bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Jeremiah 41
Jeremiah 41
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 40
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 49
Chapter 50
Chapter 51
Chapter 52
Chapter 42 →
1
सातव्या महिन्यात असे झाले की इश्माएल बिन नथन्या बिन अलीशामा, जो राजवंशातला असून राजाच्या मुख्य अंमलदारांपैकी होता तो व त्याच्याबरोबर दहा माणसे ही गदल्या बिन अहीकाम ह्याच्याकडे मिस्पा येथे आली; मिस्पा येथे ते एका पंक्तीला बसून जेवले.
2
त्या प्रसंगी इश्माएल बिन नथन्या व त्याच्याबरोबरची दहा माणसे ह्यांनी उठून गदल्या बिन अहीकाम बिन शाफान, ज्याला बाबेलच्या राजाने देशावर अधिपती म्हणून नेमले होते, त्याला तलवारीने ठार मारले.
3
त्याप्रमाणेच मिस्पा येथे गदल्याजवळ जे सर्व यहूदी होते त्यांना व तेथे असलेले खास्दी योद्धे ह्यांनाही इश्माएलाने जिवे मारले.
4
त्याने गदल्याचा वध केला ही गोष्ट बाहेर फुटण्यापूर्वी दुसर्या दिवशी असे झाले की,
5
शखेम, शिलो व शोमरोन येथून ऐंशी माणसे आली; त्यांच्या दाढ्या मुंडलेल्या, त्यांची वस्त्रे फाडलेली, त्यांच्या अंगास घाय झालेले, व परमेश्वराच्या मंदिरात अर्पण करण्यासाठी हाती अन्नार्पणे व ऊद असलेली अशी ती आली.
6
इश्माएल बिन नथन्या हा मिस्पा येथून त्यांना सामोरा गेला; तो वाटेने रडत गेला. त्यांची भेट झाल्यावर तो त्यांना म्हणाला, “गदल्या बिन अहीकाम ह्याच्याकडे चला.”
7
ते शहराच्या मध्यभागी आल्यावर असे झाले की इश्माएल बिन नथन्या ह्याने व त्याच्या साथीदारांनी त्यांना जिवे मारून विहिरीत फेकून दिले.
8
पण त्यांपैकी दहा जण इश्माएलास म्हणाले की, ‘आम्हांला मारून टाकू नकोस; कारण आमच्याजवळ शेतात लपवून ठेवलेला गहू, जव, तेल व मध ह्यांचा साठा आहे.’ तेव्हा त्याने त्यांना सोडून दिले, त्यांच्या बांधवांबरोबर त्यांना मारले नाही.
9
इश्माएलाने पूर्वी ज्यांना मारले होते त्यांची प्रेते त्याने गदल्याच्या बाजूला एका विहिरीत टाकली होती; ही विहीर आसा राजाने इस्राएलाचा राजा बाशा ह्याच्या भीतीने खणली होती. ही विहीर इश्माएल बिन नथन्या ह्याने प्रेतांनी भरून काढली.
10
तेव्हा इश्माएलाने मिस्पा येथे असलेले सर्व अवशिष्ट लोक पकडून नेले; राजकन्यांना व मिस्पा येथे राहिलेल्या सर्व लोकांना गारद्यांचा नायक नबूजरदान ह्याने गदल्या बिन अहीकाम ह्याच्या स्वाधीन केले होते त्यांना नेले; इश्माएल बिन नथन्या ह्याने त्यांना बंदिवान करून नेले व तो अम्मोनी लोकांकडे जाण्यास निघाला.
11
मग योहानान बिन कारेह व त्याच्याबरोबर असलेले सैन्याचे सर्व नायक ह्यांनी इश्माएल बिन नथन्या ह्याने केलेल्या सर्व दुष्कर्मांची बातमी ऐकली.
12
तेव्हा ते सर्व माणसे बरोबर घेऊन इश्माएल बिन नथन्या ह्याच्याशी लढण्यास गेले; त्यांनी गिबोनाजवळ मोठा तलाव आहे तेथे त्यांना गाठले.
13
तेव्हा असे झाले की, इश्माएलाबरोबर असलेल्या सर्व लोकांनी योहानान बिन कारेह व त्याच्याबरोबर सैन्याचे जे सर्व नायक ह्यांना पाहिले तेव्हा त्यांना आनंद झाला.
14
जे सर्व लोक इश्माएलाने मिस्पा येथून पकडून नेले होते, ते उलटून योहानान बिन कारेह ह्याच्याकडे गेले;
15
पण इश्माएल बिन नथन्या आठ माणसांसह योहानानापासून निसटून अम्मोनी लोकांकडे गेला.
16
मग गदल्या बिन अहीकाम ह्याला मारल्यावर इश्माएल बिन नथन्या ह्याने जे योद्धे, स्त्रिया, मुले व खोजे ह्यांना धरून मिस्पा येथून नेले होते. त्यांना योहानान बिन कारेह व त्याच्याबरोबर असलेले सैन्याचे सर्व नायक ह्यांनी मिस्पा येथे त्यांच्या हातून सोडवून गिबोनाहून परत आणले त्या सर्व अवशिष्ट लोकांना घेऊन,
17
ते मिसर देशास जाण्याच्या हेतूने बेथलेहेमनजीक गेरूथ-किम्हाम येथे जाऊन राहिले;
18
त्यांना खास्द्यांचे भय होते, कारण बाबेलच्या राजाने ज्या गदल्या बिन अहीकाम ह्याला देशाचा अधिपती नेमले होते त्याला इश्माएल बिन नथन्या ह्याने जिवे मारले होते.
← Chapter 40
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 25
Chapter 26
Chapter 27
Chapter 28
Chapter 29
Chapter 30
Chapter 31
Chapter 32
Chapter 33
Chapter 34
Chapter 35
Chapter 36
Chapter 37
Chapter 38
Chapter 39
Chapter 40
Chapter 41
Chapter 42
Chapter 43
Chapter 44
Chapter 45
Chapter 46
Chapter 47
Chapter 48
Chapter 49
Chapter 50
Chapter 51
Chapter 52
Chapter 42 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24
25
26
27
28
29
30
31
32
33
34
35
36
37
38
39
40
41
42
43
44
45
46
47
48
49
50
51
52