणत्याही भाषणाची पर्वा करणार नाही.”
19
हे परमेश्वरा, माझ्याकडे लक्ष दे, माझ्याबरोबर झगडणार्यांची वाणी ऐक.
20
बर्याची फेड वाइटाने व्हावी काय? कारण त्यांनी माझ्या जिवासाठी खाडा खणला आहे. त्यांच्यावरल्या तुझ्या रागाचे निवारण व्हावे म्हणून त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास मी तुझ्यासमोर उभा राहिलो ह्याचे स्मरण कर.
21
ह्यामुळे त्यांचे पुत्र दुष्काळात सापडू दे; त्यांना तलवारीच्या तडाक्यात सापडू दे; त्यांच्या स्त्रिया अपत्यहीन व विधवा होवोत, मृत्यू त्यांचे पुरुष ठार करो; त्यांचे तरुण लढाईत तलवारीने पडोत.
22
तू त्यांच्यावर एकाएकी सैन्य आणशील तेव्हा त्यांच्या घरांतून आक्रोश कानी पडो; कारण त्यांनी मला पकडण्यासाठी खाडा खणला आहे, माझ्या पायांसाठी पाश मांडले आहेत.
23
हे परमेश्वरा, मला मारण्याचे त्यांचे सर्व मनसुबे तू जाणतोसच; त्यांच्या दुष्कर्माची क्षमा करू नकोस, आपल्या दृष्टीपुढून त्यांचे पातक पुसून टाकू नकोस; म्हणजे ते तुझ्यापुढे ठोकर खाऊन पडतील; तुझ्या क्रोधसमयी त्यांची अशी वाट लाव.
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 49
Chapter 50
Chapter 51
Chapter 52
Chapter 19 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52