bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Jeremiah 42
Jeremiah 42
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 41
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 49
Chapter 50
Chapter 51
Chapter 52
Chapter 43 →
1
तेव्हा सैन्यांचे सर्व नायक आणि योहानान बिन कारेह व यजन्या बिन होशाया आणि लहानथोर सर्व लोक जवळ येऊन,
2
यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले, “आमची एवढी विनंती मान्य करा; आपणाला दिसत आहे की, आम्ही बहुतांपैकी थोडेच राहिलो आहोत; तर आम्हा सर्व अवशिष्ट लोकांसाठी परमेश्वर आपला देव ह्याच्याकडे प्रार्थना करा की,
3
आम्ही कोणत्या मार्गाने जावे व काय करावे हे परमेश्वर आपला देव ह्याने आम्हांला दाखवावे.”
4
मग यिर्मया संदेष्टा त्यांना म्हणाला, “मी तुमचे म्हणणे ऐकले आहे; पाहा, मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे परमेश्वर तुमचा देव ह्याची प्रार्थना करीन व जे काही परमेश्वर तुमच्याविषयी सांगेल ते मी तुम्हांला कळवीन; तुमच्यापासून काही लपवणार नाही.”
5
ते यिर्मयाला म्हणाले, “परमेश्वर आपला देव आपल्या हस्ते जे वचन आम्हांला सांगून पाठवील त्या सर्वांप्रमाणे आम्ही न केले तर परमेश्वर आमच्याविरुद्ध खरा विश्वसनीय साक्षी असो.
6
परमेश्वर आमचा देव ह्याच्याकडे आम्ही आपणाला पाठवतो; त्याचे म्हणणे बर्याचे असो की वाइटाचे असो आम्ही ते ऐकू; म्हणजे परमेश्वर आमचा देव ह्याची वाणी ऐकल्यावर आमचे कल्याण होईल.”
7
दहा दिवसांनी परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले.
8
तेव्हा योहानान बिन कारेह व त्याच्याबरोबरचे सैन्यांचे सर्व नायक व लहानथोर सर्व लोक ह्यांना त्याने बोलावले,
9
आणि त्यांना म्हटले, “तुम्ही आपली विनंती इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्यापुढे सादर करण्यास मला पाठवले; तो असे म्हणतो,
10
ह्या देशात अजूनही तुम्ही राहाल तर मी तुम्हांला उभारीन, पाडून टाकणार नाही; तुमची लावणी करीन, उपटून टाकणार नाही; कारण मी तुमचे अनिष्ट केले ह्याचा मला अनुताप होत आहे.
11
ज्या बाबेलच्या राजाची तुम्ही भीती धरता त्याला भिऊ नका; परमेश्वर म्हणतो, त्याला भिऊ नका; कारण तुमचा बचाव करण्यास व त्याच्या हातून तुम्हांला मुक्त करण्यास मी तुमच्याबरोबर आहे.
12
मी तुमच्यावर दया करीन म्हणजे त्याची दया तुमच्यावर होईल व तो तुम्हांला तुमच्या देशात वस्ती करू देईल;
13
पण तुम्ही जर म्हणाल, ‘आम्ही ह्या देशात राहणार नाही, म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकणार नाही,’
14
आणि असे म्हणाल की, ‘नाही, आम्ही मिसर देशात जाऊ, तेथे आमच्या नजरेस युद्ध पडणार नाही, तेथे कर्ण्याचा शब्द आम्हांला ऐकू येणार नाही व भाकरीवाचून आम्ही उपाशी मरणार नाही, आम्ही तेथेच वस्ती करू;’
15
तर अहो यहूदाचे अवशिष्ट लोकहो, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका: सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, मिसर देशात जाऊन तेथे काही दिवस राहण्याचा तुमचा निश्चय असला तर
16
ज्या तलवारीची तुम्हांला भीती वाटत आहे ती मिसर देशात तुम्हांला गाठील, व ज्या दुष्काळाची तुम्हांला भीती वाटते, तो मिसर देशात तुमच्या पाठोपाठ येईल; तेथे तुम्ही मराल.
17
ज्या माणसांनी मिसर देशात जाऊन काही दिवस राहण्याचा निश्चय केला आहे ते सर्व तलवार, दुष्काळ व मरी ह्यांनी मरतील; मी त्यांच्यावर अरिष्ट आणीन तेव्हा त्यांच्यापैकी एकही उरणार नाही किंवा सुटणार नाही.
18
“कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, माझा क्रोध व संताप ह्यांचा जसा यरुशलेमेत राहणार्यांवर वर्षाव झाला तसा तुम्ही मिसर देशात गेल्यावर तुमच्यावर होईल व तुम्ही निर्भर्त्सना, विस्मय, शाप व निंदा ह्यांचे विषय व्हाल; व हे ठिकाण तुमच्या दृष्टीस पुन्हा पडणार नाही.
19
अहो यहूदाचे अवशिष्ट लोकहो, परमेश्वराने तुम्हांला सांगितले आहे की, ‘मिसर देशात जाऊ नका, मी तुम्हांला आज बजावून सांगत आहे हे पक्के लक्षात ठेवा.’
20
ह्या प्रकारे तुम्ही आपला जीव धोक्यात घातला आहे; कारण परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे मला पाठवून तुम्ही म्हटले की, ‘परमेश्वर आमचा देव ह्याची आमच्यासाठी प्रार्थना कर व परमेश्वर आमचा देव सांगेल ते सर्व आम्हांला कळव म्हणजे त्याप्रमाणे आम्ही करू.
21
ते आज मी तुम्हांला कळवले आहे; तरी परमेश्वर तुमचा देव ह्याने माझ्या द्वारे तुम्हांला जे सांगून पाठवले त्यांतल्या कशाविषयीही तुम्ही त्याची वाणी ऐकली नाही.
22
म्हणून ज्या स्थळी जाऊन राहण्याची तुमची इच्छा आहे तेथे तुम्ही तलवार, दुष्काळ, दुर्भिक्ष व मरी ह्यांनी मराल हे पक्के समजा.”
← Chapter 41
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 49
Chapter 50
Chapter 51
Chapter 52
Chapter 43 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52