bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Joshua 18
Joshua 18
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 19 →
1
मग इस्राएल लोकांची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली व तेथे त्यांनी दर्शनमंडप उभा केला; देश त्यांच्या हाती आला होता.
2
परंतु इस्राएल लोकांपैकी ज्यांना वतनभाग मिळाला नव्हता असे सात वंश अद्यापि राहिले होते.
3
यहोशवा इस्राएल लोकांना म्हणाला, “तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हांला जो देश दिला आहे तो आपल्या ताब्यात घेण्यात तुम्ही कोठवर दिरंगाई करणार?
4
प्रत्येक वंशातील तीन पुरुष नेमा म्हणजे मी त्यांना पाठवतो; त्यांनी देशभर फिरावे आणि आपापल्या वंशाला मिळायच्या वतनभागाचे वर्णन लिहावे व माझ्याकडे यावे.
5
त्यांनी त्याचे सात भाग करावेत; यहूदाने दक्षिणेकडील आपल्या नेमलेल्या वतनभागात वस्ती करावी आणि योसेफाच्या वंशजांनी उत्तरेकडील आपल्या वतनभागात राहावे.
6
सात भागांचे वर्णन लिहून माझ्याकडे आणावे, म्हणजे मी येथे आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.
7
लेव्यांना तर तुमच्यामध्ये वतन नाही; परमेश्वराने त्यांना दिलेली याजकवृत्ती हीच त्यांचे वतन होय; गाद, रऊबेन व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना यार्देनेच्या पूर्वेस वतन मिळून चुकले आहे; परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने त्यांना ते दिले आहे.”
8
मग ते पुरुष मार्गस्थ झाले; तेव्हा त्या देशाचे वर्णन लिहिण्यासाठी जे जाणार होते त्यांना यहोशवाने आज्ञा दिली की, “जा, देशभर फिरा. आणि त्याचे वर्णन लिहून माझ्याकडे आणा म्हणजे मी शिलो येथे परमेश्वरासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.”
9
तेव्हा ते पुरुष तेथून निघून देशभर फिरले व त्यातील नगरांप्रमाणे त्याच्या सात वाट्यांचे वर्णन त्यांनी वहीत लिहिले व ते शिलो येथील छावणीत यहोशवाकडे आले.
10
शिलो येथे परमेश्वरासमोर यहोशवाने त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या; त्या ठिकाणी यहोशवाने इस्राएल लोकांना त्यांच्या-त्यांच्या वतनभागांप्रमाणे जमीन वाटून दिली. बन्यामिनाला देण्यात आलेला प्रदेश
11
बन्यामिनाच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे मिळालेला वाटा हा: त्यांचा वाटा यहूदाचे वंशज आणि योसेफाचे वंशज ह्यांच्या प्रांताच्या दरम्यान होता.
12
त्यांची सीमा उत्तरेस यार्देनेपासून सुरू होऊन यरीहोच्या उत्तर बाजूने वर जाऊन पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशातून बेथ-आवेनच्या रानापर्यंत जाते.
13
तेथून ती लूज उर्फ बेथेल येथे जाते आणि लूजच्या दक्षिण बाजूकडून निघून खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेकडल्या पहाडापासून अटारोथ-अद्दार येथे येते.
14
तेथून मग पश्चिम सीमा दक्षिणेकडे वळून बेथ-होरोनाच्या पूर्वेकडून त्याच्या दक्षिणेकडील पहाडावरून यहूदाचे नगर किर्याथ-बाल उर्फ किर्याथ-यारीम येथे जाते; ह्याची पश्चिम सीमा हीच.
15
दक्षिणेकडील सीमा पश्चिमेकडे सुरू होऊन किर्याथ-यारीमाच्या वरच्या टोकापासून निघून नफ्तोह पाणवठ्यावर जाते;
16
तेथून हिन्नोमपुत्राच्या खोर्याच्या पूर्वेस व रेफाईम खोर्याच्या उत्तरेस असलेल्या पहाडांच्या उत्तर टोकापासून हिन्नोम खोर्यात म्हणजे यबूसी ह्यांच्या दक्षिणेकडे ती सीमा एन-रोगेल येथे उतरते;
17
तेथून ती सीमा उत्तरेकडे वळून एन-शेमेश येथे निघते आणि तशीच अदुम्मीम चढावाच्या पूर्वेस असलेल्या गलीलोथाकडे जाते; तेथून ती रऊबेनपुत्र बोहन ह्याच्या खडकाकडे जाते.
18
मग ती उत्तरेकडे जाऊन बेथ-अराबाच्या बाजूने खाली अराबात येते.
19
तेथून ती सीमा बेथ-होग्लाच्या उत्तर दिशेस जाऊन क्षार समुद्राच्या उत्तरेच्या खाडीपर्यंत दक्षिणेस यार्देनेच्या मुखाजवळ जाते; ही दक्षिण सीमा होय.
20
यार्देन ही त्याची पूर्व सीमा होय. बन्यामिनाच्या संतानाचे वतन त्याच्या चतुःसीमांसहित त्यांच्या कुळांप्रमाणे हे आहे.
21
बन्यामीन वंशाच्या लोकांना त्यांच्या-त्यांच्या कुळां-प्रमाणे ही नगरे मिळाली: यरीहो, बेथ-होग्ला, एमेक-केसीस,
22
बेथ-अराबा, समाराईम, बेथेल,
23
अव्वीम, पारा, अफ्रा,
24
कफर-अम्मोनी, अफनी आणि गेबा; ही बारा नगरे व त्यांखालील खेडी;
25
गिबोन, रामा व बैरोथ;
26
मिस्पे, कफीरा व मोजा;
27
रेकेम, इर्पैल व तरला;
28
सेला, एलेफ, यबूसी, हेच यरुशलेम, गिबाथ व किर्याथ; ही चौदा नगरे व त्यांखालील खेडी; बन्यामिनाच्या वंशजांचे त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे हे वतन आहे.
← Chapter 17
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 19 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24