bible
ra
🌐 Language
English
Español
Français
Deutsch
Português
Italiano
Nederlands
Русский
中文
日本語
한국어
العربية
Türkçe
Tiếng Việt
ไทย
Indonesia
All Languages
Home
/
Marathi
/
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
/
Joshua 5
Joshua 5
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 6 →
1
इस्राएल लोक यार्देनेपलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटवले हे यार्देनेपलीकडील अमोर्यांच्या सर्व राजांनी व समुद्र-किनार्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले, तेव्हा इस्राएल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि त्यांच्यात काही हिंमत राहिली नाही.
2
त्या वेळेस परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “गारगोटीच्या सुर्या करून इस्राएल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर.”
3
त्याप्रमाणे यहोशवाने गारगोटीच्या सुर्या बनवून गिबअथ हा-अरालोथ2 येथे इस्राएल लोकांची सुंता केली.
4
यहोशवाने त्यांची सुंता केली ह्याचे कारण हे की, युद्धास पात्र असे मिसर देशातून निघालेले सगळे पुरुष मिसर देशातून निघाल्यानंतर वाटेने रानात मरण पावले होते.
5
मिसर देशातून निघालेल्या सर्व पुरुषांची सुंता झाली होती, पण मिसर देशातून बाहेर निघाल्यानंतर रानात वाटेने जे जन्मले त्यांची सुंता झाली नव्हती;
6
कारण इस्राएल लोक रानात चाळीस वर्षे प्रवास करत होते; मिसर देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास पात्र अशा पुरुषांनी परमेश्वराचे सांगणे न ऐकल्यामुळे, ह्या काळात त्यांचा संहार झाला होता; परमेश्वराने त्यांना शपथेवर सांगितले होते की, जो देश मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केला आहे आणि ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत तो मी तुमच्या दृष्टीस पडू देणार नाही.
7
त्यांच्या जागी त्यांची जी मुले त्याने वाढवली होती त्यांची यहोशवाने सुंता केली, कारण वाटेने त्यांची सुंता झाली नव्हती; ती बेसुनतच राहिली होती.
8
सर्व राष्ट्राची सुंता करणे संपल्यावर ते बरे होईपर्यंत छावणीत आपापल्या ठिकाणी राहिले.
9
मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “मिसरी लोक तुमची निंदा करीत असत ती आज मी तुमच्यापासून दूर लोटली आहे.” म्हणून आजही त्या जागेला गिलगाल (लोटून देणे) म्हणतात.
10
इस्राएल लोकांनी गिलगालात तळ दिल्यावर यरीहोजवळच्या मैदानात त्या महिन्याच्या चतुर्दशीस संध्याकाळी वल्हांडण सण पाळला.
11
वल्हांडणाच्या दुसर्याच दिवशी त्या देशात पिकलेल्या धान्याच्या बेखमीर भाकरी आणि हुरडा त्यांनी खाल्ला.
12
त्यांनी देशातले उत्पन्न खाल्ले त्याच्या दुसर्या दिवसापासून मान्ना बंद झाला, तो पुन्हा इस्राएल लोकांना मिळाला नाही; त्या वर्षी त्यांनी कनान देशातले उत्पन्न खाल्ले.
13
यहोशवाने यरीहोजवळ असताना समोर पाहिले तो कोणी पुरुष आपल्या हाती उपसलेली तलवार घेऊन पुढे उभा आहे असे त्याच्या नजरेस पडले. यहोशवाने जवळ जाऊन विचारले, “तू आमच्या पक्षाचा की आमच्या वैर्यांच्या पक्षाचा?”
14
तो म्हणाला, “नाही; मी येथे परमेश्वराचा सेनापती ह्या नात्याने आलो आहे.” तेव्हा यहोशवाने त्याला दंडवत घालून म्हटले, “स्वामींची आपल्या दासाला काय आज्ञा आहे?”
15
परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, “आपल्या पायांतले जोडे काढ; कारण ज्या जागी तू उभा आहेस ती पवित्र आहे.” तेव्हा यहोशवाने तसे केले.
← Chapter 4
Jump to:
Chapter 1
Chapter 2
Chapter 3
Chapter 4
Chapter 5
Chapter 6
Chapter 7
Chapter 8
Chapter 9
Chapter 10
Chapter 11
Chapter 12
Chapter 13
Chapter 14
Chapter 15
Chapter 16
Chapter 17
Chapter 18
Chapter 19
Chapter 20
Chapter 21
Chapter 22
Chapter 23
Chapter 24
Chapter 6 →
All chapters:
1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
21
22
23
24